agriculture news in marathi, Agri students to give lessons on spraying technology in vidharbha region, Maharashtra | Agrowon

'कृषी'चे विद्यार्थी देणार शास्त्रोक्‍त फवारणीचे धडे
विनोद इंगोले
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

नागपूर : यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशक विषबाधेमुळे झालेले मृत्यू आणि त्यानंतरच्या घडामोडींची दखल घेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कृषी सेवा केंद्र संचालकांकरिता विशेष प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांमार्फत गावोगावी जागृतीचा निर्णय घेतला आहे. यवतमाळ जिल्ह्यापासून या उपक्रमाची सुरवात करण्यात येणार आहे.

नागपूर : यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशक विषबाधेमुळे झालेले मृत्यू आणि त्यानंतरच्या घडामोडींची दखल घेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कृषी सेवा केंद्र संचालकांकरिता विशेष प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांमार्फत गावोगावी जागृतीचा निर्णय घेतला आहे. यवतमाळ जिल्ह्यापासून या उपक्रमाची सुरवात करण्यात येणार आहे.

यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशक फवारणी करताना २२ जणांचा मृत्यू झाला, तर ५६० पेक्षा अधिक बाधित झाले. त्यानंतर कृषी विभागाने गावोगावी शास्त्रोक्‍त पद्धतीने फवारणी संदर्भाने जागृतीसाठी पुढाकार घेतला. त्यानंतर आता कृषी विद्यापीठदेखील विदर्भातील ११ जिल्ह्यात अशाचप्रकारचा उपक्रम राबविणार आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत २६ कृषी महाविद्यालय आहेत. यातील विद्यार्थ्यांना आधी प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर विद्यार्थ्यांमार्फत तालुकानिहाय गावागावांत पोचत फवारणीदरम्यान घ्यावयाच्या काळजीविषयक मार्गदर्शन करण्यावर भर दिला जाणार आहे. 

यवतमाळ जिल्ह्यापासून या उपक्रमाची सुरवात होईल. दिवाळीनंतर लगेच विद्यार्थी गावात जातील. यवतमाळ जिल्ह्यात मारोतराव वादाफळे, तसेच भाऊसाहेब माने कृषी महाविद्यालय अशी दोन महाविद्यालये आहेत. या दोन्ही व्यवस्थापनांशी कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी संवाद साधला. त्यानंतर महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने देखील आपली सामाजिक जबाबदारी जाणत या उपक्रमात आपले योगदान देण्याचे जाहिर केले. विद्यार्थी सध्या दिवाळीच्या सुटीवर असल्याने ते परतल्यानंतर लवकरच या उपक्रमाची अंमलबजावणी होईल. 

कृषी सेवा केंद्र संचालकांना धडे
कोणत्या कीटकनाशकामध्ये किती जहाल कीडनाशक आहे. त्यातील घटक, शरीराशी त्याचा संपर्क आल्यास होणारा प्रादुर्भाव, कीडनाशक मिश्रण शक्‍य आहे किंवा नाही, अशा अनेक बाबींची माहिती कृषी सेवा केंद्र संचालकांना असावी, याकरिता देखील कृषी विद्यापीठ प्रयत्न करणार आहे. त्याकरिता कृषी सेवा केंद्र संचालकांना त्या त्या जिल्ह्यात किंवा तालुक्‍यात प्रशिक्षण दिले जाईल. कृषी विज्ञान केंद्रामार्फत हा उपक्रम राबविला जाणार आहे.

कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमार्फत कीटकनाशक फवारणी विषयक जागृतीकरिता प्रयत्न केले जाणार आहेत. कृषी निविष्ठा विक्रेत्यांकरिता देखील अशाप्रकारचे प्रशिक्षण घेण्यावर भर दिला जाणार आहे. त्याची जबाबदारी केव्हीकेवर राहील.
- डॉ. विलास भाले,
कुलगुरू,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
 

इतर ताज्या घडामोडी
मार्चअखेरपर्यंत टप्प्याटप्याने... मंदीतील ब्रॉयलर्सचा बाजार मार्चअखेरपर्यंत...
पुण्यात लसूण, फ्लॉवर, मटार वधारलापुणे ः वाढता उन्हाळ्यामुळे शेतीमालाचे उत्पादन...
चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये...चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये प्रति...
राहुल गडपाले ‘सकाळ’चे चीफ कन्टेंट क्‍...पुणे : सकाळ माध्यम समूहाच्या संपादक संचालकपदी...
सत्तावीस कारखान्यांकडून १ कोटी २१ लाख... नगर  ः नगर, नाशिक जिल्ह्यांत सुरू असलेल्या...
पुणे जिल्ह्यातील १०० मंडळांमध्ये... पुणे  ः हवामान अंदाजाबाबत अचूक माहिती...
लाचखोर तालुका कृषी अधिकारी 'लाचलुचपत'...अकोला : जलसंधारणाच्या केलेल्या कामांची देयके...
परभणी जिल्ह्यातील चार लघू तलाव कोरडे परभणी ः पाणीसाठा संपुष्टात आल्यामुळे...
स्वखर्चाने शेततळे करणाऱ्यांना मिळेना...औरंगाबाद : शेतीला पाण्याची सोय व्हावी म्हणून...
कोल्हापुरात गुळाचे पाडव्यानिमित्त सौदे कोल्हापूर : येथील बाजार समितीत पाडव्यानिमित्त...
साखरेप्रमाणे कापसासाठी धाेरण ठरवावे :...पुणे : साखरेप्रमाणेच कापसासाठी दरावर लक्ष कें....
राज्यात आज अन्नत्याग आंदोलनमाळकोळी, नांदेड ः आजवर आत्महत्या केलेल्या...
'ईव्हीएम'ऐवजी आता मतपत्रिकांचा वापर...नवी दिल्ली : आगामी निवडणुकांमध्ये इलेक्‍...
राज-पवार भेटीने चर्चेला उधाणमुंबई : दिल्ली येथे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
परभणीत ढोबळी मिरची १२०० ते १८०० रुपये... परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
औरंगाबाद येथे मोसंबी २००० ते ४५०० रुपये औरंगाबाद  : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी...
कृषी सल्लामार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करू...
पशू सल्लागोठ्यातील अस्वच्छतेमुळे बऱ्याचदा दुधाळ जनावरांना...
सांगलीतील द्राक्ष, बेदाणा उत्पादक ढगाळ... सांगली : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ...
जळगावमधील शेतकऱ्यांचा परदेश अभ्यास दौरा... जळगाव : परदेशातील शेतीचे तंत्रज्ञान, शेती,...