कृषी यांत्रिकीकरणाचा पुणे जिल्ह्यातील २७७७ शेतकऱ्यांना लाभ

कृषी यांत्रिकीकरण
कृषी यांत्रिकीकरण

पुणे : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ मोहिमेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात चालना देण्यात आली. कृषी यांत्रिकीकरणाचा पुणे जिल्ह्यातील सुमारे २७७७ शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे १८ कोटी ९ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान दिल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

अभियानाअंतर्गत प्रचलित केंद्रपुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान, राष्ट्रीय गळीतधान्य व तेलताड अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण प्रकल्प एकत्रितरीत्या राबविण्यात आला होता. सर्व योजनांतर्गत यांत्रिकीकरणासाठी सुमारे १८ कोटी ९ लाख ५० हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता.

योजनेतून ट्रॅक्‍टर, पॉवर टिलर, रोटव्हेटर, कल्टिव्हेटर, सर्व प्रकारचे प्लॅंटर, मळणी यंत्र, भात लावणी यंत्र, पॉवर विडर, रिपर, भातमळणी यंत्र, मिनी भात मिल, दाल मिल, ट्रॅंक्‍टरचलित फवारणी यंत्र अशी विविध यंत्रांची शेतकऱ्यांनी खरेदी केल्यानंतर २५ ते ३५ टक्‍क्‍यांपर्यंत अनुदान देण्यात आले आहे. 

कृषी हवामान व जमिनीच्या प्रकारातील असलेली विविधता लक्षात घेऊन स्थानिक परिस्थितीनुरूप प्रमुख पिकांसाठी; तसेच फळबाग व भाजीपाला पिकांच्या मशागती, आंतरमशागतीकरिता लागणाऱ्या यंत्रसामग्री व अवजारांची यांत्रिकीकरण मोहिमेकरिता निवड करण्यात आली होती.

यामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना यादीतील आपल्या पसंतीची अवजारे, यंत्राची निवड करून खुल्या बाजारातून त्याची खरेदी करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले होते. या खरेदीनंतर अनुदानाकरिता परिपूर्ण प्रस्ताव संबधित अधिकाऱ्याकडे प्राप्त झाल्यानंतर दहा दिवसांच्या आत संबधित लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे.

योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांकरिता अर्जाचा विहित नमुनाही कृषी विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला असून ७७५ शेतकऱ्यांनी लहान, मोठ्या स्वरूपाच्या ट्रॅक्‍टरची खरेदी केली. इतर अवजरांची २००२ शेतकऱ्यांनी खरेदी केली आहे.

तालुकानिहाय अवजारांची संख्या व रक्कम

तालुका   अवजारांची संख्या   रक्कम (लाख, रुपयांत)
भोर   १२१ ७७.३९
वेल्हा   ६०  ४७.४२
मावळ १६८  ११३.५५
मुळशी  १०६  ६२.३६
हवेली  २६३ १५५.२२
खेड १८१ १०९.६५
आंबेगाव २६१ १५२.१७
जुन्नर ३०३  २१२.३५
शिरूर २९७   १८८.४०
पुरंदर १८६ १०२.४०
बारामती ३१३  २०६.६९
दौंड २३२  १८२.५२
इंदापूर  २८६ १९९.३८
एकूण २७७७ १८,०९.५०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com