agriculture news in marathi, agriculture departments Counseling transfers suspended | Agrowon

कृषी विभागातील समुपदेशन बदल्या स्थगित; घोडेबाजार पुन्हा सुरू होण्याची भीती
टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 मे 2018

पुणे : राज्याच्या कृषी विभागात समुपदेशनाने बदल्या करण्याची कृषी आयुक्तांनी सुरू केलेली प्रक्रिया अचानक स्थगित करण्यात आली आहे. राज्य कृषी सेवा गट ‘ब’मधील जवळपास १८५ बदल्या संशयास्पदरित्या थांबविण्यात आल्याने घोडेबाजार पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. 

मंत्रालयीन संवर्ग तसेच राज्य शासकीय गट ‘अ’मधील अधिकारी वगळून आता गट ‘ब’मधील अधिकारी आणि गट ‘क’ व ‘ड’ मधील कर्मचाऱ्यांना समुपदेश बदलीचे धोरण लागू करण्यात आलेले आहे. यामुळे कृषी आयुक्तांनी समुपदेशाने पारदर्शकरीत्या बदल्यांची प्रक्रिया सुरू केली होती. 

पुणे : राज्याच्या कृषी विभागात समुपदेशनाने बदल्या करण्याची कृषी आयुक्तांनी सुरू केलेली प्रक्रिया अचानक स्थगित करण्यात आली आहे. राज्य कृषी सेवा गट ‘ब’मधील जवळपास १८५ बदल्या संशयास्पदरित्या थांबविण्यात आल्याने घोडेबाजार पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. 

मंत्रालयीन संवर्ग तसेच राज्य शासकीय गट ‘अ’मधील अधिकारी वगळून आता गट ‘ब’मधील अधिकारी आणि गट ‘क’ व ‘ड’ मधील कर्मचाऱ्यांना समुपदेश बदलीचे धोरण लागू करण्यात आलेले आहे. यामुळे कृषी आयुक्तांनी समुपदेशाने पारदर्शकरीत्या बदल्यांची प्रक्रिया सुरू केली होती. 

‘‘समुपदेशन बदल्यांमुळे आयुक्तांच्या कामकाजाबाबत कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले होते. आयुक्तांनी वर्ग दोन कनिष्ठ गटातील जवळपास २२५ अधिकाऱ्यांच्या बदल्या घोडेबाजाराला थारा न देता केल्या होत्या. मात्र वरिष्ट गटाच्या बदल्यांमध्ये कोलदांडा आणला गेला आहे. या गटात तालुका कृषी अधिकारी, तंत्र अधिकारी, जिल्हा परिषदेमधील कृषी अधिकारी, मोहीम अधिकारी आणि विभागीय गुणनियंत्रण अधिकाऱ्यांची पदे आहेत. ही मलईदार पदे असून त्यासाठी अनेक अधिकाऱ्यांनी ‘टेंडर’ भरलेली आहेत. आयुक्तालयातील एक आणि मंत्रालयातील एक अधिकारी टेंडर पद्धतीत पुढाकार घेतो आहे. समुपदेशामुळे मलईदार पदे मिळत नसल्याचे पाहून टेंडरफेम अधिकाऱ्यांनी समुपदेशन प्रक्रियाच हाणून पाडली,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. 

आस्थापना सहसंचालक सुधीर ननावरे यांनी समुपदेशन प्रक्रिया स्थगित करणारा आदेश शनिवारी जारी केला आहे. आदेशात स्थगितीचे कोणतेही कारण दाखविण्यात आलेले नाही. कृषी आयुक्तालयापासून ते तालुका कार्यालयात फक्त समन्वयाने बदल्या करून घेण्यात काही अधिकारी पटाईत झालेले आहेत. काही अधिकारी मलईदार जागा हेरून जिल्हा किंवा मुख्यालयाच्या ठिकाणीच बदली मागतात. यात प्रामाणिक कर्मचाऱ्याची कोंडी केली जाते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

समुपदेशाने बदल्या करताना प्रामाणिक कर्मचाऱ्याला घोडेबाजारापासून सुटका मिळणार होती. मात्र आस्थापना विभागात कोणतेही चांगले काम करण्याचा प्रयत्न केला, की मंत्रालयातून ‘धपाटा’ बसतो, अशी तक्रार कर्मचाऱ्यांनी केली आहे. कृषी विभागातील वर्ग एकच्या जागादेखील समुपदेशाने भराव्यात. यामुळे बदल्यांमधील भ्रष्टाचार संपुष्टात येईल व त्यातून खात्यांतर्गत योजनांमधील गैरव्यवहार देखील काही प्रमाणात कमी होईल, असेही काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

इतर अॅग्रो विशेष
समजून घ्या पाण्याचे महत्त्वपाण्याची समस्या शाश्वत पद्धतीने सोडवण्यासाठी...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...
एका संदेशाने आयुष्य केले बळकटटाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः काही तासांपूर्वी...
'दावणीलाही नाही आणि छावणीत नाही; जनावरे...सोलापूर :  मागील सरकारच्या काळात छावणीत...
वनहक्काच्या ४३ हजारांहून अधिक...मुंबई : राज्यात मागील अवघ्या तीन महिन्यांत...
खानदेशात मका दरात वाढजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
पशूपालन अन्‌ गूळनिर्मितीतून शेती केली...राशिवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील...
दुष्काळातही भाजीपाला शेतीतून मिळविले...लातूर जिल्ह्यातील उमरगा (यल्लादेवी) येथील माळी...
रयत राजाची अन् राजा रयतेचाहिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचा लोककल्याणकारी...
थकीत एफआरपीचा तिढासा  खरेच्या किमान विक्री मूल्यात प्रतिक्विंटल २००...
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...