agriculture news in marathi, agricultural department clerks given signal for Movement | Agrowon

कृषी विभागातील लिपिकांचा लेखनीबंद आंदोलनाचा इशारा
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 18 जानेवारी 2018

नागपूर ः कृषी सेवकाकडून लिपिकाला झालेली मारहाण याप्रकरणी पोलिस तक्रारीनंतरही कारवाई न होणे आणि त्यानंतर त्याच कृषी सेवकाकडून लिपिकाला धमक्‍या मिळणे या विरोधात लेखनीबंद आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य कृषी विभाग लिपिक संवर्ग संघटनेने दिला आहे. या संदर्भाने प्रभारी विभागीय कृषी सहसंचालक प्रज्ञा गोळघाटे यांना निवेदन देण्यात आले.

नागपूर ः कृषी सेवकाकडून लिपिकाला झालेली मारहाण याप्रकरणी पोलिस तक्रारीनंतरही कारवाई न होणे आणि त्यानंतर त्याच कृषी सेवकाकडून लिपिकाला धमक्‍या मिळणे या विरोधात लेखनीबंद आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य कृषी विभाग लिपिक संवर्ग संघटनेने दिला आहे. या संदर्भाने प्रभारी विभागीय कृषी सहसंचालक प्रज्ञा गोळघाटे यांना निवेदन देण्यात आले.

चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमुर तालुका कृषी कार्यालयाअंतर्गत नीलेश राठोड हे कृषी सेवक असून त्यांच्याकडे मदनापूर गावाचा प्रभार आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये निर्माण झालेल्या कार्यालयीन अडचणीसंदर्भाने जाणून घेण्याकरिता ते तालुका कृषी कार्यालयातील लिपीक व्ही. के. कोराम यांच्याकडे गेले. या वेळी नीलेश राठोड व व्ही. के. कोराम यांच्यात वाद झाल्याचे सूत्रांनी सांगीतले. या वादातच नीलेश राठोड यांनी कोराम यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी चिमूर पोलिसांत त्याचवेळी रितसर तक्रारही देण्यात आली. परंतु, पोलिसांकडून तसेच खात्याअंतर्गंतदेखील याप्रकरणी कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे मनोबल वाढल्याने नीलेश राठोड हे लिपीक कोराम यांना कार्यालयात जाऊन धमक्‍या देत असल्याचा आरोप लिपीकवर्गीय संघटनेने या वेळी केला.

कृषी सेवक नीलेश राठोड यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी १५ जानेवारी पासून चंद्रपूर जिल्ह्यात लेखनीबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. १७ नोव्हेंबरपासून नागपूर विभागातील सर्व लिपीकवर्गीय कर्मचारी काळ्या फिती लावून काम करतील. त्यानंतर आठवडाभरात नीलेश राठोड यांच्यावर कारवाई न झाल्यास नागपूर विभागात देखील लेखनीबंद आंदोलनाची सुरवात होईल, असा इशारा देण्यात आला आहे.

इतर बातम्या
फलोत्पादन अनुदान अर्जासाठी शेवटचे चार...पुणे : एकात्मिक फलोत्पादन अभियानातून (एमआयडीएच)...
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...
सभा मोदींची; प्रशासनाने घेतली...नाशिक : लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...
नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर...नगर : जिल्ह्यात २८ लाख लहान-मोठे जनावरे आहेत....
अडीच कोटींचे अनुदान ‘हरवले’पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना वाटण्यासाठी केंद्र...
उन्हाचा चटका काहीसा कमी पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून उन्हाच्या चटक्यात...
सौर कृषिपंप योजना खोळंबलीजळगाव : सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी २३५९ टँकरऔरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे होणारी...
नत्र ऱ्हास रोखण्यासोबत वाढवता येईल...शेतकरी आपल्या मक्याच्या उत्पादनांचा अंदाज...
नांदेड, परभणी, हिंगोली, लातूरमध्ये आज...नांदेड : लोकसभेच्या नांदेड, परभणी, हिंगोली...
खानदेशात पाणंद रस्त्यांची कामे ठप्पजळगाव : खानदेशात जानेवारीत मंजुरी मिळालेल्या,...
‘महाबीज’तर्फे बीजोत्पादनासाठी आगाऊ...जळगाव : आगामी खरिपासाठी सोयाबीन, उडीद, मूग, ताग,...
म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करणार...जत, जि. सांगली : ‘‘जत तालुक्याच्या पूर्व भागाला...
अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यावर संकटनाशिक : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी वादळी...
पुणे विभागात रब्बी कांद्याचे ३६ लाख टन...पुणे   ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी...
पेमेंट न मिळाल्याने वसाकाच्या ऊस...नाशिक : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी साखर...
गारपीट, वादळी पावसाने पुणे जिल्ह्याला...पुणे  : जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या...