agriculture news in marathi, agriculture departments fund went back, kolhapur, maharashtra | Agrowon

कोल्हापूर कृषी विभागाचा साडेतीन कोटींचा निधी गेला परत
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 एप्रिल 2018
कोल्हापूर  ः शेतकऱ्यांसाठी निधीची कमतरता भासत असल्याची ओरड होत असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी विभागाकरिता मंजूर असलेल्या निधीपैकी सुमारे ३ कोटी ५२ लाखांचा निधी वेळेत खर्च न केल्याने शासनाकडे परत पाठवण्याची नामुष्की कृषी विभागावर ओढवली आहे.
 
कोल्हापूर  ः शेतकऱ्यांसाठी निधीची कमतरता भासत असल्याची ओरड होत असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी विभागाकरिता मंजूर असलेल्या निधीपैकी सुमारे ३ कोटी ५२ लाखांचा निधी वेळेत खर्च न केल्याने शासनाकडे परत पाठवण्याची नामुष्की कृषी विभागावर ओढवली आहे.
 
जिल्हा प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली असून जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी बसवराज मास्तोळी यांच्यावर कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव शासन स्तरावर पाठवण्यात येणार आहे. या संदर्भात कृषी अधीक्षक अधिकाऱ्यांकडे खुलासा मागवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी पत्रकार परिषदेत दिली. २०१७-१८ करिता जिल्ह्यासाठी मंजूर ३९७ कोटी ३६ लाखांच्या निधीपैकी ३९३ कोटी ६० लाखांचा निधी खर्च झाल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
 
एकीकडे शेतकऱ्यांसाठी निधी मिळत नसल्याच्या वारंवार तक्रारी होत असतात. त्यामुळे २०१७-१८ करिता कृषी विभागासाठी १३ कोटींच्या भरीव निधीची तरतूद कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने केली होती; मात्र हा निधी वेळेत खर्च होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर १३ कोटींपैकी ८ कोटी परत मागवून ते इतर ठिकाणी खर्च केले. उर्वरित पाच कोटींचा निधी खर्च करण्यातदेखील कृषी विभागाची अनास्था दिसून आली. त्यापैकी ३ कोटी ५६ लाखांचा निधी जिल्हा प्रशासनाला कोणतीही कल्पना न देता परस्पर शासनाकडे परत पाठवला.
 
निधी खर्च होत नसल्याने जिल्हा प्रशासनाने यंदाच्या निधीपोटी कृषी विभागासाठी अवघे ६ कोटी रुपयेच मंजूर केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा योजनांना फटका बसणार आहे.

याबाबत कृषी विभागाशी संपर्क केला असता मंजूर कामे कंत्राटदारांनी वेळेत पूर्ण न केल्याने निधी परत गेल्याचे विभागाच्या सूत्रांनी  सांगितले. कंत्राटदारांनी ई-टेडरिंगद्वारे कामे मिळवली. वर्क ऑर्डरही नेल्या; पण काही टक्केच कामे करून ती थांबवली. त्यांना सातत्याने याबाबतच्या सूचना देऊनही कंत्राटदारांनी कामे केली नाहीत.

अगोदरच्या पद्धतीत कामे सुरू झाली की त्या कामाची सगळी रक्कम बाजूला ठेवता येत होती; पण नव्या पद्धतीत जेवढी कामे झाली आहेत, तेवढ्यांचीच बिले मंजूर झाली. बाकी रक्कम परत गेली. विभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आदी कर्मचाऱ्यांना कंत्राटदारांनी कामे न केल्याने दोषास सामोरे जावे लागले. यामुळे हा निधी परत गेला याला आमचा निष्क्रियपणा कसा म्हणायचा? असा सवाल या विभागातील अधिकाऱ्यांनी केला आहे.

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...