agriculture news in marathi, agricultural commissioner starting tur sowing, nagar, maharashtra | Agrowon

कृषी आयुक्तांच्या हस्ते भाळवणी येथे तूर पेरणीचा प्रारंभ
टीम अॅग्रोवन
सोमवार, 2 जुलै 2018

नगर : शेतकऱ्यांना एकत्र यावे लागणार आहे. एकटा शेतकरी उत्पादन घेतो, त्यामुळे त्याला बाजारभाव मिळत नाही. शेतकऱ्यांनी नियोजन करायला हवे. ‘व्हिजन’ डोळ्यासमोर ठेवूनच शेती करावी. गटशेती ही काळाची गरज आहे. त्यातून शेतकऱ्यांचा फायदा आहे, असे मत कृषी आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांनी व्यक्त केले.

भाळवणी (ता. पारनेर) येथे उन्नती शेती-समृद्ध शेतकरी योजनेंतर्गत शेतकरी रघुनाथ लोंढे यांच्या शेतीवर तूर पेरणीचा प्रारंभ नुकताच (ता. २९) सचिंद्र प्रतापसिंह यांच्या हस्ते झाला. आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्यासह शेतकरी, अधिकारी यावेळी उपस्थित होते.

नगर : शेतकऱ्यांना एकत्र यावे लागणार आहे. एकटा शेतकरी उत्पादन घेतो, त्यामुळे त्याला बाजारभाव मिळत नाही. शेतकऱ्यांनी नियोजन करायला हवे. ‘व्हिजन’ डोळ्यासमोर ठेवूनच शेती करावी. गटशेती ही काळाची गरज आहे. त्यातून शेतकऱ्यांचा फायदा आहे, असे मत कृषी आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांनी व्यक्त केले.

भाळवणी (ता. पारनेर) येथे उन्नती शेती-समृद्ध शेतकरी योजनेंतर्गत शेतकरी रघुनाथ लोंढे यांच्या शेतीवर तूर पेरणीचा प्रारंभ नुकताच (ता. २९) सचिंद्र प्रतापसिंह यांच्या हस्ते झाला. आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्यासह शेतकरी, अधिकारी यावेळी उपस्थित होते.

सचिंद्र प्रतापसिंह म्हणाले, की शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी फायदा करून घ्यावा. ही महाराष्ट्र शासनाची अभिनव योजना आहे. शेतकरी केवळ एकत्र येऊन उपयोग नाही तर त्यांनी कामाच्या माध्यमातून व कृषी सहायकांच्या ज्ञानाचा वापर करून आपल्या उत्पन्नात वाढ करून घ्यावी. पुढील काळात गटामार्फत शेती करणाऱ्यांनाच शासनाच्या योजनांचा लाभ मिळणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याने वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन घेऊन आपले उत्पन्न वाढवावे.

शेतीमाल निर्यात झाला तर आपोआप शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होईल. आयात निर्यातीच्या धोरणावर शासनाने लक्ष वेधले आहे. प्रत्येक कृषी सहायकाने प्रात्यक्षिक प्लॉटवर जाऊन शेतकऱ्यांना पेरणीचे तंत्रज्ञान सांगावे. त्यांना कृषी योजनांची माहिती द्यावी. शेतकरी हा आपल्या कुटुंबातील घटक आहे. त्यांच्यासाठी चांगले काम केले, तर निश्‍चितच समाधान मिळणार आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा फायदा करून द्यावा, असे त्यांनी सांगितले.

यावेळी भाळवणी येथील जलयुक्त शिवार अभियान, शेतकरी उत्पादक कंपनी, विविध कामांची पाहणी त्यांनी केली. शाळेतील विद्यार्थ्यांशीही संवाद साधला.

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...