संत्रा निर्यातीला कृषी विभाग देणार प्रोत्साहन

संत्रा, भाजीपाला निर्यातीसाठी इच्छुक शेतकऱ्यांनी सिट्रेसनेट आणि व्हेजिनेटवर नोंदणी करावी. त्यासाठी नोंदणी अर्ज तालुका कृषी अधिकारीस्तरावर लवकरच उपलब्ध होतील. त्यानंतर विशेष प्रशिक्षण होईल. त्यासाठी कृषी विभागाने आराखडा तयार केला असून राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना होईल. - रवींद्र भोसले, विभागीय कृषी सहसंचालक, नागपूर
संत्रा निर्यातीला कृषी विभाग देणार प्रोत्साहन
संत्रा निर्यातीला कृषी विभाग देणार प्रोत्साहन

नागपूर : अपेडाने संत्रा क्‍लस्टरला पहिल्यांदाच मान्यता दिल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून सिट्रेसनेटवर नोंदणीकरिता प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्यासाठी लवकरच कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी खास प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे. विदर्भातून भाजीपाला आणि संत्रा निर्यात वाढावी, यासाठी हा प्रयत्न केला जाणार आहे. 

अमरावती व त्यानंतर नागपूर जिल्ह्यात दीड लाख हेक्‍टरवर संत्रा लागवड आहे. या दोन जिल्ह्यांचा अपेडाने नुकताच क्‍लस्टरमध्ये समावेश केला. त्याअंतर्गत निर्यातीसाठी इच्छुक शेतकऱ्यांना `सिट्रसनेट'' वर नोंदणी करावी लागेल. सिट्रेसनेट सध्या तयार असले तरी अद्याप कोणत्याच देशाने नागपुरी संत्र्याला मागणी नोंदविली नाही. त्यापूर्वी शेतकऱ्यांना सिट्रेसनेटवरील नोंदणीबाबत माहिती व्हावी, यासाठी कृषी विभाग तांत्रिक मार्गदर्शन करेल. संत्र्यासोबतच भाजीपाला निर्यातीसाठी व्हेजिनेटवर देखील नोंदणीविषयक माहिती शेतकऱ्यांना दिली जाईल. यासाठी तीन लाख रुपयांचा निधी कृषी विभागाला प्राप्त झाला आहे. 

तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे अर्ज

संत्रा आणि भाजीपाला निर्यातीसाठी इच्छुक शेतकऱ्यांना प्रशिक्षणातील सहभागासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे अर्ज करावे लागतील. त्यातील निवडक शेतकऱ्यांची  प्रशिक्षणासाठी निवड होईल, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. लवकरच याबाबत प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे सांगण्यात आले. 

बांगलादेश मोठा आयातदार

नागपुरी संत्र्याला सध्या केवळ बांगलादेशमधून मोठी मागणी आहे. त्यानंतर नेपाळला नागपुरी संत्रा जातो. महाऑरेज व अपेडाच्या माध्यमातून दुबई, कतार, बहरीन देशांत काही टन संत्रा पाठविण्याचा प्रयोग करण्यात आला होता.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com