agriculture news in Marathi, agricultural produce marketing committees are not interested in purchase of agri product grading and sieving equipment's, Maharashtra | Agrowon

शेतीमालाची प्रतवारी, चाळणी सामग्री बसविण्यास बाजार समित्या नाखूष
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 डिसेंबर 2017

पुणे : शेतीमालाची प्रतवारी व चाळणी सामग्री बसविण्यास राज्यातील बाजार समित्या नाखूष आहेत. मात्र, राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून (आरकेव्हीवाय) बाजार समित्यांना सामग्री पुरविण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

पुणे : शेतीमालाची प्रतवारी व चाळणी सामग्री बसविण्यास राज्यातील बाजार समित्या नाखूष आहेत. मात्र, राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून (आरकेव्हीवाय) बाजार समित्यांना सामग्री पुरविण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

बाजार समित्यांचा कायदा अस्तित्वात येऊन ४० वर्षे उलटल्यानंतरही बहुतेक समित्यांमध्ये प्रतवारी (ग्रेडिंग), वजन आणि चाळणी किंवा निसवण करण्याची सामग्री उपलब्ध नाही. कायद्यानुसार प्रतवारी, वजन व निसवण झाल्यानंतरच शेतीमालाची खरेदी करावी लागते. तथापि, अनेक बाजार समित्यांनीही सामग्री न बसविल्यामुळे दलाल, व्यापाऱ्यांचे फावले आहे, असे पणन विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे.

‘‘बाजार समित्यांकडून कोट्यवधी रुपयांचे गाळे बांधले जातात. मात्र, ही सामग्री खरेदी केली जात नाही. त्यामुळे सामग्री खरेदीला बाजार समित्या नाखूष असल्या तरी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ही सामग्री पुरविण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाची अंमलबजावणी झाल्यास शेतकरी व बाजार समित्यांमधील तंटे काही प्रमाणात कमी होतील,’’ असा दावा पणन विभागाने केला आहे.

राज्यातील बहुतेक बाजार समित्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक वजन काटे लावण्यात आलेले नाही. शेतकऱ्याने आणलेल्या शेतीमालाचे आधी वजनकाट्यावर वजन करून त्याची काटापावती बाजार समितीने शेतकऱ्यांना देणे बंधनकारक आहे. मात्र, बाजार समित्या व दलालांचे संगनमत असल्यामुळे काटापावती दिली जात नाही. कारण पावती दिल्यास शेतकऱ्याचा माल बाजार समितीत आल्याचा पहिला पुरावा तयार होतो, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या म्हणण्यानुसार, बाजार समित्यांमध्ये हमीभावाचा मुद्दा उपस्थित होऊ नये म्हणून शेतकऱ्यांकडून सोयाबीन आणले तरी काटापावती मात्र ज्वारीची देण्याचा प्रकार होत आहेत. ‘‘बाजार समित्या शेतकऱ्यांच्या मालकीच्या असतानाही तेथे दलालांचा सुळसुळाट झाला आहे. त्यातून शेतकऱ्यांची लूट होत असून, पणन संचालनालयाने चुकीच्या प्रथांना आवर घातला पाहिजे,’’ असेही श्री. पाटील यांचे म्हणणे आहे.

इतर अॅग्रो विशेष
भारतातील १ टक्का श्रीमंतांकडे ७३ टक्के...दावोस  ः गेल्या वर्षभरात देशात निर्माण...
किमान तापमानात घट; नगर ९.४ अंशांवरपुणे ः विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात...
नागपुरात तुरीच्या दरात घसरणनागपूर : येथील कळमणा बाजारात आठवड्याच्या...
देशात खालावत आहे जमिनीचे आरोग्यनागपूर : खोल मशागत, नियंत्रित खत व्यवस्थापनाला...
बोंड अळी भरपाईसाठी सुनावणी आजपासूनपुणे : राज्यात शेंदरी बोंड अळीमुळे...
तूर खरेदी अडकली नोंदणीतचलातूर ः तेलंगणा, कर्नाटक राज्याने हमीभावाप्रमाणे...
कष्ट, अभ्यासातून जोपासलेली देवरेंची...नाशिक जिल्ह्यातील नाशिक सटाणा तालुक्याचा परिसर...
लसीकरणाअभावी दाेन काेटी पशुधनाचे...पुणे ः सुमारे ३० काेटींची निविदा मिळविण्यासाठी...
सिद्धेश्‍वर यात्रेतील बाजारात खिलार बैल...सोलापूरचे ग्रामदैवत श्री. सिद्धेश्‍वर...
जिरायती शेती विकासातून थांबेल स्थलांतरमराठवाडा आणि विदर्भ विभागातील जिरायती शेतकरी...
संभ्रम दूर करामागील खरीप हंगामात चांगल्या पाऊसमानाच्या...
मुद्रा योजनेच्या १० लाखांपर्यंतच्या...कोल्हापूर : तरुणांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर...
रब्बीचा ६१.८ दशलक्ष हेक्टरवर पेरानवी दिल्ली ः भारतातील रब्बी क्षेत्रात यंदा गेल्या...
प्रशिक्षणांना दांड्या मारणाऱ्या...अकोला : अधिकारी, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता...
ठिबक अनुदानासाठी ७६४ कोटींचा निधीपुणे: राज्यात ठिबक संच बसविलेल्या शेतकऱ्यांना...
मराठवाड्यात ४३ टक्‍के जमीन चुनखडऔरंगाबाद : मराठवाड्यातील जमिनीचा पोत दिवसेंदिवस...
दशकातील सर्वांत मोठ्या कापूस आयातीचे...जळगाव ः महाराष्ट्रासह काही प्रमुख कापूस उत्पादक...
कांदा निर्यात मूल्यात १५० डॉलरने कपातनवी दिल्ली : केंद्र सरकारने कांद्यावरील...
जमीन आरोग्यपत्रिकांसाठी एप्रिलपासून '...पुणे ः महाराष्ट्रात सुरू असलेल्या जमीन...
फक्त फळ तुमचे, बाकी सारे मातीचे..! नैसर्गिक शेतीचे प्रणेते म्हणून संपूर्ण...