agriculture news in Marathi, agriculture department trying to spend money, Maharashtra | Agrowon

कृषी विभागाची निधी खर्चासाठी धडपड
गोपाल हागे
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

योग्य लाभार्थी निवडले जात असून, ‘बोगस’ लाभार्थी गळून पडले आहेत. परंतु एकूणच या कामकाज पद्धतीमुळे जिल्ह्यांना दिलेले उद्दिष्ट कुठल्याच योजनेत झालेले नाही.

अकोला ः राज्यात कृषी विभागाकडून सूक्ष्म सिंचन, यांत्रिकीकरण, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व इतर योजनांवरील उपलब्ध करून दिलेला निधी खर्च झालेला नाही. ३१ ऑक्‍टोबरपर्यंत किमान ६० टक्के निधी खर्च होणे आवश्‍यक असून, असे न झाल्यास केंद्राकडून अनुदानाचा पुढील हप्ता न मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. यामुळे येत्या शनिवारी (ता.२८) व रविवारी (ता.२९) कृषी विभाग काम करणार आहे. याबाबत कृषी आयुक्तांनी परिपत्रक काढून काम करण्याचे निर्देश दिले आहेत. 

शासनाने ऑनलाइन पद्धती सुरू केली असून, काही योजनांचा लाभ घेण्यासाठी पूर्वसंमतीची अट टाकण्यात आलेली आहे. शिवाय जुलै २०१७ पासून जीएसटी लागू झाल्याने त्याचाही परिणाम झालेला आहे. प्रामुख्याने सूक्ष्म सिंचनाच्या लाभासाठी दाखल झालेले हजारो अर्ज जीएसटीच्या बिलात अडकलेली आहेत. आता शासकीय योजनांचा निधी थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे गोंधळाची स्थिती बनलेली आहे. तर दुसरीकडे याचा लाभही होत आहे.

योग्य लाभार्थी निवडले जात असून, ‘बोगस’ लाभार्थी गळून पडले आहेत. परंतु एकूणच या कामकाज पद्धतीमुळे जिल्ह्यांना दिलेले उद्दिष्ट कुठल्याच योजनेत झालेले नाही. ऑक्‍टोबर २०१७ अखेर योजनांचा किमान ६० टक्के निधी खर्च होणे आवश्‍यक आहे. असे झाले तरच केंद्र शासनाकडून अनुदानाचा पुढील हप्ता उपलब्ध करून दिला जाईल. अन्यथा, हा हप्ता मिळणार नाही व भविष्यात पेच तयार होऊ शकतो. 

ही परिस्थिती लक्षात घेता कृषी आयुक्तांनी जिल्हा यंत्रणांना आगामी शनिवार, रविवारी कार्यालये उघडी ठेवून कामकाज करण्याचे निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांना देय असलेले अर्थसाह्य उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, असे आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांनी सुचविले आहे.

इतर बातम्या
`शेतकऱ्यांची थट्टा कशाला करता?`पुणे  : डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी...
सातारा जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाची... सातारा  ः जिल्ह्यात उन्हाळी हंगामातील...
मराठवाड्यातील प्रकल्पांमध्ये ३२ टक्के... औरंगाबाद  : मराठवाड्यातील पाणीसाठा...
तीन जिल्ह्यांत यंदा उन्हाळी पिकांचे... औरंगाबाद : यंदा मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व...
सांगली जिल्ह्यातून १० हजार ६०० टन... सांगली ः दर्जेदार द्राक्षांच्या उत्पादनासाठी...
बियाणे, विमा कंपनीविरुद्ध शेवगावला...नगर ः ‘बीटी कापूस वाणाची लागवड केल्यास हे...
...जीव लावलाय मालकावरीकोल्हापूर : ‘गेली सांगून ज्ञानेश्‍वरी, माणसापरीस...
शेतकरी कंपन्यांच्या प्रतिनिधींचा...अकोला : शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत २०१६-...
राज्यातील साडेसात हजारांपेक्षा अधिक...मुंबई : राज्यातील सात हजार ६५८ अंगणवाड्यांना...
जलयुक्तची कामे करा; अन्यथा नोकरी सोडासांगली  ः जिल्ह्यातील पाणीटंचाई...
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी तुम्ही कधीही...अकोला : सध्या शेतकरी, तरुण हे सर्वच त्रस्त...
कृषिपंपांच्या वीजदरवाढीविरोधात...मुंबई  ः कृषिपंपांच्या वीजदरवाढीविरोधात...
राळेगणसिद्धीत गावकऱ्यांचा ‘रास्ता रोको’नगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी...
‘महाबीज’च्या ‘बीटी’ला बोंड अळीने पोखरलेनागपूर  ः महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे...
बिगर नोंदणीकृत निविष्ठांची राज्यव्यापी...पुणे : बिगर नोंदणीकृत निविष्ठांची तपासणी...
तापमानातील फरकाचा भाज्या, फळबागांना फटकापुणे : राज्याच्या विविध भागांत दिवसा आणि...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची सव्वाआठ हजार... नगर : जलयुक्त शिवार अभियानातून गेल्या वर्षभरात...
शेतकरीप्रश्नी आता देशव्यापी लढा : किसान...अकोला ः महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा ऐतिहासिक लाॅंग...
तापमानातील तफावत कायमपुणे : राज्याच्या दिवस रात्रीच्या तापमानात चढ-...
नाशिक विभागात शेततळी योजनेच्या... नाशिक  : कृषी विभागाच्या संथ कारभारामुळे...