कृषी आयुक्त सिंह यांनी सूत्रे स्वीकारली
मनोज कापडे
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

यवतमाळचे जिल्हाधिकारी म्हणून धडाकेबाज कामगिरी करणारे श्री. सिंह हे आयएएस अधिकाऱ्यांच्या वर्तुळात एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. भंडारा, लातूर, परभणी, नांदेड या जिल्ह्यांमध्ये त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी म्हणून चांगली कामगिरी बजावली आहे. 

पुणे : राज्याच्या कृषी आयुक्तपदाची सूत्रे सचिंद्र प्रताप सिंह यांनी स्वीकारली आहेत. सुनील केंद्रेकर यांची अचानक बदली झाल्यामुळे नव्या आयुक्तांच्या आगमनाची कर्मचाऱ्यांना उत्सुकता होती. 

यवतमाळचे जिल्हाधिकारी म्हणून धडाकेबाज कामगिरी करणारे श्री. सिंह हे आयएएस अधिकाऱ्यांच्या वर्तुळात एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. भंडारा, लातूर, परभणी, नांदेड या जिल्ह्यांमध्ये त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी म्हणून चांगली कामगिरी बजावली आहे. 

श्री. सिंह यांना कृषी आयुक्तपदाची सूत्रे तत्काळ हाती घेण्याचा आदेश मंत्रालयातून मंगळवारी सांयकाळी मिळताच त्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय सोडले. गुरुवारी दुपारी ते विमानाने पुण्यात पोचले. कृषी आयुक्तालयात त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारून कामकाजाची प्राथमिक माहिती घेतली. 

कृषी विभागातील संचालक प्रल्हादराव पोकळे, विस्तार संचालक डॉ. एस. एल. जाधव, आत्माचे संचालक सुभाष खेमनर, गुणनियंत्रण संचालक अशोक लोखंडे व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांनी प्रशासकीय चर्चा केली. 

दरम्यान, श्री. केंद्रेकर यांच्या बदलीमुळे कृषी आयुक्तालयातील अनेक कर्मचारी नाराज आहेत. ‘‘श्री. केंद्रेकर यांच्यामुळे खात्याला शिस्त येत होती. त्यांना हटवून कृषी खात्याचे प्रशासकीय नुकसान झाले आहे. विनंतीवरून बदली झाल्याचे जरी म्हटले जात असले तरी आम्हाला ही विनंतीनुसार बदली वाटत नाही,’’ असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. 
श्री. केंद्रेकर यांना १०५ दिवस आयुक्तपदाची संधी मिळाली. त्यातील ३० दिवस प्रशिक्षणात गेली. यामुळे अवघे ७५ दिवस ते कृषी आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यामुळे त्यांची अचानक बदली होण्यामागे काय गौडबंगाल आहे याचा खुलासा अजूनही कर्मचाऱ्यांना झालेला नाही.  
 

इतर ताज्या घडामोडी
चार हजार एकरांतील बटाटा पीक गेले वायामंचर, जि. पुणे : आंबेगाव तालुक्‍यात सातगाव पठार...
मन्याड, बहुळा प्रकल्पांतील पाणीसाठ्यात... जळगाव : जिल्ह्यातील मृतसाठा स्थितीत गेलेले...
अकोला जिल्ह्यात करार तत्त्वावर पिकणार... अकोला ः केळीच्या उत्पादनासाठी जिल्ह्यातील अकोट...
तब्बल २५१ ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा...जळगाव : जिल्हाभरातील जवळपास २५१...
साडेसहा हजार शेतकऱ्यांचे तुरीचे चुकारे...परभणी : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या...
औरंगाबादमध्ये हिरवी मिरची १५०० ते १६००... औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पर्यावरणपूरक उपायातून पोल्ट्री...कॅनडा : येथील अंडी व त्यापासून पदार्थांचा वापर...
हरभरा पीक प्रात्यक्षिकातून धुळ्याला...धुळे : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत...
बेळगाव जिल्ह्यात ऊसटंचाईने गाळप... संकेश्‍वर, कर्नाटक ः बेळगाव जिल्ह्यातील काही...
शेतमाल विपणन यंत्रणा बदलायला हवी ः मोदी नवी दिल्ली ः शेतकरी अनेक समस्यांना तोंड देत...
प्रशासनाला समजते आंदोलनांचीच भाषा अकोला ः शासनाने या हंगामात सुरवातीला हमीभाव व...
तुरळक ठिकाणी हलक्‍या सरींचा अंदाजपुणे ः सध्या राज्यात अनेक भागांतील हवेचा दाब 1004...
रयत क्रांतीसमोर संघटना बांधणीचे अाव्हान कोल्हापूर : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी...
साताऱ्यातील प्रमुख धरणांत ९३ टक्‍क्‍...सातारा : जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या पाणलोट...
वऱ्हाडात पिकांचे नुकसान; प्रकल्पांतील...अकोला : गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण...
पालघर जिल्ह्यात पावसाने पिकांचे नुकसानवाडा, जि. पालघर  : तालुक्‍यात दोन दिवस...
खानदेशात पाऊस, वाऱ्यामुळे पूर्वहंगामी...जळगाव  ः जिल्ह्यासह नंदुरबार व धुळे...
कसमादे पट्टयात पावसामुळे कांदा पिकाला...देवळा, जि. नाशिक : येथील देवळा- चांदवडसह कसमादे...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांच्या भावना...जळगाव : कर्जमाफीची प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी राज्य...
सोलापूर जिल्ह्यातील भीमा, सीना...सोलापूर  ः पुणे जिल्ह्याकडून उजनी धरणाच्या...