agriculture news in marathi, Agricultural University's seed will be available in Solapur | Agrowon

कृषी विद्यापीठाचे बियाणे सोलापुरातच मिळणार
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

सोलापूर : ‘‘कृषी विद्यापीठाच्या वाणासाठी शेतकऱ्यांचा राहुरीपर्यंतचा पाठपुरावा थांबण्यासाठी यापुढे ज्वारी, बाजरी, चवळी, तूर आदी खरीप आणि रब्बी हंगामात मागणी असणाऱ्या कृषी विद्यापीठाच्या सर्व बियाण्यांची विक्री सोलापुरातील संशोधन केंद्रावर कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात येईल,''असे आश्‍वासन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यांनी गुरुवारी (ता. ६) येथे दिले.

सोलापूर : ‘‘कृषी विद्यापीठाच्या वाणासाठी शेतकऱ्यांचा राहुरीपर्यंतचा पाठपुरावा थांबण्यासाठी यापुढे ज्वारी, बाजरी, चवळी, तूर आदी खरीप आणि रब्बी हंगामात मागणी असणाऱ्या कृषी विद्यापीठाच्या सर्व बियाण्यांची विक्री सोलापुरातील संशोधन केंद्रावर कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात येईल,''असे आश्‍वासन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यांनी गुरुवारी (ता. ६) येथे दिले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या येथील विभागीय कृषी संशोधन केंद्रातर्फे कृषी विभाग आणि आत्मा यांच्या सहकार्याने संशोधन केंद्राच्या मुळेगाव प्रक्षेत्रावर खरीप पीक प्रात्यक्षिके व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. गडाख बोलत होते. जिल्हा  अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, आत्माचे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे, सहयोगी संचालक डॉ. विजय अमृतसागर, ज्वारी संशोधन केंद्राचे प्रभारी डॉ. के. के. शर्मा, माजी संचालक डॉ. एस. पी. काळे, सीताफळ संघाचे नवनाथ कसपटे, प्रगतिशील शेतकरी सुनील घाटुळे, मोहोळ कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. दिनेश नांद्रे, प्रभारी समन्वयक डॉ. तानाजी वळकुंडे, डॉ. आर.आर. कदम आदी यावेळी उपस्थित होते.

डॉ. गडाख म्हणाले, ‘‘कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांच्या गरजांवर आधारित संशोधन केले. उत्पादनवाढ हे तंत्र त्यामध्ये आहेच, पण शास्त्रशुद्ध आणि गुणवत्ता याचीही जोड त्याला दिली. त्यामुळेच कृषी विद्यापीठाच्या वाणांना मागणी वाढते आहे. ज्वारी, तूर, बाजरी ते अगदी चवळी, हुलगा या वाणांची मागणी शेतकऱ्यांकडून होते. सोलापूरच्या मालदांडी ज्वारीने तर यामध्ये फार पूर्वीपासूनच उच्चांक केला आहे. विभागीय कृषी संशोधन केंद्राने यासाठी शेतकऱ्यांना पंचसूत्री देऊन ज्वारीचे उत्पादन वाढवले. अगदी मूलस्थानी जलसंधारण, बांधबंदिस्ती ते कोळपणी यासारख्या छोट्या-छोट्या तंत्राचा अवलंब त्यामध्ये आहे. त्यामुळे २५ ते ३५ टक्‍क्‍यांपर्यंतची उत्पादनवाढ या तंत्राने ज्वारीसाठी दिली.'' विद्यापीठाचे कोरडवाहू शेतीचे तंत्रज्ञान आत्मसात करा, कमी खर्चाची शेती करा, असे आवाहनही त्यांनी केले.

बिराजदार म्हणाले, ‘‘पावसाअभावी जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून चढ-उतार आहे. खरीप, रब्बीतील पिकाखालील क्षेत्रात घट होते आहे. खरिपाचे एकूण ३ लाख हेक्‍टरवरील क्षेत्र २ लाखावर आले आहे, तर रब्बी ज्वारीचे ७ लाख हेक्‍टरचे क्षेत्र आज चार लाख हेक्‍टरवर आले आहे. शेतकऱ्यांनी पाण्याबाबत जागरूक राहणे, पाणी साठवणे, पुनर्भरण यासारख्या विषयावर काम करण्याची गरज आहे.

'' पाऊसमान कमी असतानाही कृषी संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावरील पिके जोमदार आहेत, यामागे तंत्रज्ञान कारणीभूत आहे, असे बरबडे यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
सातारा जिल्हा बॅंक देणार मध्यम मुदत...सातारा :  स्थापनेपासून गेल्या ६८ वर्षांत...
औरंगाबादेत हिरवी मिरची ४००० ते ५०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
जळगाव : खरिपाचा रासायनिक खतपुरवठा रखडलाजळगाव : रासायनिक खतांचा खरिपासंबंधीचा पुरवठा...
दुष्काळी मदतीची गावनिहाय माहिती जाहीर...मुंबई  : राज्यातील बहुतांश...
पाण्यासाठी भीमा नदीपात्रात ठिय्या आंदोलन मांडवगण फराटा, जि. पुणे  : घोड आणि...
निम्‍न दुधना धरणाच्या पाण्यासाठी...परभणी : दुष्काळामुळे मानवत तालुक्यातील दुधना...
‘उजनी’काठच्या शेतकऱ्यांची पिके...भिगवण, जि. पुणे   ः प्रशासनाच्या...
पुणे जिल्ह्यातील धरणे तळाशीपुणे  : जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा...
अकोल्यातील खरीप आढावा बैठक...अकोला  ः शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या...
दुष्काळ निवारणासाठी सातारा जिल्हा...सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्‍...
फळबागेत पाणी साठवण कुंड कोकणातील जांभ्या जमिनीमध्ये पाण्याच्या निचऱ्याचे...
फणस लागवड  उष्ण व दमट हवामान फणस पिकाला मानवते....
ऊसवाढीच्या टप्‍प्यानुसार द्या पुरेसे...जमिनीच्या प्रकारानुसार योग्य ठिबक सिंचन पद्धतीची...
पोटदुखीवर पेटाराच्या सालीचा काढा उपयुक्तस्थानिक नाव    : पेटार, पेटारी,...
उष्ण, कोरडे हवामान मॉन्सून वाटचालीस...महाराष्ट्राच्या पश्‍चिम भागावर १००८ हेप्टापास्कल...
भंगाराम तळोधी येथे राइसमिलवर कारवाईचंद्रपूर ः कृषी विभागाला मिळालेल्या गोपनीय...
परभणीत कोबीला प्रतिक्विंटल १२०० ते २०००...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
नाशिक जिल्ह्यातील ५४३ गावांची...नाशिक ः गावठाण निश्‍चितीसाठी गावांमध्ये ग्रामसभा...
नाशिक : टँकरने पाणीपुरवठ्यासाठी जीपीएस...नाशिक : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती अधिक जाणवू...
अनुदानाअभावी चारा छावण्या संकटातबिजवडी, जि. सातारा : माण तालुक्‍यामध्ये १९७२...