agriculture news in marathi, Agri tech syllabus will of three years | Agrowon

कृषी तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम आता तीन वर्षांचा
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 11 जानेवारी 2018

पुणे : राज्यातील खासगी कृषी तंत्रनिकेतन विद्यालयांचा अभ्यासक्रम आता दोन ऐवजी तीन वर्षांचा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, तंत्रनिकेतन विषयक वेळोवेळी धोरणात्मक बदल करताना आठ हजार विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रकार होत असल्याची टीका शिक्षण क्षेत्रातून होत आहे.

राज्यातील खासगी शिक्षण संस्थांकडून कायम विनाअनुदानित तत्त्वावर कृषी तंत्र महाविद्यालये चालविली जात होती. या विद्यालयांच्या अभ्यासक्रमात बदल करून २०१२ पासून अर्ध इंग्रजी माध्यमात कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम लागू करण्यात आला होता. 

पुणे : राज्यातील खासगी कृषी तंत्रनिकेतन विद्यालयांचा अभ्यासक्रम आता दोन ऐवजी तीन वर्षांचा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, तंत्रनिकेतन विषयक वेळोवेळी धोरणात्मक बदल करताना आठ हजार विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रकार होत असल्याची टीका शिक्षण क्षेत्रातून होत आहे.

राज्यातील खासगी शिक्षण संस्थांकडून कायम विनाअनुदानित तत्त्वावर कृषी तंत्र महाविद्यालये चालविली जात होती. या विद्यालयांच्या अभ्यासक्रमात बदल करून २०१२ पासून अर्ध इंग्रजी माध्यमात कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम लागू करण्यात आला होता. 

६ जानेवारी २०१८ रोजी कृषी मंत्रालयाने काढलेल्या आदेशानुसार कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम आता तीन वर्षांचा राहील. तसेच, तंत्रनिकेतन उत्तीर्ण झाला म्हणून पूर्वीप्रमाणे पदवीच्या दुसऱ्या वर्षासाठी प्रवेश मिळणार नाही. "भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या पाचव्या अधिष्ठाता समितीने पदवीचे श्रेयांक १६३ वरून १८४ केले आहेत. त्यामुळे काही बदल अपरिहार्य होते. तंत्रनिकेतनच्या पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना भविष्यात देशभर कुठेही अडचण येऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे”, असे शासनाचे म्हणणे आहे.

तंत्रनिकेतनचे विद्यार्थी तसेच पदवीसाठी यापूर्वीच प्रवेश घेतलेले विद्यार्थ्यी मात्र या निर्णयामुळे कमालीचे नाराज आहेत. शैक्षणिक वर्ष २०१५-१६, २०१६-१७ आणि २०१७-१८ मध्ये बीएस्सी कृषी पदवीच्या द्वितीय वर्षात प्रवेशित झालेल्या कृषी तंत्रनिकेतन पदविकाधारकांवर यापूर्वीच पदवीच्या पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम लादला गेला आहे. दोन संधीनंतर देखील या विद्यार्थ्यांमध्ये अनुत्तीर्ण होण्याचा धोका आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना जादा संधी हवी आहे. अर्थात, तशी संधी देण्याची शिफारस अधिष्ठाता समितीने केली आहे.

तंत्रनिकेतन संस्थाचालकांच्या म्हणण्यानुसार, पदवीसाठी १६३ श्रेयांक असताना तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षीच्या ४४ ऐवजी २३ श्रेयांकांमधून सूट मिळाली होती. तशी सूट १८४ श्रेयांक झाल्यानंतरही देता आली असती. मात्र, अधिष्ठाता समिती गप्प राहीली. महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषद आणि विद्यापीठांनीदेखील कोणतीही पावले टाकली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे एक वर्षाचे नुकसान झाले आहे. आता २०१८ ते २०२१ या कालावधीतील तीन शैक्षणिक वर्षात प्रवेश होणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या निर्णयाचा फटका बसणार आहे. तंत्रनिकेतनशी निगडित आठ हजार विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करणारे मुद्दे शासनाच्या नव्या निर्णयात मांडले गेलेले नाहीत.
 

इतर अॅग्रो विशेष
संत एकनाथ महाराज समाधी दर्शनासाठी...पैठण, जि. औरंगाबाद : पैठण येथील शांतीब्रह्म श्री...
शेतीतील दारिद्र्याचे भीषण वास्तवभारताने खुली व्यवस्था स्वीकारल्याला २०१६ मध्ये २५...
आश्वासक हरभरा; अस्वस्थ उत्पादकराज्यात हरभरा काढणीस महिनाभर आधीपासूनच सुरवात...
इतिहासातील जलसंधारण संकल्पना अन्...मागच्या भागात आपण इतिहासातील सागरी किल्ल्यांवरील...
खानदेशात बाजरी मळणीवरजळगाव : खानदेशात बाजरी पीक मळणीवर आले आहे. आगामी...
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती : '...मुंबई ः शेतीच्या शाश्वत सुधारणेला गती देण्यासाठी...
सांगली : कडब्याचे दर पोचले साडेचार हजार...सांगली  ः यंदा दुष्काळी स्थिती तीव्र आहे....
सांगली जिल्ह्यात पाण्याअभावी रखडली खरड...सांगली  ः जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अंतिम...
ऊस, कापूस पट्ट्यात कष्टाने पिकविली हळद शेतीचा फारसा अनुभव नाही. पण आवड, जिद्द,...
कृषी विद्यापीठांचे वाण वापरण्यात...वाशीम जिल्ह्यातील शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील...
राज्यात अद्यापही २४ टक्के ‘एफआरपी’ बाकीपुणे : ऊस खरेदीपोटी राज्यातील शेतकऱ्यांना...
उत्तर प्रदेशात ऊसबिलावरून धुमशाननवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत कोणता मुद्दा...
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी युवकाचा ‘...नाशिक : राज्यात नापिकी, दुष्काळ, बाजारभाव...
उन्हाचा ताप वाढण्याची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका अाणि उकाडा...
जेजुरी गडावर देवाची रंगपंचमीजेजुरी, जि. पुणे : जेजुरी गडावर पारंपरिक...
शेतकरी मंडळामुळे मिळाला ९० लाखांचा...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : बॅंकेच्या चुकीमुळे...
कोंबडा झाकला तरी...मा  गील सात वर्षांत कृषी आणि सलग्न क्षेत्रातील...
शेतकऱ्यांची दैनावस्था दूर करणारा...गेल्या अनेक वर्षांत शेती आणि शेतकऱ्यांची जी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी...
शिल्लक साखरेचा दबाव पुढील हंगामावर?कोल्हापूर : केंद्राने सुरू केलेल्या कोटा...