agriculture news in marathi, agricultural research, Sachindrapratap Singh, akola | Agrowon

शेती संशोधनासाठी प्रयत्न करणार : सचिंद्रप्रताप सिंह
गोपाल हागे
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामार्फत शेती आणि शेतकरी विकासासाठी अत्यावश्यक संशोधन आणि तत्सम बाबींसाठी सर्वंकष प्रस्ताव आल्यास सकारात्मक दृष्टिकोनातून राज्य शासनामार्फत मंजुरीसाठी आपण स्वतः प्रयत्न करू, असे आश्वासन राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांनी दिले.

अकोला दौऱ्यावर असताना श्री. सिंह यांनी विद्यापीठाला भेट दिली. या वेळी कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक झाली. या प्रसंगी ‘महाबीज’चे कार्यकारी संचालक ओमप्रकाश देशमुख यांच्यासह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. ए. निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामार्फत शेती आणि शेतकरी विकासासाठी अत्यावश्यक संशोधन आणि तत्सम बाबींसाठी सर्वंकष प्रस्ताव आल्यास सकारात्मक दृष्टिकोनातून राज्य शासनामार्फत मंजुरीसाठी आपण स्वतः प्रयत्न करू, असे आश्वासन राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांनी दिले.

अकोला दौऱ्यावर असताना श्री. सिंह यांनी विद्यापीठाला भेट दिली. या वेळी कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक झाली. या प्रसंगी ‘महाबीज’चे कार्यकारी संचालक ओमप्रकाश देशमुख यांच्यासह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. ए. निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.

शेतीचे पुनर्वैभव प्राप्तीसाठी विद्यापीठ, महाबीज आणि कृषी विभाग यांनी संयुक्त प्रयत्नांतून कार्य करावे, असे सांगतानाच राज्याचा कृषी विभागसुद्धा आपल्यासोबत सक्षमतेने असल्याचे त्यांनी नमूद केले.

या वेळी विद्यापीठाच्या संशोधकांनी विभागनिहाय सादरीकरण करीत विद्यापीठाचे संशोधन, शिफारशींसह भविष्यातील योजना अधोरेखित केल्या. महाबीजच्या माध्यमातून विद्यापीठाचे कार्यच शेतकऱ्यांच्या बांधावर पोचत असल्याचे श्री. ओमप्रकाश देशमुख यांनी आपल्या मनोगतात सांगितले. कृषी शिक्षण, संशोधन आणि कृषी विस्तारात पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सर्वोत्कृष्ट कार्य करीत देशपातळीवर गौरव प्राप्त केला अाहे.

विद्यापीठ शास्त्रज्ञ, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि कामगारांचे अथक परिश्रमाचे हे फलित असल्याचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी आपले अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले. वैदर्भीय शेती आणि शेतकरी विकासाच्या आमच्या उपक्रमात राज्य शासन, कृषी विभाग, महाबीज आणि इतर सेवाभावी संस्थांचासुद्धा उल्लेखनीय सहभाग असल्याचे त्यांनी नमूद केले.

पुढील काळातील नियोजन प्रभावीपणे राबविण्यासाठी आमचा संपूर्ण चमू तत्पर असल्याचे सांगतानाच डॉ. भाले यांनी राज्य तथा केंद्र शासनाकडून भरीव सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. प्रक्षेत्र भेटीदरम्यान श्री. सिंह यांनी विद्यापीठाचे सेंद्रिय शेती विभाग, तणव्यवस्थापन विभाग, उद्यानविद्या विभाग, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, जैवतंत्रज्ञान विभागाना भेटी देत येथील उपलब्धी जाणून घेतल्या व सुधारित प्रस्ताव सादर करण्यासाठी उपयुक्त सूचना केल्या.

याभेटी प्रसंगी विद्यापीठ कुलसचिव डॉ. प्रकाश कडू,  कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. महेंद्र नागदेवे, सहयोगी संशोधन संचालक डॉ. आदिनाथ पसलावार, कुलगुरू कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. शशांक भराड, कुलगुरूंचे तांत्रिक सचिव डॉ. नीरज सातपुते, कुलगुरूंचे स्वीय सहायक सुहास कोळेश्वर, डॉ. अजय सदावर्ते, डॉ. जयंत देशमुख यांच्यासह विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांची उपस्थिती होती.

इतर बातम्या
कायद्याचे बोला...शेतीमालाच्या भावात वारंवार चढ-उतार होत असल्यामुळे...
तूर, हरभरा खरेदीचे तीनतेरापुणे : राज्यात यंदाच्या हंगामात (२०१७-१८)  ...
गैरव्यवहारप्रकरणी कृषी अधिकाऱ्यांवर...मुंबई : नाशिक येथील कृषी सहसंचालक कार्यालयात...
सरकारी खरेदीच्या खेळखंडोब्यामुळे...पुणे : आधारभूत किमतीने शेतमाल खरेदीचा...
विदर्भात पोचली ‘एचटी’ची पाकिटे?नागपूर : गेल्या हंगामात पुरवठा झालेल्या अनधिकृत ‘...
तूर खरेदीत कर्नाटकची महाराष्ट्रावर आघाडीपुणे : तूर खरेदीच्या बाबतीत महाराष्ट्र...
राज्य सहकारी संघ पदाधिकारी निवडणूक...पुणे  : महाराष्ट्र राज्य सहकारी संघ...
सरकारी खरेदीतील अडथळे दूर करण्यासाठी...राज्यात गेल्या वर्षी खरेदी केलेली तूर...
गोदाम नसल्यामुळे शेतीमाल खरेदीला ब्रेकराज्य सरकारने `नाफेड` या नोडल एजन्सीच्या...
शासकीय खरेदीचे दुखणे अन् भावांतराची...राज्यात यंदा खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांतील...
उत्पादकता निकषामुळे तूर उत्पादकांना...नगर ः आधारभूत किमतीने तुरीची खरेदी करण्यासाठी...
शेतीमाल खरेदीतील भ्रष्टाचार रोखणे आवश्यकपुणे : सरकारने हमीभावाने शेतमाल खरेदी करण्यासाठी...
हमीभावाने शेतीमाल विकताना कशाचीच निश्‍...पुणे :  शेतीमालाचे दर कोसळल्यानंतर...
वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी जंगलांना...पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेण्याच्या...
शासनाची हमीभाव खरेदी केंद्रे व्यापारी...पुणे ः शेतकऱ्यांचा शेतीमाल घरात असताना हमीभावाने...
तत्काळ चुकाऱ्याची केवळ घोषणाचअकोला ः या हंगामात हमीभावाने सुरू असलेली खरेदी...
तापमानात वाढ होण्याची शक्यतापुणे : राज्यात मंगळवारपासून बहुतांशी ठिकाणी...
अन्नदात्यासाठी राज्यभरात ‘अन्नत्याग’पुणे ः राज्यातील पहिल्या शेतकरी आत्महत्येचा...
कृषिसेवक परीक्षा संशयास्पद; विद्यार्थी...पुणे : कृषिसेवक पदाच्या ९०३ जागांसाठी राज्यात...
परभणीतील एक लाख ३३ हजार शेतकऱ्यांना... परभणी  ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी...