agriculture news in marathi, Agricultural Department will try to increase exports: Jagtap | Agrowon

निर्यात वाढविण्यासाठी कृषी विभाग प्रयत्न करणार ः जगताप
टीम अॅग्रोवन
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

परभणी ः शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सरंक्षित शेती, सूक्ष्म सिंचन पद्धती अवलंब करावा. उत्पन्नात वाढ करण्यासाठी निर्यातक्षम शेतीमालाचे उत्पादन घ्यावे. जिल्ह्यातील निर्यात वाढविण्याच्या दृष्टीने कृषी विभागाकडून प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन लातूर कृषी विभागाचे सहसंचालक टी. एन. जगताप यांनी केले.

परभणी ः शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सरंक्षित शेती, सूक्ष्म सिंचन पद्धती अवलंब करावा. उत्पन्नात वाढ करण्यासाठी निर्यातक्षम शेतीमालाचे उत्पादन घ्यावे. जिल्ह्यातील निर्यात वाढविण्याच्या दृष्टीने कृषी विभागाकडून प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन लातूर कृषी विभागाचे सहसंचालक टी. एन. जगताप यांनी केले.

कृषी विज्ञान केंद्र आणि आत्मा यांच्यातर्फे आयोजित निर्यातक्षम भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षणाच्या उद्‌घाटन कार्यक्रमामध्ये शुक्रवारी (ता. १२) ते बोलत होते. अध्यक्षस्थानी लक्ष्मीताई देशमुख या होत्या. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. आर. शिंदे, निर्यात तज्ज्ञ गोविंद हांडे, केव्हीचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत भोसले, उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. जी. एम. वाघमारे, अमित तुपे, सिरपूर (ता. पालम) येथील निर्यातक्षम भेंडी उत्पादक गटातील शेतकरी सुभाष आवरगंड, पशुपतीनाथ शेवटे, गुलाब उत्पादक शेतकरी मोहन कापसे, आळंबी उत्पादक शेतकरी एकनाथ मुंजे आदी उपस्थित होते.

या वेळी श्री. जगताप म्हणाले, निर्यातक्षम भाजीपाला उत्पादनासाठी कृषी विभाग तसेच कृषी विज्ञान केंद्राने एकत्र काम करावे. श्री. शिंदे म्हणाले, कृषी विभागातर्फे निर्यातवृद्धीसाठी प्रयत्न केले जातील. तांत्रिक सत्रामध्ये डॉ. वाघमारे यांनी भेंडी लागवड तंत्रज्ञान विषयावर माहिती दिली.

इतर बातम्या
मॉन्सून एक्सप्रेस कोकणात दाखल;...पुणे : अरबी समुद्रात आलेल्या वायू चक्रीवादळामुळे...
कृषी विभाग म्हणते, पॉलिहाउस, शेडनेट...जळगाव ः खानदेशात १ ते ११ जून यादरम्यान झालेल्या...
केळी पीकविमाधारकांना परताव्यांची...जळगाव  ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत...
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाअभावी... कोल्हापूर  : अनेक ठिकाणी पेरण्या झाल्या...
कांदा निर्यात, प्रक्रियेवर भर गरजेचा ः...राजगुरुनगर, जि. पुणे : कांदा बाजारभावातील अनिश्‍...
सात महिन्यांपूर्वी विकलेल्या मुगाचे...अकोला ः नाफेडने खरेदी केलेल्या मुगाचे पैसे सात...
महावितरण’द्वारे देखभाल, दुरुस्तीची ९०३३...‘सातारा : थेट गावात जाऊन वीजयंत्रणेच्या देखभाल व...
रत्नागिरीत खतनिर्मिती कारखान्यावर छापारत्नागिरी : येथील एमआयडीसी परिसरात मच्छीच्या...
आषाढी पालखी सोहळ्यासाठी आरोग्य विभाग...पुणे : आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर...
गोंदिया जिल्ह्यात २ लाख हेक्‍टरवर...गोंदिया ः राइससिटी असा लौकिक असलेल्या गोंदिया...
आमदार दीपिका चव्हाण यांनी मांडली...नाशिक : जिल्ह्यातील बागलाण व चांदवड तालुक्यातील...
औरंगाबाद जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती औरंगाबाद : जिल्ह्यातील ७७८ गाव व २७२...
नाशिकला ‘राष्ट्रवादी युवक’चे रेल रोको...नाशिक  : केंद्र व राज्य सरकारच्या अपयशामुळे...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत कापूस...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत २०१८-...
जतला कर्नाटकातून पाणी मिळणे धूसरसांगली : कर्नाटकातून कृष्णेचे पाणी जत तालुक्याला...
आषाढी वारीत ३५ हजार विद्यार्थी करणार...सोलापूर : आषाढी वारीत पाच विद्यापीठांतील ३५ हजार...
कात्रजकडून गायीच्या दूध खरेदीदरात वाढपुणे  : दुष्काळी स्थितीत दूध उत्पादक...
सौर कृषिपंप योजनेतील लाभार्थी हिस्सा...मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत...
कृषी विभागात बदल्यांची धूमपुणे  : राज्यात ऐन खरिपाच्या नियोजनात कृषी...
विधीमंडळ अधिवेशन ः सलग तिसऱ्या दिवशीही...मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही...