agriculture news in marathi, agri water societies demands loanwaiver | Agrowon

कर्जमाफीसाठी बंद उपसा संस्थांचे सभासद उभारणार लढा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 जानेवारी 2018

नाशिक  : नाशिक जिल्ह्यातील आठ बंद उपसा जलसिंचन सहकारी संस्थांमधील सभासदांनी कर्जमुक्तीसाठी आता रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. या लढ्यासाठी बंद उपसा जलसिंचन सहकारी संस्थाबाधित शेतकरी संघर्ष समिती गठित करण्यात आली आहेत. समितीची पहिली बैठक येत्या ३ फेब्रुवारीला होणार आहे. बंद असलेल्या संस्थांच्या कार्यक्षेत्रातील आमदार व लोकप्रतिनिधींना या बैठकीसाठी निमंत्रण देण्यात येणार आहे.

नाशिक  : नाशिक जिल्ह्यातील आठ बंद उपसा जलसिंचन सहकारी संस्थांमधील सभासदांनी कर्जमुक्तीसाठी आता रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. या लढ्यासाठी बंद उपसा जलसिंचन सहकारी संस्थाबाधित शेतकरी संघर्ष समिती गठित करण्यात आली आहेत. समितीची पहिली बैठक येत्या ३ फेब्रुवारीला होणार आहे. बंद असलेल्या संस्थांच्या कार्यक्षेत्रातील आमदार व लोकप्रतिनिधींना या बैठकीसाठी निमंत्रण देण्यात येणार आहे.

सीबीएस येथील किसान सभेच्या कार्यालयात राजू देसले यांच्या अध्यक्षतेत बंद उपसा जलसिंचन सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच (ता. २८) पार पडली. केंद्र सरकारच्या जलसिंचन योजनेेअंतर्गत जिल्ह्यात १९९५ मध्ये आठ उपसा जलसिंचन योजना सहकारी संस्था स्थापन करण्यात आल्या; मात्र तेव्हापासून आत्तापर्यंत एक थेंबभर पाणी शेतकऱ्यांना मिळाले नाही. उलटपक्षी लाखो रुपयांच्या कर्जाच्या नोंदणी बाधित शेतकऱ्यांच्या सातबारावर केल्याने संबंधितांना जिल्हा व इतर बँकांतून कर्ज मिळवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.

जिल्ह्यातील बंद पडलेल्या आठ संस्थांमधील १३२४ सभासदांच्या नावावर मुद्दल व व्याज पकडून जवळपास ५५ कोटी ५२ लाखांचे कर्ज आहे. सरकारने वेळोवेळी पाठपुरावा करूनदेखील प्रश्‍न तडीस लागलेला नाही. एकीकडे नाशिक जिल्ह्यातील बंद उपसा संस्थांची परिस्थिती दयनीय असताना जळगावमध्ये मात्र बंद पडलेल्या उपसा संस्थांचे कर्जमाफ करतानाच त्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा घाट सरकारने घातला आहे. त्यासाठी २५ कोटी रुपये उपलब्ध करून दिल्याचा आरोप बैठकीत उपस्थित शेतकऱ्यांनी केला. त्यामुळेच संघर्षाशिवाय आता न्याय नाही. या भूमिकेतून बाधित शेतकऱ्यांनी लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

या लढ्याची पुढील दिशा ठरविण्यासाठी ३ फेब्रुरवारीला बैठक होणार आहे. दरम्यान, आमदार राजाभाऊ वाजे यांनी या लढ्याला पाठिंबा दिला असून, प्रसंगी विधानसभेत आवाज उठविण्याचे आश्‍वासन शेतकऱ्यांना दिले आहे.  बैठकीला संपत थेटे, भीमा उगले, भास्कर उगले, रघुनाथ आव्हाड, बाळासाहेब चौधरी, प्रकाश गामणे, दिनकर पवार, भास्कर उगले, निवृत्ती कसबे यांच्यासह इतर बाधित शेतकरी उपस्थित होते.

इतर बातम्या
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
भारतात गोड्या पाण्याची उपलब्धता घटलीवॉशिंग्टन ः भारतात उपलब्ध पाण्याचा आणि पाणी...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
उत्तर प्रदेशातील कारखान्यांची अतिरिक्त...नवी दिल्ली ः बाजारात साखरेचे पडलेले दर आणि...
वादळाने बाष्प खेचून नेले; अरबी समुद्रात...पुणे : अरबी समुद्रात मंगळवारी कमी तीव्रतेचे वादळ...
उन्हाचा चटका कायम राहणारपुणे : राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने विदर्भ, मध्य...
अधिकाऱ्यांनी कोंडून दिली खुनाची धमकीपुणे  : कृषी खात्यातील पाणलोट व मृद्संधारण...
कापसाच्या ३७० वाणांच्या विक्रीला...नगर  ः बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कमी आणि...
बफर स्टॉकच्या शक्‍यतेने साखर १००...कोल्हापूर : गेल्या अनेक दिवसांपासून मंदीच्या...
दापोलीत उद्यापासून जॉइंट ॲग्रेस्कोपुणे ः यंदा ४६ वी संयुक्त कृषी संशोधन व विकास...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
हिरापूरच्या बैल बाजारात चार कोटींवर...बीड : हिरापूर (ता. गेवराई) येथे बैलांचा आठवडे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
कापूस बियाणे सत्यता पडताळण्यासाठी ‘क्‍...जळगाव ः बोगस कापूस बियाण्याला आळा घालण्यासह...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...