agriculture news in marathi, Agricultural and animal Display in Jalgaon from November 3 | Agrowon

जळगावमध्ये ३ नोव्हेंबरपासून कृषी व पशुप्रदर्शन
चंद्रकांत जाधव
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

जळगाव : येथील शिवतीर्थ मैदानावर ३ ते ६ नोव्हेंबरदरम्यान राज्यस्तरीय कृषी व पशुप्रदर्शन ॲग्रोवर्ल्ड-२०१७ चे आयोजन करण्यात आले आहे. डोम स्ट्रक्‍टरमधील या कृषी प्रदर्शनात नवनवीन यंत्रे, तंत्रे, सिंचन प्रणाली; तसेच विविध आकार व प्रकारांतील ट्रॅक्‍टर, अवजारे, स्प्रे पंप, फळबाग छाटणीपासून ते परसबागेतील मशागतीच्या कामांसाठी उपयुक्त शेती साहित्ये, मोत्याची शेतीचे प्रात्यक्षिक असेल.

जळगाव : येथील शिवतीर्थ मैदानावर ३ ते ६ नोव्हेंबरदरम्यान राज्यस्तरीय कृषी व पशुप्रदर्शन ॲग्रोवर्ल्ड-२०१७ चे आयोजन करण्यात आले आहे. डोम स्ट्रक्‍टरमधील या कृषी प्रदर्शनात नवनवीन यंत्रे, तंत्रे, सिंचन प्रणाली; तसेच विविध आकार व प्रकारांतील ट्रॅक्‍टर, अवजारे, स्प्रे पंप, फळबाग छाटणीपासून ते परसबागेतील मशागतीच्या कामांसाठी उपयुक्त शेती साहित्ये, मोत्याची शेतीचे प्रात्यक्षिक असेल.

जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक आहेत. केएफ बायोफ्लान्ट, ग्रब ॲग्रो, श्री. साईराम प्लॅस्टिक व गोदावरी फाउंडेशन हे सहप्रायोजक आहेत. चारदिवसीय कृषी प्रदर्शनासाठी कृषी विभाग, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, जिल्हा परिषद, जळगाव, वसुंधरा पाणलोट, आत्मा यांचे सहकार्य आहे. शासकीय विभागांसाठी स्वतंत्र दालन असणार आहे.

ट्रॅक्‍टर, अवजारे व मशिनरी स्वतः हाताळून खात्री करण्यासाठी मोठी जागा राखीव ठेवली आहे. हिरव्या चाऱ्याचे व्यवस्थापन, मूरघास, हायड्रोपोनिक फॉडर, ॲझोलाची प्रात्यक्षिकासह माहिती देण्याची व्यवस्था आहे. दूधकाढणी यंत्रांच्या नामांकित कंपन्यांचेही स्टॉल्स असतील. देशी-विदेशी शेळ्यांच्या जाती प्रत्यक्ष प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. तसेच चार दिवस चर्चासत्रांचे आयोजन केले आहे. १० बाय १० फूट आकाराच्या शेततळ्यात लाखभर उत्पन्न देणारी मोत्याची शेती, हे ॲग्रोवर्ल्डच्या प्रदर्शनाचे खास आकर्षण असेल.

इतर ताज्या घडामोडी
मार्चअखेरपर्यंत टप्प्याटप्याने... मंदीतील ब्रॉयलर्सचा बाजार मार्चअखेरपर्यंत...
पुण्यात लसूण, फ्लॉवर, मटार वधारलापुणे ः वाढता उन्हाळ्यामुळे शेतीमालाचे उत्पादन...
चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये...चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये प्रति...
राहुल गडपाले ‘सकाळ’चे चीफ कन्टेंट क्‍...पुणे : सकाळ माध्यम समूहाच्या संपादक संचालकपदी...
सत्तावीस कारखान्यांकडून १ कोटी २१ लाख... नगर  ः नगर, नाशिक जिल्ह्यांत सुरू असलेल्या...
पुणे जिल्ह्यातील १०० मंडळांमध्ये... पुणे  ः हवामान अंदाजाबाबत अचूक माहिती...
लाचखोर तालुका कृषी अधिकारी 'लाचलुचपत'...अकोला : जलसंधारणाच्या केलेल्या कामांची देयके...
परभणी जिल्ह्यातील चार लघू तलाव कोरडे परभणी ः पाणीसाठा संपुष्टात आल्यामुळे...
स्वखर्चाने शेततळे करणाऱ्यांना मिळेना...औरंगाबाद : शेतीला पाण्याची सोय व्हावी म्हणून...
कोल्हापुरात गुळाचे पाडव्यानिमित्त सौदे कोल्हापूर : येथील बाजार समितीत पाडव्यानिमित्त...
साखरेप्रमाणे कापसासाठी धाेरण ठरवावे :...पुणे : साखरेप्रमाणेच कापसासाठी दरावर लक्ष कें....
राज्यात आज अन्नत्याग आंदोलनमाळकोळी, नांदेड ः आजवर आत्महत्या केलेल्या...
'ईव्हीएम'ऐवजी आता मतपत्रिकांचा वापर...नवी दिल्ली : आगामी निवडणुकांमध्ये इलेक्‍...
राज-पवार भेटीने चर्चेला उधाणमुंबई : दिल्ली येथे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
परभणीत ढोबळी मिरची १२०० ते १८०० रुपये... परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
औरंगाबाद येथे मोसंबी २००० ते ४५०० रुपये औरंगाबाद  : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी...
कृषी सल्लामार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करू...
पशू सल्लागोठ्यातील अस्वच्छतेमुळे बऱ्याचदा दुधाळ जनावरांना...
सांगलीतील द्राक्ष, बेदाणा उत्पादक ढगाळ... सांगली : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ...
जळगावमधील शेतकऱ्यांचा परदेश अभ्यास दौरा... जळगाव : परदेशातील शेतीचे तंत्रज्ञान, शेती,...