agriculture news in marathi, agriculture commisionar appeal to farmers should focus on fodder crops, pune, maharashtra | Agrowon

शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः कृषी आयुक्त
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

ग्रामीण भागात दुष्काळी स्थितीत पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन करावे लागेल. केंद्र व राज्य शासन त्यासाठी ठिबक धोरणाला प्रोत्साहन दिले आहे. राज्याला गेल्या हंगामात ८०० कोटी रुपये ठिबक अनुदानासाठी मिळाले. अनुदान मागणी अर्ज सुविधादेखील वर्षभर खुली ठेवण्यात आली आहे.
- सच्चिंद्र प्रताप सिंह, कृषी आयुक्त.

पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी क्षेत्राला दुष्काळाला सामोरे जावे लागणार आहे. शेतकऱ्यांनी न डगमगता नैसर्गिक आपत्तीशी सामना करावा. विशेषतः चारा पिकांवर आता भर द्यावा लागेल, असा सल्ला कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी दिला आहे.

राज्यातील १५१ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला आहे. ११२ तालुक्यात गंभीर आणि ३९ तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ सरकारने जाहीर केला आहे. त्यासाठी अत्यावश्यक असलेली सर्व माहिती श्री. सिंह यांच्या चमुनेच राज्य शासनाकडे सुपुर्द केली. त्याआधारावर केंद्र शासनाकडे अहवाल पाठविला आहे. राज्यात काही भागांत दुष्काळाची तीव्रता आहे. मात्र, सर्वत्र हिच स्थिती असल्याचे मानून नकारात्मक पद्धतीने पुढे जाता येणार नाही. पाणी असलेल्या शेतकऱ्यांनी आता चारा पिकांवर लक्ष वळवावे. पाऊस नसल्याने पाण्याअभावी रब्बी ज्वारी कमी होणार आहे. मराठवाड्यात अडचण जास्त आहे. पण, पाणी असलेल्या पट्ट्यांमध्ये पाण्याचे नियोजन करून चाऱ्यावर भर द्यावा लागेल, असेही श्री. सिंह म्हणाले. 

दुष्काळी स्थितीत चाऱ्याबाबत पशुसंवर्धन विभागाकडून स्वतंत्र नियोजन सुरू आहे. कृषी विभागदेखील प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्यांबरोबर आहे. फक्त जादा पाणी लागणारी पिके टाळता येतील का, याचा विचार आता प्रत्येकानेच करावा. जादा पाणी असलेली पिके घेऊच नका असे मी म्हणणार नाही. तथापि, किमान ठिबकवर तरी लागवड व्हावी, असे श्री. सिंह यांनी सांगितले.
 

इतर ताज्या घडामोडी
पूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन...पूर्णा, जि. परभणी ः परभणी जिल्ह्यातील पूर्णा,...
धुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९...धुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात...
परभणीत खरीप पीक विमा परताव्याचा घोळ...परभणी  : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...
कोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी...कोल्हापूर  : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा...
मराठवाड्यातील प्रकल्पांत २० टक्‍के...औरंगाबाद  : मराठवाड्यातील सर्वच...
कमी पाऊस : ‘जलयुक्त’ची कामे झालेल्या...नगर  ः जलयुक्त शिवार अभियानातून कामे करून...
हमीभाव, कर्जमुक्ती असेल तरच महाआघाडीत...बुलडाणा  : दीडपट हमीभाव आणि शेतकऱ्यांची...
पुणे विभागात ९२ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे   : विभागातील पाणीटंचाईची तीव्रता...
हजारो केळी रोपांचे रानडुकरांकडून नुकसानअकोला   ः सातपुड्यालगत असलेल्या अकोट...
पाण्याअभावी संत्रा तोडून फेकण्याची वेळअमरावती  ः पाण्याअभावी संत्र्याचा अपेक्षित...
बोदवडला मका खरेदीसाठी मुहूर्त मिळेनाबोदवड, जि. जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सिल्लोड तालुक्यात विहिरींसाठी दोन...सिल्लोड, जि. औरंगाबाद : वैयक्तिक लाभाच्या...
नांदेड, परभणी, हिंगोलीत सव्वा लाख...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
पुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कांदा पिकावरील फुलकिडीचे नियंत्रणकांदा पीक हे प्रामुख्याने खरीप, रब्बी हंगामात...
पशुसल्लासध्या महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कमी-जास्त...
नांदेड जिल्हा कर्जवाटपात मराठवाड्यात...नांदेड : जिल्ह्यात मुद्रा योजनेअंतर्गत १ लाख ५५...
कृषिपंप वीजजोडणीच्या प्रतीक्षेत पाचशेवर...देऊर, जि. धुळे : धुळे ग्रामीण उपविभागांतर्गत...
खानदेशातील ऊस गाळपात आर्यन शुगरने घेतली...जळगाव : खानदेशात सर्वाधिक तीन साखर कारखाने...
काजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी...पुणे  ः भविष्यातील इंधनाची टंचाई आणि आयात...