agriculture news in marathi, Agri students to get renewable energy lessons, PDKV, Akola | Agrowon

कृषीच्या विद्यार्थ्यांना अपारंपरिक ऊर्जा विकासाचे धडे
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

नागपूर : कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना अपारंपरिक ऊर्जाक्षेत्राशी संबंधित कौशल्य विकासाचे धडे देत त्या माध्यमातून त्यांच्यामध्ये उद्योजकता निर्माण करण्याकरिता भारतीय कृषी संशोधन परिषदेने तब्बल पाच कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता दिली आहे. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून या प्रकल्पाची अंमलबजावणी होईल.

नागपूर : कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना अपारंपरिक ऊर्जाक्षेत्राशी संबंधित कौशल्य विकासाचे धडे देत त्या माध्यमातून त्यांच्यामध्ये उद्योजकता निर्माण करण्याकरिता भारतीय कृषी संशोधन परिषदेने तब्बल पाच कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता दिली आहे. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून या प्रकल्पाची अंमलबजावणी होईल.

भारतीय कृषी संशोधन परिषदेकडे देशभरातून तब्बल १२७ प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले होते. यातील केवळ २६ प्रकल्पांना मान्यता देत निधी देण्यात आला आहे. त्यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील अपारंपरिक ऊर्जास्रोत व विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या प्रकल्पाचा समावेश आहे. पारंपरिक ऊर्जास्रोतांच्या मर्यादा लक्षात घेता अपारंपरिक ऊर्जास्रोत काळाची गरज आहे. त्या पार्श्‍वभूमीवर या क्षेत्राशी निगडित बाबींची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी व त्यातून उद्योजकता वाढीस लागावी, असा प्रकल्पाचा उद्देश आहे. 

२०१७-१८ ते २०२०-२१ असा या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा कालावधी आहे. त्याकरिता ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जागतिक बॅंकेने हा निधी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. अपारंपरिक ऊर्जास्रोत व विद्युत अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. सुरेंद्र काळबांडे हे या प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक आहेत. प्रा. विवेक खांबलकर प्रकल्प समन्वयक, तर सह समन्वयक म्हणून धीरज कराळे काम पाहतील. प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरिता पदभरती करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

चारही विद्यापीठांना लाभ
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीअंतर्गत चारही कृषी विद्यापीठांतील कृषी अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना अपारंपरिक ऊर्जास्रोतांशी संबंधित कौशल्यविकासाचे धडे देण्याचे प्रस्तावित आहे. त्यामध्ये राहुरी, दापोली, परभणी व अकोला येथील कृषी विद्यापीठांचा समावेश आहे.

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...