पंजाब, हरियाणाच्या धर्तीवर ब्रँडिंग व मार्केटिंग करणार

पंजाब, हरियाणाच्या धर्तीवर ब्रँडिंग व मार्केटिंग करणार
पंजाब, हरियाणाच्या धर्तीवर ब्रँडिंग व मार्केटिंग करणार

मुंबई : मार्केटिंग फेडरेशन, कृषी मंडळ पुणे, महाराष्ट्र राज्य सहकार विकास महामंडळ यांनी एकत्रित येऊन पंजाब, हरियाणाच्या धर्तीवर राज्यात ॲग्रो प्रोसेसिंग, ब्रँडिंग व मार्केटिंग कार्यप्रणालीचा वापर करून याद्वारे राज्यातील खरेदी विक्री संघ, शेतकरी उत्पादक संस्था, महिला बचत गट व विकास सोसायट्यांचे सक्षमीकरण करणार असल्याची माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. अटल महापणन विकास अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशन व सभासद संस्थांच्या सक्षमीकरणासंदर्भात पंजाब-हरियाणा दौरा सादरीकरणासंदर्भात श्री. देशमुख यांच्या दालनात आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीत महाराष्ट्र राज्य सहकार पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक योगेश म्हसे, कृषी पणन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनिल पवार, महाराष्ट्र राज्य सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे, विदर्भ पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. हरिबाबू तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.मंत्री श्री. देशमुख म्हणाले, ‘‘पंजाब, हरियाणा येथील मार्केटिंग फेडरेशन व सभासद संस्था यांनी मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे. कडधान्य, तेलबिया, गहू, तांदूळ यापासून विविध प्रकारची तयार केलेली उत्पादने जागतिक स्तरावर पोचली आहेत. त्यांनी अन्नधान्य खरेदीबरोबर कृषी निविष्ठा पुरवठा, अग्रो-प्रोसेसिंग, ब्रँडिंग व कृषी उत्पादनांचे मार्केटिंग असे विविध व्यावसायिक उपक्रम राबविले आहेत.’’ याकरिता पंजाब-हरियाणा राज्याच्या मार्केटिंग फेडरेशनबरोबर सामंजस्य करार (MOU) करण्याची कार्यवाही तत्काळ करून महाराष्ट्रातील कृषी उत्पादने इतर राज्यात कशी जातील, याचा कृती आराखडा तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. याकरिता आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करण्याची कार्यवाही तात्काळ करावी व त्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मदत घ्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी पंजाब, हरियाणा अभ्यास दौऱ्याचे संगणकीय सादरीकरण या बैठकीत करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com