Agriculture News in Marathi, Agriculture market committe ban on traders for paritcipate in dry grapes, Sangli district | Agrowon

बेदाणा सौद्यात भाग घेण्यास पंधरा व्यापाऱ्यांना बंदी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017
सांगली ः बेदाण्याचे झिरो पेमेंट (येणे-देणे व्यवहार) न केलेल्या १५ खरेदीदार व्यापाऱ्यांना सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीने बेदाणा सौद्यात भाग घेण्यास बंदी घातली आहे. येणे-देणे व्यवहार केल्यानंतरच त्यांना सौद्यात बेदाणा खरेदी करता येईल, असे सभापती प्रशांत शेजाळ यांनी स्पष्ट केले.
 
बेदाणा झिरो पेमेंट अंतर्गत खरेदीदार व्यापारी- अडते आणि अडते-शेतकरी यांच्यातील येणे-देणे व्यवहार, ई-नाम, शेतकरी नोंदणी यासंदर्भात बाजार समितीने सांगली- तासगाव बेदाणा मर्चंट्‌स असोसिएशनची बैठक घेतली. 
 
सांगली ः बेदाण्याचे झिरो पेमेंट (येणे-देणे व्यवहार) न केलेल्या १५ खरेदीदार व्यापाऱ्यांना सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीने बेदाणा सौद्यात भाग घेण्यास बंदी घातली आहे. येणे-देणे व्यवहार केल्यानंतरच त्यांना सौद्यात बेदाणा खरेदी करता येईल, असे सभापती प्रशांत शेजाळ यांनी स्पष्ट केले.
 
बेदाणा झिरो पेमेंट अंतर्गत खरेदीदार व्यापारी- अडते आणि अडते-शेतकरी यांच्यातील येणे-देणे व्यवहार, ई-नाम, शेतकरी नोंदणी यासंदर्भात बाजार समितीने सांगली- तासगाव बेदाणा मर्चंट्‌स असोसिएशनची बैठक घेतली. 
 
या वेळी बाजार समितीचे सभापती प्रशांत शेजाळ, सचिव पी. एस. पाटील, असोसिएशनचे अध्यक्ष मनोज मालू, जमनादास ठक्कर, कांतीभाई पटेल, राजू कुंभार, विनायक हिंगमिरे, सुशील हडदरे, पप्पू मजलेकर, शीतल पाटील आदी उपस्थित होते.
 
दिवाळी सुटीनंतर मार्केट यार्डात बुधवारी (ता. ८)  बेदाणा सौद्यास सुरवात झाली. मात्र सौद्यास प्रारंभापूर्वी बाजार समितीने बैठक घेतली. पंधरा खरेदीदार व्यापाऱ्यांकडे अडत्यांचे सुमारे ४० लाख रुपये अडकले आहेत.
 
पंधरापैकी आठ व्यापाऱ्यांकडे तीन महिने पैसे अडकले असल्याची माहिती पुढे आली. दरम्यान, हे पैसे जमा करेपर्यंत १५ व्यापाऱ्यांना बैदाणा सौद्यात सहभाग घेता येणार नाही, असे सभापती शेजाळ यांनी स्पष्ट केले. 
संबंधित व्यापाऱ्यांनी अडत्यांना तातडीने पेमेंट करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
 
एखाद्या शेतकऱ्याने ॲडव्हान्स घेऊन दुसऱ्याच व्यापाऱ्याला बेदाणा विकला तर ॲडव्हान्स घेतलेल्या व्यापारी/अडत्याचे पैसे परत करेपर्यंत बेदाणा पट्टी रोखण्याचा निर्णय झाल्याची माहिती देण्यात आली.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...