कृषी विभागातील बदल्यांचा मार्ग मोकळा

कृषी विभागातील बदल्यांचा मार्ग मोकळा

अकोला : उन्नत शेती-समृद्ध शेतकरी अभियानाच्या अंमलबजावणीत कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी बदल्यांना अटकाव करण्यात अाला होता. परंतु अाता रिक्तपदे भरण्यासाठी ही स्थगिती उठविण्यात अाली अाहे. यामुळे कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी अादी संवर्गातील बदल्यांचा मार्ग मोकळा झाला अाहे.

सद्यःस्थितीत रिक्त असलेल्या तालुका कृषी अधिकारी संवर्गातील पदे भरण्यासाठी ७८ तंत्र अधिकाऱ्यांना पदस्थापना देण्याचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी दाखल झालेला अाहे. तसेच क्षेत्रीय स्तरावरील मंडळ कृषी अधिकारी अाणि प्रयोगशाळेतील रिक्त पदे प्राधान्याने भरणे गरजेचे असल्याने त्यानुसार बदल्यांचा प्रस्ताव तयार करून कार्यवाही केली जाणार अाहे. बदल्यांची प्रतिक्षा लागून असलेल्यांना या अादेशामुळे दिलासा मिळाला अाहे. यासंदर्भात ३० अाॅक्टोबरला अादेश देण्यात अाले अाहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com