agriculture news in marathi, agriculture departments counseling transfers system will work again | Agrowon

बदल्या समुपदेशनानेच...
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 मे 2018

पुणे : राज्याच्या कृषी विभागात समुपदेशनाने बदल्या करण्यावर मंत्रालयातून आलेले गंडातर टळण्याची शक्यता आहे. राज्य कृषी सेवा गट ‘ब’मधील बदल्या समुपदेशनाने पुन्हा सुरू करण्यासाठी कृषी आयुक्तालयात हालचाली सुरू झाल्या आहेत. 

पुणे : राज्याच्या कृषी विभागात समुपदेशनाने बदल्या करण्यावर मंत्रालयातून आलेले गंडातर टळण्याची शक्यता आहे. राज्य कृषी सेवा गट ‘ब’मधील बदल्या समुपदेशनाने पुन्हा सुरू करण्यासाठी कृषी आयुक्तालयात हालचाली सुरू झाल्या आहेत. 

कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी समुपदेशाने पारदर्शकरीत्या बदल्यांची प्रक्रिया सुरू केली होती. त्यामुळे घोडेबाजार व वशिलेबाजीला चाप बसून वर्ग दोन कनिष्ठ गटातील जवळपास ३२५ अधिकाऱ्यांच्या बदल्या पहिल्या टप्प्यात झाल्या. मात्र, वरिष्ठ गटातील बदल्या करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच मंत्रालयातून अचानक आलेल्या आदेशामुळे समुपदेशाची फेरी रद्द करावी लागली. 

‘‘महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग दोन राजपत्रित अधिकारी संघटनेने समुपदेशन धोरणाला पाठिंबा दिला आहे. बदल्यांसाठी कृषी आयुक्तांकडून योग्य पावले टाकली जात आहेत. त्यातून पारदर्शक बदल्या होत असल्यामुळे अधिकाऱ्यांचा कामाचा हुरूप वाढणार आहे. त्यामुळे समुपदेशन स्थगित न करण्यासाठी आम्ही कृषिमंत्र्यांचीदेखील भेट घेणार आहोत,’’ अशी माहिती संघटनेच्या सूत्रांनी दिली. 

मंत्रालयीन संवर्ग तसेच राज्य शासकीय गट ‘अ’-मधील अधिकारी वगळून आता गट ‘ब’मधील अधिकारी आणि गट ‘क’ व ‘ड’मधील कर्मचाऱ्यांना समुपदेश बदलीचे धोरण लागू करण्यात आलेले आहे. याच धोरणानुसार कृषी आयुक्तांनी पारदर्शकपणे बदल्यांना सुरवात केली होती. 

‘‘बदल्यांमध्ये नेहमी घोळ घालून मलई पळविणाऱ्या कंपूनेच समुपदेशन बंद पाडण्यासाठी मंत्रालयापर्यंत लॉबिंग केले. बदल्यांची पहिली फेरी कोणालाही रुपया न देता पारदर्शकपणे पार पडली. कृषी आयु्क्तालयाच्या इतिहासात प्रथमच इतक्या पारदर्शकपणे बदल्या होत असल्याचे पाहून कंपू अस्वस्थ झाला होता. त्यामुळेच मंत्रालयातील समुपदेशनावर स्थगिती आणली गेली आहे,’’ असेही सूत्रांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, कृषी आयुक्त श्री. सिंह यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की प्रशासकीय बाबींवर मी कोणतेही भाष्य करणार नाही. तथापि, राज्य शासनाच्या समुपदेशनाच्या धोरणानुसार बदल्या करण्याची आमची प्रक्रिया सुरू राहील. हा विषय लवकरात लवकर संपविण्यासाठी प्रशासनाकडून प्राधान्य दिले जाईल. 
 

इतर अॅग्रो विशेष
‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...
परभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...
सीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...
ब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...
गोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...
शेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...
राज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...
संत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...
फॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...
चिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...
सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...