agriculture news in Marathi, Agriculture minister says farmers will get benefit if register in satbara, Maharashtra | Agrowon

सातबारावर नोंद असेल तरीही मदत ः कृषिमंत्री फुंडकर
टीम अॅग्रोवन
बुधवार, 10 जानेवारी 2018

बुलडाणा ः बोंड अळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासन मदत करणार असून, बोंड अळीच्या कारणाने ज्या शेतकऱ्यांनी कापूस पीक वखरले. त्यामध्ये दुसरे पीक घेतले, अशा शेतकऱ्यांच्या सातबारावर कपाशीची नोंद असेल तर त्या क्षेत्रासाठीही मदत देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली.

बुलडाणा ः बोंड अळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासन मदत करणार असून, बोंड अळीच्या कारणाने ज्या शेतकऱ्यांनी कापूस पीक वखरले. त्यामध्ये दुसरे पीक घेतले, अशा शेतकऱ्यांच्या सातबारावर कपाशीची नोंद असेल तर त्या क्षेत्रासाठीही मदत देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली.

जिल्हा नियोजन समितीची बैठक श्री. फुंडकर यांच्या अध्यक्षतेत झाली. या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी खासदार प्रतापराव जाधव, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. षण्मुखराज, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुळकर्णी यांच्यासह अामदार, समिती सदस्य तथा अधिकारी उपस्थित होते.

श्री. फुंडकर म्हणाले, की जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाची कामे मोठ्या संख्येने सुरू आहेत. ही कामे घेणाऱ्या कंत्राटदारांकडून जवळील गावांमध्ये गावतलाव, शेततलाव आदींची कामे करून घ्यावीत. तसेच ज्या पाझरतलावांच्या कामांसाठी भूसंपादनाची गरज नाही, ई-क्लास जमिनीवर प्रकल्प होऊ शकतात, अशा प्रकल्पांची कामे हाती घ्यावीत. सोयाबीनला प्रतिक्विंटल दोनशे रुपये अनुदान शासनाने जाहीर केले. त्यानुसार बाजार समित्यांकडून अनुदान वितरणाची कार्यवाही सुरू आहे.

मात्र जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांचे प्रस्ताव त्रुटी असल्याने नामंजूर करण्यात आले. परिणामी शेतकरी या अनुदानापासून वंचित राहत आहेत. संबंधित विभागाने त्रुटींमध्ये नामंजूर प्रस्तावांना पुन्हा शेतकऱ्यांना संधी देऊन ते सादर करण्याचे आवाहन करावे. 

सन २०१८-१९ साठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शासनाने घालून दिलेल्या वित्तीय मर्यादेत ३४७ कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे. सर्वसाधारण योजनेचा १९९ कोटी ३२ लाख, अनुसूचित जाती उपयोजनेचा १२३ कोटी ५१ व आदिवासी उपयोजनेसाठी २४ कोटी ९ लाख रुपयांचा त्यामध्ये समावेश आहे. 
 

इतर अॅग्रो विशेष
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने...मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५...
विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत...पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या...
क्रांती कारखाना हुमणीचे भुंगेरे खरेदी...कुंडल, जि. सांगली : एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
परवानाधारक व्यापाऱ्यांनीच केळीची खरेदी...जळगाव : चोपडा बाजार समिती दरवर्षी १४...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...
परभणी ठरले देशात उष्णपुणे : राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३७ अंशांच्या...