Agriculture News in Marathi, agriculture commisioner visit to pink bollworm affected cotton field, Aurangabad, maharashtra | Agrowon

...अखेर कृषी आयुक्‍त पोचले बांधावर !
टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 डिसेंबर 2017
औरंगाबाद  : कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कपाशी पिकावर बोंड अळीचे मोठ्या प्रमाणात आक्रमण झाले आहे. यामुळे झालेल्या नुकसानीची सोमवारी (ता. ४) थेट बांधावर जाऊन पाहणी करत कृषी आयुक्‍त एस. पी. सिंग यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून परिस्थिती जाणून घेतली. 
 
औरंगाबाद  : कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कपाशी पिकावर बोंड अळीचे मोठ्या प्रमाणात आक्रमण झाले आहे. यामुळे झालेल्या नुकसानीची सोमवारी (ता. ४) थेट बांधावर जाऊन पाहणी करत कृषी आयुक्‍त एस. पी. सिंग यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून परिस्थिती जाणून घेतली. 
 
मराठवाड्यात जवळपास साडेपंधरा लाख हेक्‍टरवर यंदा कपाशीची लागवड झाली आहे. लागवड झालेल्या कपाशीच्या एकूणच क्षेत्रावर बोंड अळीचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. या नुकसानीमुळे कृषी विभागाकडे जी फॉर्मच्या माध्यमातून तक्रारीचा अक्षरश: पाऊस पाडला जात आहे. औरंगाबाद जालना व बीड या तीनही जिल्ह्यांत तक्रारींची संख्या लाखांच्या पुढे गेली आहे. ॲग्रोवनने रविवारी (ता. ३)च्या अंकात बोंड अळीने जालना व औरंगाबाद जिल्ह्यांतील कपाशीवर अवकळा आल्याचे वृत्त प्रकाशित केले होते.
 
त्यामध्ये एकूण पेरणी क्षेत्राबरोबरच सर्वच क्षेत्र बाधित झाले असून, नुकसानीची पातळी, त्याचे निकष व शेतकऱ्यांना आधाराची असलेली गरज यावर प्रकाश टाकला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवारी (ता. ४) कृषी आयुक्‍त एस. पी. सिंग यांनी बोंड अळीने बाधित क्षेत्राची पाहणी करण्यासाठी औरंगाबाद व जालना जिल्हा गाठला.
 
औरंगाबाद जिल्ह्यातील खुल्ताबाद, फुलंब्री, औरंगाबाद तालुक्‍यातील काही गाव व शेतांना भेटी दिल्यानंतर जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्‍यातील कडेगावला भेट दिली. या सर्व भेटीदरम्यान कृषी आयुक्‍तांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे, बोंड अळीची तीव्रता, त्यांची कारणे शेतकऱ्यांकडून जाणून घेतली. 
 
या दौऱ्यादरम्यान कृषी आयुक्‍तांनी विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांचीही भेट घेत त्यांच्याशी बोंड अळीसंदर्भातील परिस्थितीवर चर्चा केली. या दौऱ्यादरम्यान औरंगाबादचे विभागीय कृषी सहसंचालक प्रतापसिंह कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, जालन्याचे अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, उपविभागीय कृषी अधिकारी धमेंद्र कुलथे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार, खुल्ताबादचे तालुका कृषी अधिकारी वैजीनाथ हंगे, सांख्यिकी अधिकारी कोलते अादी उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
देशातील रब्बी पेरणी माघारलीनवी दिल्ली  : देशभरात शुक्रवारअखेर (ता. ८)...
कुपोषण, प्रथिने जागृतीकडे लक्ष...पुणे : भारतात प्रथिनांच्या कमततेअभावी होणाऱ्या...
‘त्या’ कंपनीला काळ्या यादीत टाका :...लातूर ः येथील शासनाच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर...
रेशन धान्य दुकानदारांनी ई-पॉस मशिन...वडूज, जि. सातारा : रेशन घेण्यास आलेल्या...
भारनियमनामुळे शेती ऑफलाइननांदुरा, जि. बुलढाणा : शासनाने सर्व योजनांचे...
दूध संघांना अनुदान द्या : अरुण नरकेपुणे ः राज्य सरकारने दुधाला २७ रुपये प्रतिलिटरचा...
पुण्यात पालेभाज्यांची आवक टिकून; दर...पुणे : मार्केट यार्ड येथील भाजीपाला बाजारात सलग...
साहित्य संमेलनाध्यक्षपदी लक्ष्मीकांत...नागपूर : बडोदा येथे फेब्रुवारीत होणाऱ्या 91 व्या...
नरभक्षक बिबट्याला अखेर ठार मारलेमेहुणबारे/ पिलखोड/ चाळीसगाव : गिरणा परिसरात...
सरसकट कर्जमाफीसाठी होणार जेल भरो औरंगाबाद  ः शेतकरी, शेतमजूर, शेतीपूरक...
उद्धव ठाकरे गप्प बसा; अन्यथा रहस्ये...सांगली ः शिवसेना सोडण्याचे कारण उद्धव ठाकरे आहेत...
गिरणा धरणातून पहिले आवर्तन सोडलेचाळीसगाव :  गिरणा धरणातून सिंचनासाठीचे पहिले...
पीक नुकसानीचे दहा दिवसांत पंचनामे...औरंगाबाद : कापूस व धान पिकाच्या झालेल्या...
दक्षिण गुजरात, सौराष्ट्राचा कौल मतपेटीत...अहमदाबाद, गुजरात : येथील विधानसभेच्या पहिल्या...
रोहित्र दुरुस्तीचा विलंब भोवला; भरपाई...अकोला :  वीज रोहित्राची वेळेवर दुरुस्ती न...
व्यावसायिक कल्चरमुळे वाढते...खाद्यपदार्थ किण्वनातील जिवाणूंचा झाला अभ्यास...
बोगस बियाणे निर्मितीच्या संशयावरून...बुलडाणा : नांदुरा तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर...
कृषि सल्ला : पालेभाज्या, फळभाज्याडिसेंबर महिन्यात बहुतांश पालेभाजी पिकांची लागवड...
औरंगाबादेत कांदा १००० ते ३५०० रुपयेऔरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
मध्यम आकाराचे मांसभक्षक येतील पर्यावरण...मध्यम आकाराच्या मांसभक्षक प्राण्यांवर...