कृषी आयुक्त केंद्रेकरांच्या बदलीची अफवा
टीम अॅग्रोवन
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

केंद्रेकर यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याला जर कोणी जाणूनबुजून त्रास देत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही.
- राजू शेट्टी, खासदार

पुणे : कृषी खात्याला शिस्त लावणारे विद्यमान कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या बदलीची जोरदार अफवा गेल्या काही दिवसांपासून राज्यभर पसरविली जात आहे. हितसंबंधींच्या दबावाला बळी पडून सरकार पातळीवरून श्री. केंद्रेकर यांना हटविले जाण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. हा दबाव दूर सारून ''खाणार नाही आणि खाऊ देणार नाही,'' हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अजेंडा तंतोतंत पाळणाऱ्या या प्रामाणिक अधिकाऱ्याला राज्य सरकार पाठिंबा देणार का, असाही सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. 

बेशिस्त खाते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृषी खात्याला आतापर्यंत कोणालाही वेसण घालता आली नव्हती. मात्र, श्री. केंद्रेकर यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच पहिला तडाखा घोटाळेबहाद्दरांना दिला आहे. ''घोटाळे थांबवा आणि प्रामाणिकपणे शेतकऱ्यांसाठी कामे करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असे स्पष्ट संदेश त्यांनी सुरवातीलाच दिला. 

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, श्री. केंद्रेकर यांच्या बदलीच्या केवळ अफवा पसरविल्या जात असून यात कृषी खात्यातील काही अधिकारीच त्यात सामील आहेत. जलसंधारण आयुक्तपदी श्री. केंद्रेकर यांची बदली झाल्याचे संदेश व्हॉट्सअॅपवरूनदेखील फिरत आहेत.

या आठवड्यात कृषी आयुक्तांनी बोलावलेली एक बैठक अचानक रद्द करण्यात आल्यानंतर बदलीची अफवा अजून जोरात पसरविण्यात आली. मुळात श्री. केंद्रेकर यांनी बोलावलेल्या बैठकीला राज्यातील सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पुण्यात येणार होते. मात्र, बैठकीच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याचा सहभाग असलेली व्हिडिओ कॉन्फरन्स ठेवली होती. त्यामुळे बहुतेक ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांकडून कृषी अधीक्षकांना जिल्ह्यात थांबण्याच्या सूचना मिळत होत्या. त्यामुळे कृषी अधीक्षकांची गैरसोय टाळण्यासाठी कृषी आयुक्तांनी बैठक रद्द केली, असे सूत्रांचे म्हणणे आहे.  

दरम्यान, कृषी खात्यातील एका भ्रष्ट कंपूकडून श्री. केंद्रेकर यांच्या बदलीसाठी गेल्या काही दिवसांपासून खरोखर खटपटी सुरू असल्याचे सांगितले जाते. कृषी खात्यातील एक संचालक मंत्रालयातील एका अधिकाऱ्याच्या कायम संपर्कात असून ''आम्हाला या जाचातून सोडवा'' अशी मागणी करीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मंत्रालयातील हा अधिकारी मंत्र्यांच्या जवळचा असून संचालकांच्या खास मर्जीतील समजला जातो. 

श्री. केंद्रेकर यांनी कृषी खात्यातील भ्रष्टाचाराची सर्व बिळे बुजवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. थेट शेतकऱ्यांच्या दारात जाऊन शेतीची स्थिती समजावून घेणे, भ्रष्ट अधिकारी व कंत्राटदारांना थारा न देणे, चुकलेल्या कर्मचाऱ्याला खडे बोल सुनावणे, अशी कामाची पद्धत ठेवल्यामुळे नव्या आयुक्तांचा अडसर भ्रष्ट कंपूला झाला आहे, असे सांगितले जाते.

मुळात श्री. केंद्रेकर यांची नियुक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केलेली असल्यामुळे त्यांची राजकीय दबावातून बदली होण्याची शक्यता वाटत नसल्याचे बोलले जाते. 

