agriculture news in Marathi, agriculture development possible from india-america co-operation, India | Agrowon

भारत-अमेरिका सहकार्यातून शेतीविकास : चंद्रबाबू
वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

अमेरिका आणि आंध्र प्रदेश यांच्यामध्ये परस्पर सहकार्याच्या अनेक संधी आहेत. या संधींवर काम केल्यास दोन्ही देशांच्या शेती आणि अन्न उद्योगाचा विकास होईल आणि या क्षेत्रांतील समस्या सोडविण्यास मदत होईल.
- मुकेश अघी, अध्यक्ष, ‘यूएसआयएसपीएफ’

वॉशिंग्टन ः भारत आणि अमेरिकेतील संबंध दोन्ही देशांच्या विकासासाठी पूरक आहेत. परस्पर सहकार्यात वाढ झाल्यास दोन्ही देशांतील शेतीला फायदा होईल. परस्परांच्या मदतीने शेती उत्पादनात वाढ होऊन अपेक्षित उत्पादनाची पातळी गाठता येईल, असे प्रतिपादन आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी येथे केले. 

लोवा स्टेट विद्यापीठाच्या सहयोगाने अमेरिका- भारत धोरणात्मक भागीदारी मंच (यूएसआयएसपीएफ)च्या वतीने आयोजित जागतिक अन्नासंबंधी आयोजित बैठकीचा शेती हा एक विषय होता. या बैठकीला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे उपस्थित होते. या वेळी झालेल्या एका विशेष बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीला भारत सरकारचे प्रतिनिधी मंडळ, तसेच अमेरिकेच्या कृषी विभागाचे प्रतिनिधी, अमेरिका- भारत फाउंडेशन, ग्लोबल फूड बॅंकिंग नेटवर्क आणि इतर कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या विशेष बैठकीचा मुख्य उद्देश आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांना आधुनिक आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांच्या जातींची लागवड करणे आणि शेतीचे उत्पादन आणि उत्पादकतावाढीसाठी शेतकऱ्यांचा कौशल्यविकास व्हावा यासाठी त्यांना प्रशिक्षण आदी शेती विस्तार सेवा पुरवण्यासाठी अमेरिकेचा कृषी विभाग कोणत्या क्षेत्रात काम करू शकतो याची चाचपणी करणे हा होता. 

बैठकीत भारत सरकारच्या प्रतिनिधींसोबत भारत- अमेरिका यांच्यातील गुंतवणूक आणि व्यापाराच्या संधी आणि त्यातील आव्हाने यावर विचारमंथन करण्यात आले. तसेच, शेती आणि अन्नक्षेत्रात असणाऱ्या व्यापार व गुंतवणूक संधीवर चर्चा झाली. 

‘‘अमेरिका आणि आंध्र प्रदेश यांच्यामध्ये परस्पर सहकार्याच्या अनेक संधी आहेत. आंध्र प्रदेशाने मेगा फूड पार्क आणि कोल्ड स्टोअरेज निर्मितीत पुढाकार घेत यशस्वी झेप घेतली आणि यासारख्या प्रयत्नांतून भारतीय अन्न आणि शेती उद्योगात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे,’’ असे ‘यूएसआयएसपीएफ’चे अध्यक्ष मुकेश अघी यांनी सांगितले.

मुख्यमंत्री नायडू म्हणाले, की सहकार्यातून दोन्ही देशांच्या नवीन संकल्पना आणि तांत्रिक ज्ञानाची देवाणघेवाण होऊन शेती उत्पादनात वाढ होऊन अपेक्षित उत्पादन मिळेल. याचा फायदा दोन्ही देशांना होईल.

५०० आयटी उद्योग स्थापण्याचे उद्दिष्ट
या वेळी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी अमेरिकेतील ८० आयटी कंपन्यांच्या प्रतिनिधींची भेट घेतली. या वेळी आंध्र प्रदेशात येत्या वर्षभरात ५०० नवीन आयटी उद्योग सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यांनी आपल्या लोवा स्टेट विद्यापीठाच्या भेटीत पीक जनुक आणि शेती उत्पादनवाढीच्या पद्धती याविषयी माहिती घेतली आणि या तंत्रज्ञानाचा आंध्र प्रदेशात वापर कसा करता येईल याची चाचपणी केली.

इतर ताज्या घडामोडी
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...