डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात बुधवारपासून प्रदर्शन

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या ११९ व्या जयंतीनिमित्त बुधवार (ता. २७) ते शुक्रवार (ता. २९) या कालावधीत अकोला येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन ॲग्रोटेक २०१७ आयोजित करण्यात आले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे राष्ट्रीय कृषिविकास योजनेअंतर्गत कृषी विभागाच्या सहकार्याने हे प्रदर्शन होत आहे.

सध्याच्या शेतीत नवीन संकल्पना व आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करणे अनिवार्य झाले आहे. शेतकरीसुद्धा या अनुषंगाने काम करीत आहेत. शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे प्रदर्शन भरविले जाते.

कृषी प्रदर्शनांतर्गत कृषी विद्यापीठे, शासकीय संस्था, कृषी क्षेत्रात आधुनिक उत्पादन निर्मिती करणाऱ्या खासगी कंपन्या, प्रगत उत्पादनांचे आणि यंत्रांचे सादरीकरण, पाणी, खते, कीटकनाशकांचा कमीत कमी वापर करून भरपूर उत्पादन मिळवण्यासाठी लागणारी माहिती मिळणार आहे.

या वर्षीच्या प्रदर्शनात कृषी विद्यापीठ व संलग्न कृषी संस्थांची दालने, विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांसोबत विविध विषयांवर दररोज चर्चासत्र, कृषी औजारे व कृषी संलग्नित योजनांची माहिती, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाची दालने, मत्स्य व्यवसाय विकास विभाग, ग्रामीण व्यवसाय उत्पादने, कृषी व ग्रामीण उद्योग दालने, फळे व भाजीपाला प्रदर्शन, बचत गटांचे स्टॉल्स राहणार आहेत. शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com