कृषी विभागात केंद्रेकर चांगले काम करत असतील तर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पाठीशी राहणे गरजेचे आहे.
- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री

सुनील केंद्रेकर हे शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून काम करणारे पहिले कृषी आयुक्त आहेत. ते प्रामाणिक असल्याने भ्रष्ट अधिकाऱ्यांना त्यांचा जाच वाटतो आहे. कृषी खात्यातील बियाणे, खते, कीडनाशके, औजारे, सेंद्रिय खते, आस्थापना यातील भ्रष्ट लॉबी श्री. केंद्रेकर यांना काम करू देणार नाही. मात्र, त्यांची बदली झाल्यास आम्ही विरोध करू. 
- कालिदास आपेट, शेतकरी संघटनेचे नेते

इतर अॅग्रो विशेष
कांदा दर अजून सव्वा महिना टिकून राहतील...नाशिक : लासलगाव बाजार समितीत सोमवारी (ता.25)...
मत्स्य़पालन ठरले फायदेशीर आसेगाव (जि. वाशिम) येथील खानझोडे बंधू यांनी...
कर्जमाफी अर्जांची साठ टक्के छाननी झाली...मुंबई ः शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी ऑनलाइन...
फवारणी यंत्राच्या कल्पक निर्मितीतून वेळ...एकीकडे शेतीत यांत्रिकीकरण वाढत आहे, तर दुसरीकडे...
सूर्यफूल लागवड तंत्रज्ञान हवामान :  तीनही हंगामात लागवड शक्‍य...
बाजार समित्या रद्द केल्यास किंमत मोजावी...मुंबई ः सरकारची धोरणे रोज बदलत आहेत. बाजार...
नाशिक जिल्ह्यातील १६ धरणे तुडुंब नाशिक  : जिल्ह्यातील गंगापूर धरण समूह,...
मूग, उडीद पीककापणीची माहिती २८ पर्यंत...मुंबई : राज्यातील सर्व जिल्ह्यांतील मूग आणि...
गरज पडल्यास अाणखी साखर अायात : केंद्रीय...नवी दिल्ली: देशात जर साखरेची गरज पडल्यास अाणखी...
जळगाव जिल्ह्यात ‘कृषी’ संबंधित ३९९ पदे...जळगाव ः जिल्ह्यात राज्य शासनांतर्गत असलेल्या...
भातावर करपा, तांबेरा, पाने गुंडाळणारी...कोल्हापूर : राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरू असला...
पूर्व विदर्भात धानावर गादमाशी,...नागपूर ः पूर्व विदर्भात यंदा पावसाअभावी ८० टक्‍के...
भेंडी पिकात कमीत कमी निविष्ठा...शेतकरी नियोजन रब्बीतील विविध पिकांमध्ये...
मॉन्सून २८ पासून परतीच्या मार्गावरपुणे : सध्या राजस्थानच्या पश्‍चिम भागात पावसाचा...
रब्बी हंगामासाठी सुधारित अवजारेरब्बी हंगामाचा विचार करता मजुरांची उपलब्धता व...
ऊस उत्पादकांच्या खिशाला ३६१ कोटींची...सोलापूर ः राज्य सरकारने आता शेतकऱ्यांकडूनही भाग...
कर्जमाफीतील पाचर ऊस उत्पादकांच्या मुळावरमुंबई : कर्जमाफी योजनेतील जाचक अटींमुळे नियमित...
लिंगभेद मानण्याची मनोवृत्ती बदलावीपुणे ः ‘मुलगाच पाहिजे’चा कुटुंबातून होणारा...
...या गावाची मुलगी म्हणून मी पुढाकार...राजस्थानमधील सोडा गावच्या सरपंच छवी राजावत यांनी...
‘पंदेकृवि’च्या कुलगुरुपदी डॉ. विलास भालेमुंबई/अकोला : येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...