agriculture news in marathi, agriculture department to notice crop disease surveors | Agrowon

कीड रोग सर्वेक्षकांना बजावल्या नोटिसा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 डिसेंबर 2017

नागपूर : न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या कीड रोग सर्वेक्षकांवर कृषी विभागाने कारवाईसाठी नोटिसा बजावत खुलासे मागविल्याने कीड रोग सर्वेक्षकांमध्ये असंतोष पसरला आहे. दरम्यान, राज्यातील एकाही सर्वेक्षकावर कारवाई झाल्यास कृषी आयुक्‍तालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा सर्वेक्षकांच्या संघटनेने दिला आहे. 

नागपूर : न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या कीड रोग सर्वेक्षकांवर कृषी विभागाने कारवाईसाठी नोटिसा बजावत खुलासे मागविल्याने कीड रोग सर्वेक्षकांमध्ये असंतोष पसरला आहे. दरम्यान, राज्यातील एकाही सर्वेक्षकावर कारवाई झाल्यास कृषी आयुक्‍तालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा सर्वेक्षकांच्या संघटनेने दिला आहे. 

राज्यात हॉर्टिसॅप व क्रॉपसॅप योजनेतून पिकावरील कीड रोग सर्वेक्षणाचे काम होत होते. खासगी संस्थेमार्फत कंत्राटी पद्धतीने सर्वेक्षकांची नियुक्‍ती केली जाते. हॉर्टिसॅपमध्ये 498 सर्वेक्षकां तर क्रॉपसॅपमध्ये 430 सर्वेक्षक आहेत. परंतु यातील काही सर्वेक्षकांना पगार मिळाला नाही तर काहींच्या पी. एफ. रकमेत घोळ झाला आहे. याविरोधात कीड रोग सर्वेक्षक संघटनेच्या वतीने हिवाळी अधिवेशन काळात मोर्चा काढण्यात आला.

प्रशासनापर्यंत आपला आवाज पोचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या या कीड रोग सर्वेक्षकांविरोधातच कृषी विभागाने कारवाईचा बडगा उगारत त्यांना काळ्या यादीत टाकणार असल्याचे लेखी पत्राद्वारे कळविले. त्यानंतर आता 14 ते 16 डिसेंबर या कालावधीत कीड रोग डेटा न भरणाऱ्यांना नोटिसी बजावत तीन दिवसांत खुलासा सादर करण्यास सांगण्यात आले आहे. खुलासा सादर न करणाऱ्या सर्वेक्षकांना काळ्या यादीत टाकले जाईल, असेही बजावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

या प्रकारामुळे कीड रोग सर्वेक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात कीड रोग सर्वेक्षकां राहतात. त्यांच्या मार्फत ही कारवाई केली जाईल.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...