Agriculture news in marathi; Agricultural implements plan | Agrowon

धुळे ः कृषी यांत्रिकीकरण योजनेतून मिळणार अवजारे
टीम अॅग्रोवन
बुधवार, 12 जून 2019

देऊर,  जि. धुळे  ः शासनाच्या उन्नत शेती-समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत २०१९-२० या वर्षासाठी कृषी विभागातर्फे कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यात येत आहे. यातून विविध अवजारे दिली जाणार आहेत. त्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी २० जूनपर्यंत कृषी विभागाकडे अर्ज सादर करायचे आहेत. 

देऊर,  जि. धुळे  ः शासनाच्या उन्नत शेती-समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत २०१९-२० या वर्षासाठी कृषी विभागातर्फे कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यात येत आहे. यातून विविध अवजारे दिली जाणार आहेत. त्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी २० जूनपर्यंत कृषी विभागाकडे अर्ज सादर करायचे आहेत. 

शेतीचा वाढता खर्च, मजुरांची कमी उपलब्धता यामुळे यंत्रांद्वारे शेती करणे आता आवश्‍यकच झाले आहे. अनुदानास पात्र यंत्र- अवजारांमध्ये ट्रॅक्‍टर (२० ते ७० एचपी) पॉवर टिलर, कल्टिव्हेटर, पलटी नांगर, रोटाव्हेटर, सबसॉईलर, पॉवर वीडर, मळणी यंत्र, पॉवर ऑपरेटेड स्प्रेयर, मिनी डाळ मिल व राइस मिल, रिपर व पॅकिंग मशिन आदी यंत्रे, अवजारे मिळतील. शेतकऱ्यांनी मंडळातील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडल कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज जमा करावेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी यांत्रिकीकरणाचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन मंडल कृषी अधिकारी अमृत पवार यांनी केले. 

यात अनुसूचित जाती-जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी व महिला लाभार्थ्यांसाठी कमाल अनुदान मर्यादा ५० टक्के आहे. इतर लाभार्थ्यांसाठी कमाल अनुदान मर्यादा ४० टक्के आहे. कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी जिल्ह्यास प्राप्त होणाऱ्या निधीच्या लक्ष्यांकाच्या मर्यादेतच लाभार्थींची निवड करण्यात येईल. जे शेतकरी ट्रॅक्‍टरचलित यंत्र, अवजारांसाठी अर्ज करतील त्यांनी अर्जासोबत त्यांच्याकडे किंवा कुटुंबातील अन्य सदस्यांच्या नावे ट्रॅक्‍टर असल्याबाबतचा पुरावा (आरसी बुक) अर्जासोबत जोडणे आवश्‍यक आहे.

प्रत्येक अवजारासाठी शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात स्वतंत्र अर्ज करणे आवश्‍यक आहे. ज्या शेती अवजारास जास्तीत जास्त अनुदान देय आहे त्या एकाच यंत्र अथवा अवजारास अनुदान दिले जाईल. अर्जाचा विहित नमुना तालुका कृषी अधिकारी कार्यालय व कृषी विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. लाभार्थी निवड करताना ज्येष्ठता क्रमवारी तालुका हा घटक मानून तालुका स्तरावरच सोडत पद्धतीने निश्‍चित करण्यात येणार आहे. त्यानुसार उपलब्ध निधीच्या अनुषंगाने पूर्वसंमती दिली जाईल. पूर्वसंमती दिल्यानंतर एक महिन्याच्या आत यंत्र अवजार खरेदी करून अनुदानासाठीचा प्रस्ताव सादर करावा लागेल. 

इतर बातम्या
सिंधुदुर्ग जिल्हयात मुसळधार पाऊस (video...सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात बुधवारी (ता....
नाशिक तालुक्यात गारपिटीने द्राक्ष...नाशिक  : मागील आठवड्यात झालेल्या गारपिटीचा...
नत्र कमतरतेत मुळांच्या वाढीसाठी कार्यरत...जमिनीमध्ये नत्राची कमतरता असताना नत्राची पूर्तता...
जालना, औरंगाबाद, बीड, उस्मानाबादेत पाऊस...औरंगाबाद  : मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील...
दीड टक्‍क्‍यावर मराठवाड्यातील पाणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८७२ प्रकल्प व...
‘संत्रा उत्पादकांना द्या भरीव मदत’नागपूर ः उन्हामुळे संत्रा उत्पादकांचे झालेल्या...
कोल्हापुरात कर्नाटकी बेंदूर उत्साहातकोल्हापूर : शहर व जिल्ह्यात मंगळवारी कर्नाटकी...
नाशिक जिल्ह्यात गोवर्धन गोवंश सेवा...नाशिक  : नाशिक जिल्ह्यातील आठ महसुली...
नांदेड, परभणी, हिंगोली : सहा लाखांवर...नांदेड : पंतप्रधान किसान सन्मान योजनेची व्याप्ती...
वाशीम जिल्ह्यात पंतप्रधानांच्या पत्राचे...वाशीम : आगामी पावसाळ्यात पावसाच्या पाण्याचे...
जलसंवर्धन कामांची राजू शेट्टींनी केली...बुलडाणा ः दुष्काळावर मात करण्यासाठी जलसंवर्धनाची...
सोलापुरात साडेबारा कोटी रुपयांची ६६...सोलापूर : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी...
कर्ज नाकारणाऱ्या बॅंकांवर गुन्हे नोंदवू...सोलापूर : खरीप हंगामात किती शेतकऱ्यांना...
पीकविमा, दुष्काळी मदतीसाठी शेतकऱ्यांचा...माळाकोळी,जि.नांदेड : गतवर्षीच्या खरीप पिकांच्या...
विधिमंडळ प्रतोदपदी आमदार आकाश फुंडकर बुलडाणा ः जिल्ह्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघाचे...
बचत गट चळवळ बनली गावासाठी आधारनागठाणे, जि. सातारा : ‘गाव करील ते राव काय करील’...
नगरमध्ये चांगला पाऊस पडेपर्यंत छावण्या...नगर : नगर जिल्ह्यामध्ये ४९८ छावण्या सुरू आहेत....
पुणे : पावसाअभावी खरीप पेरण्या खोळंबल्यापुणे ः जूनचा अर्धा महिना ओलांडला तरी अजूनही...
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी...मुंबई  शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा झालाच...
राज्य अर्थसंकल्प : सर्वसमावेशक ‘निवडणूक...मुंबई : राज्यात मोसमी पाऊस लांबला असला तरी आगामी...