agriculture news in Marathi, Agri tourism will promote in Junner tahsil, Maharashtra | Agrowon

कृषी पर्यटनाला मिळणार जुन्नर तालुक्यात चालना
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 मार्च 2018

आैद्याेगिक वसाहतींना मर्यादा असल्याने तालुक्याचा सर्वांगिण विकासाला अडथळा येत हाेता. तालुक्याला धार्मिक, भाैगाेलिक, पर्यावरणीय, एेतिहासिक आणि कृषी या क्षेत्रांचा वारसा लाभल्याने पर्यटनाला अनेक संधी उपलब्ध आहेत. यासाठी तालुक्याला पर्यटनाचा विशेष दर्जा मिळावा यासाठी मी प्रयत्नशील हाेताे. शासनाने माझ्या मागणीची दखल घेत, तालुक्याला पर्यटनाचा दर्जा दिल्याने विकासाला चालना मिळणार आहे.
- शरद सोनवणे, आमदार जुन्नर

पुणे: आैद्याेगिक विकासाला मर्यादा असल्याने राेजगार निर्मितीसाठी नैसर्गिक संसाधनांचा वापरातून विकास करण्यासाठी राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने जुन्नर तालुक्‍याला विशेष पर्यटन क्षेत्राचा दर्जा दिला आहे. या पर्यटन विकासामध्ये कृषी पर्यटनालादेखील चालना देण्यात येणार असून शेतकऱ्यांसाठी नवी संधी उपलब्ध होणार आहे. 

जुन्नर तालुक्‍याची पर्यटनाच्या दृष्टीने अनेक नैसर्गिक, एेतिहासिक आणि धार्मिक संसाधने उपलब्ध आहेत. यामध्ये प्रामुख्याने छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी किल्ल्यासह निसर्गसौंदर्याने नटलेले सात किल्ले, बौद्धकालीन ३५० लेण्यांसह एेतिहासिक, धार्मिक, पर्यटन, भौगोलिक महत्त्व असलेले स्थळे आहेत. याशिवाय नारायणगाव येथील तमाशा पंढरी, कृषी पर्यटन केंद्रे, आशियातील सर्वांत पहिली वायनरी, बिबट निवारण केंद्र आदींस्थळेही अाहेत. 

ऐतिहासिक, नैसर्गिक व पारंपरिक वारसा लाभलेला जुन्नर तालुका पर्यटन क्षेत्र घोषित करण्याची विनंती सरकारकडे करण्यात आली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. येथील पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची कार्यवाही पर्यटन विभागामार्फत करण्यात येणार आहे.

  •    राज्यातील पहिला पर्यटन तालुका
  •    छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जन्मभूमी
  •    बौद्धकालीन सर्वाधिक ३५० लेण्या
  •    अष्टविनायकांपैकी लेण्याद्री व ओझर ही देवस्थाने
  •    नाणे, दाऱ्या व अणे घाट
  •    खोडद येथे जागतिक महादुर्बीण
  •    गिर्यारोहनासाठी किल्ल्यांची शृंखला
  •    जलक्रीडा पर्यटनासाठी धरणांची शृंखला

इतर ताज्या घडामोडी
पूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन...पूर्णा, जि. परभणी ः परभणी जिल्ह्यातील पूर्णा,...
धुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९...धुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात...
परभणीत खरीप पीक विमा परताव्याचा घोळ...परभणी  : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...
कोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी...कोल्हापूर  : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा...
मराठवाड्यातील प्रकल्पांत २० टक्‍के...औरंगाबाद  : मराठवाड्यातील सर्वच...
कमी पाऊस : ‘जलयुक्त’ची कामे झालेल्या...नगर  ः जलयुक्त शिवार अभियानातून कामे करून...
हमीभाव, कर्जमुक्ती असेल तरच महाआघाडीत...बुलडाणा  : दीडपट हमीभाव आणि शेतकऱ्यांची...
पुणे विभागात ९२ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे   : विभागातील पाणीटंचाईची तीव्रता...
हजारो केळी रोपांचे रानडुकरांकडून नुकसानअकोला   ः सातपुड्यालगत असलेल्या अकोट...
पाण्याअभावी संत्रा तोडून फेकण्याची वेळअमरावती  ः पाण्याअभावी संत्र्याचा अपेक्षित...
बोदवडला मका खरेदीसाठी मुहूर्त मिळेनाबोदवड, जि. जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सिल्लोड तालुक्यात विहिरींसाठी दोन...सिल्लोड, जि. औरंगाबाद : वैयक्तिक लाभाच्या...
नांदेड, परभणी, हिंगोलीत सव्वा लाख...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
पुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कांदा पिकावरील फुलकिडीचे नियंत्रणकांदा पीक हे प्रामुख्याने खरीप, रब्बी हंगामात...
पशुसल्लासध्या महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कमी-जास्त...
नांदेड जिल्हा कर्जवाटपात मराठवाड्यात...नांदेड : जिल्ह्यात मुद्रा योजनेअंतर्गत १ लाख ५५...
कृषिपंप वीजजोडणीच्या प्रतीक्षेत पाचशेवर...देऊर, जि. धुळे : धुळे ग्रामीण उपविभागांतर्गत...
खानदेशातील ऊस गाळपात आर्यन शुगरने घेतली...जळगाव : खानदेशात सर्वाधिक तीन साखर कारखाने...
काजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी...पुणे  ः भविष्यातील इंधनाची टंचाई आणि आयात...