agriculture news in marathi, Agriculture department, Maharashtra | Agrowon

वड पत्र, पूर्वसंमतीने औजारे खरेदी करण्याचे अावाहन
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

नगर : "उन्नत शेती-समृद्ध शेतकरी'' मोहिमेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातून औजारांची मागणी केलेल्या सगळ्या लभार्थ्यांना (ट्रॅक्‍टर वगळता) औजारांचा लाभ मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी औजारांची मागणी केलेली आहे त्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून निवड पत्र व पूर्वसंमती घ्यावी आणि औजारे खरेदी करून प्रस्ताव सादर करण्याचे अावाहन केले आहे.

नगर : "उन्नत शेती-समृद्ध शेतकरी'' मोहिमेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातून औजारांची मागणी केलेल्या सगळ्या लभार्थ्यांना (ट्रॅक्‍टर वगळता) औजारांचा लाभ मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी औजारांची मागणी केलेली आहे त्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून निवड पत्र व पूर्वसंमती घ्यावी आणि औजारे खरेदी करून प्रस्ताव सादर करण्याचे अावाहन केले आहे.

"उन्नत शेती-समृद्ध शेतकरी'' मोहिमेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातून शेतकऱ्यांना ट्रॅक्‍टरसह पेरणी यंत्र, रोटावेटर, कल्टी, ब्रशकटर, फवारणी यंत्र अशा शेती औजारांचा अनुदानावर लाभ दिला जातो. (एप्रिल २०१७) या महिन्यात शेतकऱ्यांकडून कृषी विभागाने मागणी अर्ज घेतले होते. त्यानुसार ट्रॅक्‍टरसाठी सहा हजार नऊशे तेरा तर अन्य औजारांसाठी सात हजार चारशे ५५ असे १४ हजार ३६८ अर्ज कृषी विभागाकडे प्राप्त झाले होते. या सर्व लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी जवळपास ३९ कोटी रुपयांची आवश्‍यकता आहे. 

आलेल्या अर्जाची सोडत पद्धतीने निवड करून स्वतंत्र ज्येष्ठता यादी तयार केलेली त्यातील सात हजार एकशे ९९ लाभार्थ्यांना निवड पत्र तर तीन हजार ६३ लाभार्थ्यांना आतापर्यंत औजारे खरेदी करण्यासाठी पूर्वसंमती दिलेली आहे.

अभियानातून नगर जिल्ह्यासाठी सुरवातीला साडेतेरा कोटी रुपये व नंतर पावणेबारा कोटी असे पंचवीस कोटी अठरा लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्यातील एकवीस कोटी रुपये प्राप्तही झाले आहेत. जास्तीचा निधी प्राप्त झालेला असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना औजारांचा लाभ देणे शक्‍य आहे. त्यामुळे अर्ज केलेल्या सगळ्याच शेतकऱ्यांनी औजारांसाठी (ट्रॅक्‍टर वगळून) तालुका कृषी कार्यालयातून नवड पत्र व पूर्वसंमती घ्यावी आणि औजारांची खुल्या बाजारात खरेदी करता येणार आहे. 

अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना अन्य औजारांसह ट्रॅक्‍टरही खरेदी करता येणार आहे. त्यामुळे खरेदीनंतर अनुदानासाठी प्रस्ताव सादर करावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे व विस्तार विभागाचे तंत्र अधिकारी अशोक संसारे यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
मत्स्यपालनामध्ये योग्य तांत्रिक बदलांची...सध्याच्या मत्स्यपालन पद्धतीमध्ये कोणतेही बदल न...
जळगाव बुरशीयुक्त शेवयांच्या प्रकरणात...जळगाव ः शालेय पोषण आहार वाटपानंतर अंगणवाडीमधील...
सातगाव पठार परिसरात बटाटा लागवडीस सुरवातसातगाव पठार, जि. पुणे : काही गावांमध्ये पावसाने...
सोलापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह...सांगोला/करमाळा : जिल्ह्याच्या काही भागांत...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात...पुणे : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी...
मातीचा प्रत्येक कण सोन्यासारखा; तो वाया...नाशिक : शेतातील माती म्हणजे कोट्यवधी सूक्ष्म...
नांदेड जिल्ह्यात १ लाख ६५ हेक्टरवर पेरणीनांदेड ः नांदेड जिल्ह्यामध्ये यंदाच्या खरीप...
शेतकऱ्यांना पीककर्ज देणे टाळले तर ठेवी...नगर  ः शेतकऱ्यांना सध्या खरीप हंगामासाठी...
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायमसातारा  ः जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, माण,...
नांदेड जिल्ह्यात फक्त ८.२९ टक्के...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील यंदा खरीप पीककर्ज...
तापीच्या पाण्यास गुजरातचा नकारमुंबई  ः पार-तापी नर्मदा नद्याजोड...
कापूस पीक नियोजनातून हमखास उत्पादन वाढसोनगीर, जि. धुळे ः कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी...
औरंगाबाद जिल्ह्यात अखेर पाऊस बरसलाऔरंगाबाद  : पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या...
`दमणगंगा नदीजोड योजनेचे फेरसर्व्हेक्षण...नाशिक : दमणगंगा (एकदरे) नदीजोड योजनेचे...
मराठवाड्यात साडेतीन लाख हेक्‍टरवर पेरणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ३ लाख ६७...
पीककर्जासाठी बँक अधिकाऱ्याने केली...दाताळा, जि. बुलडाणा : पीककर्ज मंजूर करून...
माॅन्सून सक्रिय, सर्वत्र चांगल्या...महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी झालेले असून १००४...
‘एसआरआय’पद्धतीने भात लागवडीचे तंत्रएसआरआय पद्धतीने भात लागवड केल्यामुळे रोपे, माती,...
भूमिगत निचरा प्रणालीद्वारे जमिनींची...पाणी व रासायनिक खते यांच्या अनियंत्रित वापरामुळे...
लागवड सावा पिकाची...जून महिन्यात सावा पिकाची पेरणी करावी. दोन ओळीतील...