अॅग्रीउडान स्टार्टअपमध्ये २५ लाखांचे बीजभांडवल

पुणे ः नवउद्योजकांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ए-आयडिया ‘नार्म’चे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय नादीमिंती.
पुणे ः नवउद्योजकांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ए-आयडिया ‘नार्म’चे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय नादीमिंती.

पुणे : अन्न व कृषी व्यवसाय क्षेत्रात स्टार्टअपसाठी अॅग्रीउडान हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रातील नवउद्योजकांना २५ लाखांपर्यंत बीजभांडवल मिळू शकते, अशी माहिती ए-आयडिया नार्मचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय नादीमिंती यांनी दिली.  असोसिएशन फॉर इनोव्हेशन डेव्हलपमेंट ऑफ एन्टरप्रेन्युअरशीप इन ॲग्रीकल्चर (ए-आयडिया) आणि नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲग्रीकल्चर रिसर्च मॅनेजमेंट (नार्म) यांनी एकत्र येऊन अॅग्री स्टार्टअपला प्रोत्साहन दिले आहे. याविषयी पुण्यात अलीकडेच झालेल्या नवउद्योजकांच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.  अॅग्री स्टार्टअपला गती देण्यासाठी ‘नार्म’च्या टेक्नोलॉजी बिजनेस इन्क्युबेटरने अॅग्रीउडान प्रकल्प सुरू केला आहे. पुणे तसेच लगतच्या क्षेत्रातील स्टार्टअपला संधी मिळण्यासाठी एका विशेष रोड शो चेदेखील आयोजन करण्यात आले होते. येस बँक व एनसीडीईएक्सने देखील यात सहभाग घेतला होता.   श्री. नादीमिंती म्हणाले, ‘‘की पुण्यामध्ये अॅग्रीउडानमुळे १०० नवे स्टार्टअप सुरू होण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षीच्या उपक्रमात दोनशे स्टार्टअपने सहभाग नोंदविला होता. यंदा काही निवडक स्टार्टअपला बांधणीसाठी १५ लाखांपर्यंत तसेच बीजभांडवल म्हणून २५ लाखांपर्यंत निधी मिळणार आहे. हा निधी मिळवून देणाऱ्या गुंतवणूकदारांशी भेट घालून देण्याचे देखील ध्येय आम्ही ठेवले आहे.’’ या बैठकीत स्टार्टअपमधील संभाव्य अडथळ्यांवर कशाप्रकारे मात करावी, याबाबत तज्ञांनी नवउद्योजकांना मार्गदर्शन केले. उद्योगवाढ आणि उद्योग-व्यवसायाच्या कल्पनांचा विस्तारासाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या मुद्यांबाबत माहिती देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com