agriculture news in marathi, agricultural exhibition end | Agrowon

ॲग्रोवन कृषी प्रदर्शनाचा उत्साहात समारोप
टीम अॅग्रोवन
सोमवार, 8 जानेवारी 2018

सांगली : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या नेचर केअर फर्टिलायझर्स प्रस्तुत ‘ॲग्रोवन’ कृषी प्रदर्शनाचा रविवारी (ता. ७) उत्साहात समारोप झाला. मे. बी. जी. चितळे आणि चितळे जिनस एबीएस इंडिया प्रदर्शनाचे सहप्रायोजक होते. प्रदर्शनात सुटीचे औचित्य साधून शेतकऱ्यांबरोबर शेतीक्षेत्रात नवीन काही तरी करण्याची इच्छा असलेल्या नागरिकांनी प्रदर्शनाचा लाभ घेऊन स्टॉलधारकांकडून शेतीचे बारकावे जाणून घेतले.  

सांगली : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या नेचर केअर फर्टिलायझर्स प्रस्तुत ‘ॲग्रोवन’ कृषी प्रदर्शनाचा रविवारी (ता. ७) उत्साहात समारोप झाला. मे. बी. जी. चितळे आणि चितळे जिनस एबीएस इंडिया प्रदर्शनाचे सहप्रायोजक होते. प्रदर्शनात सुटीचे औचित्य साधून शेतकऱ्यांबरोबर शेतीक्षेत्रात नवीन काही तरी करण्याची इच्छा असलेल्या नागरिकांनी प्रदर्शनाचा लाभ घेऊन स्टॉलधारकांकडून शेतीचे बारकावे जाणून घेतले.  

रविवारी प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असल्याने व सुटीचा दिवस असल्याने अनेक शेतकऱ्यांनी कुटुंबातील सदस्यांसहित प्रदर्शन पाहण्यास पसंती दाखवली. शुक्रवारी (ता. ५) प्रदर्शनाचे उद्‍घाटन झाल्यानंतर पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा ओघ नेमिनाथनगर येथील प्रदर्शनस्थळी सुरू झाला. शेतकऱ्यांबरोबर परिसरातील कृषी मंडळे, कृषी महाविद्यालयांचे विद्यार्थी याबरोबरच अनेक संस्था, संघटना, कारखाने आदींच्या प्रतिनिधींनीही प्रदर्शनास भेट देऊन नवे तंत्रज्ञान अवगत करून घेतले. प्रदर्शनाची सांगता होईपर्यंत गर्दी कायम राहिली.

प्रदर्शनाच्या माध्यमातून ठिबक, पॉलिहाउस, शेततळे, पशुधनासंदर्भातील आधुनिक प्रयत्न, वेगवेगळ्या औषधांची माहिती आपल्याला एकाच ठिकाणी मिळाल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी नोंदविल्या. याबरोबर नावीन्यपूर्ण अवजाराबाबतही माहिती घेतली. अनेकांनी संपर्क क्रमांक घेऊन भविष्यातील संवाद दृृृृढ करण्याचा प्रयत्न केला. 

जमीन सुपीकतेचा ‘ॲग्रोवन’चा संकल्प

पीकवाढीसाठी जमिनीची सुपीकता ही खूप महत्त्वाची ठरते. यंदा ‘अॅग्रोवन’ने जमिनीच्या सुपीकतेवरच जास्तीत जास्त जागृती करण्याचा संकल्प केला आहे. याअंतर्गत या प्रदर्शनातही जमिनीच्या सुपीकतेवर अनेक तज्ज्ञांनी आपले मत मांडले. याला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.

व्याख्यानांना प्रतिसाद

प्रदर्शनात आयोजित ॲग्रोसंवाद या शेतीविषयक व्याख्यानाला शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. विशेषकरून ऊस व द्राक्षविषयक व्याख्यानांना शेतकऱ्यांनी उच्चांकी गर्दी करून व्याख्यात्या तज्ज्ञांकडून किफायतशीर शेतीची सूत्रे जाणून घेतली. याचबरोबर डाळिंब शेतीतील विविध योजना, पशुव्यवस्थापनातील बारकावे याबाबत तज्ज्ञांनी दिलेली माहिती शेतकऱ्यांना उपयुक्त ठरली. अनेक शेतकऱ्यांनी व्याख्यात्यांना शेताची पाहणी करण्याचे निमंत्रण देऊन संवादाचा पूल बळकट केला.

 

इतर ताज्या घडामोडी
यंदा पीक आणि पाऊस साधारण : भेंडवळच्या...भेंडवळ जि. बुलडाणा : या हंगामात पीक आणि पाऊस...
मराठवाड्यासाठी २० सौरऊर्जा प्रकल्पांना... लातूर ः मराठवाड्यातील विजेची गरज लक्षात घेऊन...
तयारी हळद लागवडीची...हळद लागवडीसाठी चांगले उत्पादन देणाऱ्या जातींची...
सांगली जिल्ह्यात खंडित वीजपुरवठ्याने... सांगली  : कृष्णा आणि वारणा नदीचे पाणी...
मराठवाड्यातील ३२१ गावांना ३९६...औरंगाबाद  : मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांत...
मिरजगाव येथे यंत्रणा सुरळीत, मात्र... नगर : तूर, हरभरा खरेदीसह अन्य बाबी ऑनलाइन...
नांदेड विभागातील २४ कारखान्यांचा गाळप... नांदेड :  नांदेड विभागातील यंदा गाळप सुरू...
व्यापाऱ्यांकडून फसवणूक : मनमाड बाजार...मनमाड, जि. नाशिक  : मनमाड कृषी उत्पन्न बाजार...
जळगाव येथे आंबा ४५०० ते ८००० रुपये... जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
कृषिपंपांच्या वीज थकबाकीवरून...मुंबई  ः सुमारे २३ हजार कोटी रुपयांच्या कृषी...
आमदार-खासदारांची धोरणे व्यापारीहिताचीपरभणी  ः आमदार-खासदारांनी संघटित होऊन...
पीकविमा परताव्यासाठीचे अन्नत्याग आंदोलन...परभणी  ः जिल्ह्यातील पीकविमा परताव्यापासून...
गुजरातमध्ये उन्हाळी पीक लागवड क्षेत्रात...मुंबई : सरदार सरोवर प्रकल्पातील कमी ...
`जलयुक्त`साठी पुणे जिल्ह्यातील 221...पुणे  ः पाणीटंचाई कमी करण्यासाठी राज्य...
नगर जिल्ह्यात ‘नरेगा’तून साडेसहा हजार... नगर  ः ग्रामीण भागात मजुरांना रोजगार...
मराठवाड्यातील लघू प्रकल्पांत १४ टक्के... औरंगाबाद  : एकीकडे उष्णतेचे प्रमाण वाढत...
बुलडाण्यातील सात हजारांवर कृषिपंपांची... बुलडाणा  ः जिल्ह्यात सद्यःस्थितीत सात...
बुलडाण्यात सोयाबीन क्षेत्र वाढण्याची... बुलडाणा  ः गेल्या हंगामात बीटी कपाशीवर...
कोल्हापूर जिल्ह्यातील गाळप हंगाम आटोपला कोल्हापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप...
तीन लाख ७२ हजार टन खतसाठा तीन...परभणी :  नांदेड, परभणी, हिंगोली...