agriculture news in marathi, agricultural equipments Allocation pending | Agrowon

सोलापूरमध्ये कृषी साहित्याचे वाटप लांबणीवर
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 नोव्हेंबर 2017

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या विविध कृषी साहित्याच्या वाटपाला अजूनही मुहूर्त मिळालेला नाही. गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत यासंबंधी चर्चाही झाली; पण लाभार्थ्यांच्या प्रस्तावात त्रुटी असल्याचे कारण सांगत त्या दुरुस्तीसाठी आता हे वाटप आणखी काही दिवस लांबणीवर टाकण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या विविध कृषी साहित्याच्या वाटपाला अजूनही मुहूर्त मिळालेला नाही. गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत यासंबंधी चर्चाही झाली; पण लाभार्थ्यांच्या प्रस्तावात त्रुटी असल्याचे कारण सांगत त्या दुरुस्तीसाठी आता हे वाटप आणखी काही दिवस लांबणीवर टाकण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

कृषी समितीचे सभापती मल्लिकार्जुन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बैठकीसाठी गणेश पाटील, अनिरुद्ध कांबळे, शुभांगी उबाळे, दिनकर नाईकनवरे आदी समितीचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीत पहिला आणि महत्त्वाचा विषय कृषी साहित्य वाटप हा होता; पण या बैठकीत अक्कलकोट, माढा, माळशिरस आणि करमाळा या चार तालुक्‍यांतील शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत.

या त्रुटी पूर्ण करून पुढील बैठकीमध्ये जिल्ह्यातील सगळ्याच प्रस्तावांना एकत्रित मान्यता देण्याचा निर्णय या वेळी झाला. त्यानंतर अन्य आयत्यावेळच्या विषयावर चर्चा झाली. त्याशिवाय रब्बी हंगामाचाही आढावा घेण्यात आला. कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना पीक संरक्षक अवजारे, कडबाकुट्टी, डिझेलपंप, विद्युत मोटार यासाठी जवळपास ५ हजार ३०० लाभार्थ्यांचे अर्ज कृषी विभागाकडे आले आहेत.

त्या अर्जांची छाननी पुढील आठ-दहा दिवसांमध्ये करून पुढील बैठकीमध्ये साधारण १० -११ डिसेंबरला होणाऱ्या बैठकीत या प्रस्तावांना मान्यता देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांनी संबंधित साहित्याची खरेदी करून त्याची पावती कृषी विभागाकडे जमा करावी, त्यानंतर त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत.

 

इतर बातम्या
'टिळक महाराष्ट्र विद्यापीठा'तर्फे...पुणे : टिळक महाराष्ट्र अभिमत विद्यापीठाने ‘सकाळ’...
शेतकऱ्यांसाठी हमीभाव दिवास्वप्नचमुंबई : सध्या शेतीमाल हमीभावाच्या मुद्द्यावरून...
साखर मूल्यांकनात १३० रुपयांनी वाढकोल्हापूर : साखर दरात वाढ होत असल्याने त्याचा...
संयुक्त खतांच्या किमती वाढल्यानागपूर ः वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांसमोरील...
हेक्टरी २९१ किलोच तुरीची खरेदीसांगली : वेळ सकाळी दहाची...जत तालुक्‍यातील शेतकरी...
सरकार कांदा खरेदी करण्याची शक्यतानवी दिल्ली : देशात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना...
मध्य महाराष्ट्रात शुक्रवारी गारपिटीची...पुणे ः कर्नाटकाचा उत्तर भाग आणि अरबी समुद्र, गोवा...
‘हवामान स्मार्ट शेती’ प्रकल्पाला...नवी दिल्ली : हवामानाच्या लहरीपणामुळे देशातील...
माझा शेतकरी चोर आहे का ः धनंजय मुंडेरावेर, जि. जळगाव ः मराठवाड्यातील गारपीटग्रस्त...
स्थलांतरित गावांतही मिळणार रेशनचे...नगर : रोजगारासाठी गाव सोडलेल्या कुटुंबांना आता...
राज्यातील धरणासाठा ५२.८३ टक्क्यांवरपुणे : राज्यात रब्बी हंगामात पाण्याचा मोठ्या...
नाशिक विभाग ‘मनरेगा’ची मजुरी जमा...नाशिक  : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’ खर्च करणार ‘केम...अकोला  ः कृषी समृद्धी समन्वयित कृषी विकास...
खतांवरील अनुदानाबरोबरच किमतीही हव्यात...खत उद्योगाच्या प्रगतीमध्ये केंद्र सरकार व राज्य...
आता आरोग्यासाठी ‘न्यूट्रासिटिकल्स’औषधनिर्माणशास्त्र आणि अन्ननिर्मितीशास्त्र...
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पेटून उठासेलू, जि. परभणी : कधी गारपीट, कधी अवकाळी पाऊस,...
पंचायत तज्ज्ञ गटाचा अहवाल लवकरच सादर...पुणे  : राज्यातील ग्रामविकासाची भविष्यकालीन...
बायफचा फ्रान्स सरकारकडून गौरव पुणे : पशुसंवर्धन, ग्रामविकास व शेती क्षेत्रात...
परभणी जिल्ह्यातील १४ हजार जनावरांना इअर...परभणी : पशुसंवर्धन विभागांतर्गत राबविण्यात येत...
जळगाव जिल्ह्यात हवामानाचा बाजरी उगवणीवर...जळगाव  ः जिल्ह्यात बाजरीची पेरणी काही...