agriculture news in marathi, agriculture crop insurance issue in akola | Agrowon

पीक विमा हप्त्याची रक्कम गेली कुठे
टीम अॅग्रोवन
बुधवार, 17 जानेवारी 2018

अकोला : ‘शासकीय काम, सहा महिने थांब’ अशी एक उपरोधिक म्हण प्रचलित झालेली अाहे. यातून शासनाच्या संथ कामकाज शैलीवर बोट ठेवले जाते. याचा कटू अनुभव काळेगाव येथील शेतकरी सहा महिनेच नव्हे तर गेली दोन-अडीच वर्षे घेत अाहेत. 

अकोला : ‘शासकीय काम, सहा महिने थांब’ अशी एक उपरोधिक म्हण प्रचलित झालेली अाहे. यातून शासनाच्या संथ कामकाज शैलीवर बोट ठेवले जाते. याचा कटू अनुभव काळेगाव येथील शेतकरी सहा महिनेच नव्हे तर गेली दोन-अडीच वर्षे घेत अाहेत. 

२०१३-१४ मध्ये रब्बी हंगामात खामगाव तालुक्यात गहू व हरभरा पिकाला विमा मंजूर झाला; मात्र काळेगावातील शेतकऱ्यांना अद्यापही विमा मिळाला तर नाहीच, शिवाय अापण भरलेली विमा हप्ता रक्कमसुद्धा नेमकी कुठे गेली याचा शोध लागलेला नाही. मजेशीर बाब म्हणजे शेतकऱ्यांनी खामगाव येथे बँक शाखेत भरलेली रक्कम संबंधित शाखेने त्यांच्या विभागीय कार्यालयाकडेसुद्धा पाठवली. परंतु विमा कंपनीला हे पैसेच मिळाले नसल्याचे संबंधित कंपनीने सांगितले. याबाबत शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे व कृषी विभागाने बँक अाणि विमा कंपनीकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही काहीही झालेले नाही. 

खामगाव तालुक्यातील काळेगाव मंडळात २०१३-१४ च्या रब्बी हंगामात गहू व हरभरा पिकाला विमा मंजूर झाला होता. अापल्याला मदत मिळेल म्हणून त्यावेळी शेतकरी अानंदी झाले होते. याच गावातील काही शेतकऱ्यांना ज्यांनी दुसऱ्या बँकेत विमा रक्कम भरली त्यांना मदतही मिळाली. परंतु ज्यांनी बँक अाॅफ इंडियाच्या खामगाव शाखेत विमा रक्कम भरली त्यांना अद्यापही हा लाभ मिळाला नाही. शेतकऱ्यांनी याबाबत कृषी विभागाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर विमा रकमेचा शोध सुरू झाला. कृषी विभागाने बँक शाखा व्यवस्थापकाला तसेच विमा कंपनीकडे विचारणा केली. बँक व्यवस्थापकाने शेतकऱ्यांना माहिती देताना अापल्या झोनल अाॅफिसमार्फत ३१ डिसेंबर २०१३ ला विमा कंपनीला डीडीद्वारे ३७११ रुपये पाठवले, असे लेखी कळवले.

दुसरीकडे विमा कंपनीनेही कृषी विभागाला पत्र देत बँकेकडून कोणत्याही प्रकारची पीकविमा हप्ता रक्कम प्राप्ती झाली नसल्याचे लेखी कळवले. बँकेकडून विमा हप्ता पाठवल्याचा दावा केला जातो तर विमा कंपनी कुठलाही हप्ता रक्कम बँकेकडून मिळाली नसल्याचे सांगत अाहे. गेले दोन वर्षे हे प्रकरण रेंगाळलेले अाहे. या संदर्भात काळेगाव येथील गोपाल दामोदर साठे व ४६ शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी निवेदने दिली. पाठपुरावा केला. मात्र काहीही झालेले नसल्याचे समोर अाले अाहे.

इतर अॅग्रो विशेष
राजगुरुनगरचा आदर्शराजगुरुनगर येथील कांदा व लसूण संशोधन संचालनालयाला...
पीक कर्जवाटपाचा मुहूर्त टळणार?या वर्षी लोकसभेच्या निवडणुका आल्याने आणि मे...
फळबाग वाचविण्यासाठी सलाइनद्वारे पाणी जिंतूर, जि. परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या...
सिन्नर तालुक्यात दुष्काळाने डाळिंब...नाशिक  : पाऊस कमी झाल्याने संपूर्ण सिन्नर...
विदर्भात उष्णतेची लाटपुणे ः मराठवाडा ते उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण मध्य...
शेडनेटगृह अनुदानाचे राज्यस्तरीय दरपत्रक...पुणे : धोरणात्मक कामकाजापासून शेतकरी प्रतिनिधींना...
स्ट्राॅबेरीची बाजारपेठ होतेय अधिक सक्षम महाबळेश्वर तालुक्यात एकूण स्ट्रॉबेरी उत्पादनाचा...
आरोग्यदायी ड्रॅगन फ्रूटशरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि...
वनस्पतीच्या ताण स्थितीतील संदेश यंत्रणा...वनस्पतीतील ताणाच्या स्थितीमध्ये कार्यरत होणाऱ्या...
आर्थिक, सामाजिक, कृषिसंपन्न राजुरीचा...आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत व...
नाला खोलीकरणात गेलेे शेत; न्यायासाठी...अकोला ः उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी यंत्रणा...
पावणेतीन हजार कोटींची ‘वसुंधरा’त...पुणे : कृषिविस्तार व सल्ला देण्याचे काम सोडून...
कांदा संचालनालयाला राष्ट्रीय संस्थेचा...पुणे : राजगुरुनगर भागात असलेल्या कांदा, लसूण...
शेतकऱ्यांना मिळणार तालुकानिहाय हवामान...दिल्ली : देशातील सुमारे साडेनऊ कोटी शेतकऱ्यांना...
राज्यात उष्णतेची लाट येणारपुणे : सूर्य आग ओकायला लागल्याने विदर्भात उन्हाचा...
हमीभाव वाढीचा बागुलबुवा आणि वास्तवलोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांच्या...
‘कॅप्सूल’ सुधारणार मातीचे आरोग्यमहाराष्ट्र राज्यासाठी या वर्षी रासायनिक खतांची...
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...