agriculture news in Marathi, Agriculture department resource not responding to Agri state minister, Maharashtra | Agrowon

कृषी राज्यमंत्र्यांनाही जुमानत नाही यंत्रणा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 9 जानेवारी 2018

या प्रकरणाचा पुढे पाठपुरावा केला नाही. निश्‍चितच माहिती घेऊन संबंधित दोषींवर कारवाई केली जाईल. 
- सदाभाऊ खोत, कृषी राज्यमंत्री

यवतमाळ ः कामात कुचराई केल्याचा प्रकार खुद्द कृषी राज्यमंत्र्यांच्या दौऱ्यातच उघडकीस आल्यानंतरही संबंधित अधिकाऱ्यांवर तीन महिने उलटूनही कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. १९ जणांचे बळी गेलेल्या प्रकरणात अशाप्रकारे कारवाईस दिरंगाई होत असल्याने कृषी विभागाच्या कारभाराविषयी संताप व्यक्‍त होत आहे. 

कापसावरील बोंड अळीचे नियंत्रण करतेवेळी विषबाधा झाल्याने यवतमाळ जिल्ह्यात सुमारे १९ जणांचे बळी गेले होते. राज्य व देशपातळीवर या विषयाची चर्चा झाली. राज्य सरकारने याची दखल घेत दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली.

मात्र १९ जणांचे बळी गेल्यानंतरदेखील राज्यातील एकाही मंत्र्याने यवतमाळला भेटीचे सौजन्य दाखविले नसल्याचा मुद्दा वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी उपस्थित केला. या प्रकारामुळे सरकारच्या कारभारावरच शंका उपस्थित करण्यात आली. सरकारची बदनामी होत असल्याचे पाहता मुख्यमंत्र्यांसह आरोग्य व कृषिमंत्रीदेखील यवतमाळला पोचले. 

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ४ ऑक्‍टोबरला यवतमाळ जिल्ह्याचा दौरा केला. आर्णी तालुक्‍यातील शेंदुरसणी गावातील दीपक मडावी या विषबाधिताच्या घरी त्यांनी भेट दिली. या वेळी कृषी व ग्रामविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आपले गुणगाण करणारे मोहरे पेरून ठेवले होते. ही बाब सदाभाऊ खोत यांनी हेरली. त्यानंतर त्यांनी थेट मडावी यांच्या घराबाहेर पडून रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्यांशी संवाद साधला.

या वेळी कृषी सहायक गावात येतच नसल्याचे, तसेच कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन मिळत नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. यामुळे कृषी राज्यमंत्र्यांनी कृषी सहायक चोडे, प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी आर. एस. पलसवाड यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले. ग्रामविकास अधिकारी, महसूल निरीक्षक यांच्या ग्रामविकास खात्यामार्फत कारवाई करू, असे सांगत ते गावाबाहेर पडले. आज तीन महिन्याचा कालावधी लोटल्यानंतरही याप्रकरणी काहीच कारवाई झाली नाही. 

इतर बातम्या
शासनाच्या तीन खरेदी केंद्रांद्वारे...जळगाव : उडीद, मूग, सोयाबीनचे बाजारातील दर...
कादवाच्या विस्तारीकरणावर भर देणार : शेटेचिंचखेड, जि. नाशिक : ‘‘शासनाने इथेनॉल...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
‘आरटीजीएस'द्वारे ग्रामपंचायत...सोलापूर : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सहा...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...