Agriculture news in Marathi, Agriculture department of Maharashtra, Mahaagri | Agrowon

'कृषी'च्या बंद खात्यात आठ कोटी
विनोद इंगोले
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

नागपूर : औरंगाबाद ‘आत्मा’ कार्यालयातील लिपिकाच्या अपहार प्रकरणानंतर राज्यात विनापरवानगी काढण्यात आलेली खाती बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या अंतर्गत नागपूर कृषी विभागात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत तब्बल २०५ विनापरवानगी खाती असल्याची माहिती समोर आली आहे. ही खाती बंद करून त्यातील ८ कोटी रुपयांचा निधी शासन जमा करण्यात आला आहे. 

नागपूर : औरंगाबाद ‘आत्मा’ कार्यालयातील लिपिकाच्या अपहार प्रकरणानंतर राज्यात विनापरवानगी काढण्यात आलेली खाती बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या अंतर्गत नागपूर कृषी विभागात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत तब्बल २०५ विनापरवानगी खाती असल्याची माहिती समोर आली आहे. ही खाती बंद करून त्यातील ८ कोटी रुपयांचा निधी शासन जमा करण्यात आला आहे. 

औरंगाबाद ‘आत्मा’ कार्यालयात लिपिकाने ६६ लाख रुपयांचा अपहार केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. आत्मा प्रकल्प संचालकांना न कळविता लिपिकाने परस्पर रक्‍कम काढल्याचे चौकशीत पुढे आले. त्यानंतर या प्रकरणी पोलिस तक्रारही देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणापासून बोध घेत कृषी विभागाने राज्यात वरिष्ठ कार्यालयाची परवानगी न घेता काढण्यात आलेली बॅंक खाती बंद करण्याचे आदेश दिले. 

याकरिता पुणे कृषी आयुक्‍तालयातील विस्तार व प्रशिक्षण संचालक डॉ. एस. एल. जाधव यांना राज्यभर बैठका घेण्याकरिता पाठविण्यात आले. त्यांनी या बैठकांमधून वापरात नसलेल्या आणि विनापरवानगी काढलेल्या बॅंक खात्यांचा आढावा घेतला. अशा प्रकारची खाती तात्काळ बंद करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नागपूर व अमरावती विभागांचा आढावा त्यांनी गेल्या आठवड्यात घेतला होता. दरम्यान बॅंक खाती बंद करण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेत गडचिरोली जिल्हा कृषी विभाग पिछाडीवर असल्याची माहिती आहे. बॅंक खात्यासंदर्भाने त्यांच्याकडील माहिती परिपूर्ण नसल्याचे सूत्रांनी सांगितले.  

 रक्कम वरिष्ठ कार्यालयाच्या खात्यात वळती
नवीन योजना जाहीर केल्यानंतर त्या योजनेअंतर्गत लाभार्थींचा वाटा भरण्याकरिता स्वतंत्र खाते काढले जाते. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत अशा प्रकारची सुमारे २०५ खाती आढळून आली. या खात्यांमध्ये असलेले सुमारे आठ कोटी रुपये वरिष्ठ कार्यालयाच्या खात्यात वळते करण्यात आल्याची माहिती आहे.

इतर ताज्या घडामोडी
फुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे...द्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या...
साताऱ्यात शेवगा प्रतिक्विंटल ५००० ते...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी स्वतंत्र...पुणे  ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...
वऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या...
साताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा  ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...
अमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...
मालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...
सोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...
नव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...
पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...
हिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...
संगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
कोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर  : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...
दुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान...मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत...
परिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...
जुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...
कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी  : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...
नाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक  : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...
शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा   ः तुम्ही संकटात असताना...
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...