agriculture news in marathi, Agriculture 2022-New Initiative will be hosted in New Delhi | Agrowon

‘कृषी २०२२ - नवी सुरवात’वर होणार राष्ट्रीय चर्चा
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली : देशातल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर केंद्रातील मोदी सरकारने याकरिताची दिशादर्शक चर्चा प्रक्रिया सुरू केली आहे. याच मुद्द्यावर १९ आणि २० फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी व कृषिमंत्री राधामोहनसिंह आदी उच्चपदस्थ देशभरातील २५० तज्ज्ञांसोबत येथे चर्चा करणार आहेत. 

नवी दिल्ली : देशातल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर केंद्रातील मोदी सरकारने याकरिताची दिशादर्शक चर्चा प्रक्रिया सुरू केली आहे. याच मुद्द्यावर १९ आणि २० फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी व कृषिमंत्री राधामोहनसिंह आदी उच्चपदस्थ देशभरातील २५० तज्ज्ञांसोबत येथे चर्चा करणार आहेत. 

‘कृषी २०२२-नवी सुरवात’ या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे येथे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्याचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याबाबत राष्ट्रीय कृषी चर्चासत्रात ऊहापोह होणार आहे. सामान्य शेतकऱ्यांपासून ‘नाफेड’ व ग्रामीण बॅंकांपर्यंतचे प्रतिनिधी यात सहभागी होणार असल्याची माहिती राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली.

‘पुसा’ संस्थेत होणाऱ्या या चर्चा-संवाद कार्यक्रमासाठी एकूण सात गटांची रचना करण्यात आली आहे. असे सांगून ते म्हणाले, की उत्पादन ते विक्री या साखळीतल्या विविध विषयांबाबत हे गट तयार केले गेले आहेत. त्यातल्या एका गटाचे नेतृत्व मी करीत आहे. पिकाची काढणी झाल्यावर काय काय प्रक्रिया आवश्‍यक आहेत, याबाबत मी सादरीकरण करणार आहे. यावर कुणाच्या सूचना असल्यास pashapatelforfarmer@gmail.com या मेल आयडीवर पाठवाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

२४ जानेवारीला याबाबतची प्राथमिक बैठक झाली होती. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा करून मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. 

यांच्या नेतृत्वाखाली आहेत सात अभ्यास गट...
१) डॉ. के. व्ही. राजू (इक्रिसॅट), डॉ. सतीश चंदर, महासंचालक, भारतीय खत संघ, डॉ. जावेद रिझवी.
२) प्रा. वसंत गांधी, आयआयएम, अहमदाबाद
३) पाशा पटेल, अध्यक्ष, राज्य कृषिमूल्य आयोग, प्रा. सुखपाल सिंग, महासंचालक, सीआरआरआयडी
४) डॉ. डेव्हिड बर्गविन्सन, महासंचालक, (इक्रिसॅट), सुब्रतो बागची
५) एल रिनाझ, एस. के. मल्होत्रा, केंद्रीय आयुक्त
६) किरीट शिलत
७)) ए. एस. नंदा, कुलगुरू, गुरंदगड विद्यापीठ, पंजाब

इतर अॅग्रो विशेष
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...
रसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय...जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी...
बॅंक अधिकारी झाला पूर्णवेळ प्रयोगशील...विशाखापट्टण व त्यानंतर हैद्रराबाद येथे खासगी...
स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...
पूर्व विदर्भात गारपीटपुणे  ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...
जनावराच्या आहारात पाणी महत्त्वाचेजनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन...
राज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...
दरामुळे साखरेचा रंग फिकाकोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही...
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...