agriculture news in Marathi, Agriculture department made a action plan for development of vidarbha, Maharashtra | Agrowon

विदर्भासाठी कृषी विभागाचा ॲक्‍शन प्लॅन
टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 डिसेंबर 2017

नागपूर ः कापूस आणि सोयाबीन उत्पादक पट्टयात रेशीम आणि दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासोबतच धान पट्टयात जवस व लाखोरी, तर गडचिरोली जिल्ह्यात काजू उत्पादनाला चालना देण्यात येणार आहे. त्याकरिता कृषी विभाग लवकरच ॲक्‍शन प्लॅन तयार करणार असून, त्या संदर्भाने तीन दिवस कृषी विभागाच्या वतीने मंथन करण्यात आले. 

नागपूर ः कापूस आणि सोयाबीन उत्पादक पट्टयात रेशीम आणि दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासोबतच धान पट्टयात जवस व लाखोरी, तर गडचिरोली जिल्ह्यात काजू उत्पादनाला चालना देण्यात येणार आहे. त्याकरिता कृषी विभाग लवकरच ॲक्‍शन प्लॅन तयार करणार असून, त्या संदर्भाने तीन दिवस कृषी विभागाच्या वतीने मंथन करण्यात आले. 

येथील वनामतीमध्ये कृषी आयुक्‍त सचिंद्र प्रतापसिंह, कृषी सचिव विजयकुमार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. ११ ते १३ डिसेंबर या कालावधीत झालेल्या या बैठकांना विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांतील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी बैठकीला होते.

कापसावर या वर्षी मोठ्या प्रमाणावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे कापूस व सोयाबीन पट्टयात एकाच पीकपद्धतीऐवजी आंतरपिकांना प्रोत्साहन देण्याचे ठरले. याच भागात दुग्ध व्यवसाय व रेशीमशेतीलादेखील प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला. या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचा उद्देश साधला जाणार आहे. 

‘डीबीटी’त धनादेशाऐवजी व्हावे रोख व्यवहार
जनावर किंवा ट्रॅक्‍टर खरेदीत काहीवेळा लाभार्थी हिस्सा भरताना दिला गेलेला धनादेश अनादरीत होण्याचे प्रकार घडले. त्यामुळे डीबीटीअंतर्गत लाभार्थी हिस्सा केवळ धनादेशाने घेण्याची अट काढावी, तसेच रोकड स्वीकारली जावी, अशी सूचना काही अधिकाऱ्यांनी या बैठकीत केली.

गडचिरोली जिल्ह्यात काजू
गडचिरोली जिल्ह्याचे वातावरण काजू लागवडीला पोषक आहे. या भागात ॲग्री फॉरेस्ट्रीअंतर्गत काजू लागवड होईल. त्याकरिता रोपांचा पुरवठा येत्या हंगामापासून केला जाणार आहे. धान उत्पादक नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात दुबारपीक लागवडीला प्रोत्साहन देत जवस व लाखोरी बीजोत्पादन वाढविले जाणार आहे. या भागात उत्पादित बियाणे अनुदानावर वितरणाचा निर्णय घेतला जाणार आहे. 

कांदाचाळीकरिता अभ्यास दौरा
विदर्भात तंत्रशुद्ध कांदाचाळी होत नाहीत, असे निरीक्षण नोंदविण्यात आले. त्या पार्श्‍वभूमीवर या भागात कांदा लागवडीला प्रोत्साहन तसेच तंत्रशुद्ध कांदाचाळी उभारण्याकरिता काही निवडक शेतकऱ्यांचा नाशिक भागात अभ्यास दौरा काढण्याच्या सूचना कृषी आयुक्‍त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी बैठकीत दिल्या. 

इतर अॅग्रो विशेष
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणीपुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून...
केंद्राकडून यंदा खरिपात १२ टक्के अधिक...पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत...
उन्हाचा चटका पुन्हा वाढण्याची शक्यतापुणे : मागील आठवड्यात झालेला पूर्वमोसमी वादळी...
सूर्य तळपताना छत करा दुरुस्तआठवड्यापूर्वी आलेल्या चांगल्या पावसाच्या अंदाजाने...
आयोगाचा कारभार प्रश्‍नचिन्हांकितप्रत्येक निवडणुकीची रीत न्यारी असते,...
पाणी व्यवस्थापनातून वाढविली कापसाची...आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता....
पाणी व्यवस्थापनातून नळावणे गावाची...अनेक वर्षांच्या पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी...
डेरे यांनी उभारली अत्याधुनिक सिंचन...सातारा जिल्ह्यातील कवठे येथील अतुल डेरे यांनी...
‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’कडे आयटी...‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ हेच येत्या काळातील...
पाणी व्यवस्थापनातून ग्रामविकासपाण्यासाठी कायम संघर्ष करीत असलेल्या कान्होळ (जि...
अवघी कारभारवाडी झाली ठिबकमयकोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी (ता. करवीर) येथे...
सर्वाधिक ६५० शेततळ्यांचं अजनाळेसोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका दरवर्षीच...
अल्पभूधारकांच्या आयुष्यात जलश्रीमंती बुलडाणा जिल्ह्यात जानेफळ परिसरात शासनाच्या...
सत्तावीस गटांच्या बळातून घडली किमयासंगमनेर (जि. नगर) तालुक्यातील सावरगाव तळ...