agriculture news in marathi, Agriculture ministers Declares compensation for cotton, paddy, horticulture and vegetable crops | Agrowon

कापूस, धान, फळबाग, भाजीपाला नुकसानग्रस्तांना मदत जाहीर
टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 डिसेंबर 2017

नागपूर ः बोंड अळीसाठी कापूस उत्पादक; तसेच तुडतुड्यासाठी धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्‍टरी मदतीची घोषणा करीत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी शुक्रवारी (ता.२२) दिलासा दिला. कापूस उत्पादकांना हेक्‍टरी ३७ हजार ५००; तर धान (भात) उत्पादकांना हेक्‍टरी १४ हजार ६७० रुपयांची मदत केली जाणार आहे. याशिवाय ‘ओखी’ वादळामुळे फळबागांच्या झालेल्या नुकसानीसाठी ४३ हजारापर्यंत; तर भाजीपाल्यासाठी १३ हजार ५०० रुपये मदतीची घोषणाही फुंडकर यांनी विधानसभेत केली. 

नागपूर ः बोंड अळीसाठी कापूस उत्पादक; तसेच तुडतुड्यासाठी धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्‍टरी मदतीची घोषणा करीत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी शुक्रवारी (ता.२२) दिलासा दिला. कापूस उत्पादकांना हेक्‍टरी ३७ हजार ५००; तर धान (भात) उत्पादकांना हेक्‍टरी १४ हजार ६७० रुपयांची मदत केली जाणार आहे. याशिवाय ‘ओखी’ वादळामुळे फळबागांच्या झालेल्या नुकसानीसाठी ४३ हजारापर्यंत; तर भाजीपाल्यासाठी १३ हजार ५०० रुपये मदतीची घोषणाही फुंडकर यांनी विधानसभेत केली. 

अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधकांनी शेतकऱ्यांना मदतीची मागणी लावून धरली होती. सरकारने विरोधकांना मदतीबाबत आश्‍वस्त केले होते. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत फुंडकर यांनी धान, कापूस, फळबागा, भाजीपाला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर केली.

कोरडवाहू धान उत्पादकांना राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निधीतून ६८०० आणि पीकविम्याचे ११७० रुपये अशी एकूण ७९७० रुपये हेक्‍टरी मदत करण्यात येईल. याशिवाय बागायती धान उत्पादकांना राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निधीतून १३ हजार ५०० रुपये आणि पीकविम्याची ११७० अशी एकूण १४ हजार ६७० रुपये हेक्‍टरी मदत देण्यात येईल, असे फुंडकर यांनी सांगितले. ही मदत दोन हेक्‍टरपर्यंत राहणार आहे. याशिवाय धान उत्पादकांना २०० रुपये प्रतिक्विंटल बोनस देण्यात येईल. बोनससाठी ५० क्‍विंटलची मर्यादा आहे. धानासाठीची मदत दुष्काळग्रस्त भागातील तीन तालुक्‍यांना देण्यात येणार आहे. 

बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या सेंद्रिय पद्धतीने कापूस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी ३० हजार ८०० रुपये मदत करण्यात येईल. यात राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निधीतून ६८००, विमा कंपनीकडून आठ हजार; तर बियाण्यांच्या कंपन्यांकडून १६ हजारांच्या मदतीचा समावेश आहे. बागायती कापूस उत्पादकांना हेक्‍टरी ३७ हजार ५०० रुपयांची मदत देण्यात येईल. यात राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निधीतून १३ हजार ५००, विमा कंपनीकडून आठ हजार तर बियाणे कंपन्यांकडून नुकसानभरपाई म्हणून १६ हजार रुपयांचा समावेश आहे. कापूस उत्पादकांनाही दोन हेक्‍टरपर्यंत मदत करण्यात येईल.

‘ओखी’मुळे नुकसान झालेल्या फळपीक उत्पादकांना हेक्‍टरी ४३ हजारांपर्यंत मदत करण्यात येईल. १८ हजार रुपये नैसर्गिक आपत्ती निधीतून तर नऊ ते २५ हजारापर्यंत रक्कम पीक विम्यातून देण्यात येईल.

भाजीपाला उत्पादकांना १३ हजार ५०० रुपये हेक्‍टरी मदत करण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले. यासंदर्भात नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्यास सुरवात झाल्याचे नमूद केले. 

अशी आहे मदत (हेक्टरी) (सर्व मदत दोन हेक्‍टरपर्यंत/रुपये)

  कोरडवाहू धान उत्पादक   ७,९७०
  बागायती धान उत्पादक  १४,६७०
  धान उत्पादकांना प्रतिक्विंटल बोनस ( ५० क्‍विंटलपर्यंत)  २००
  कोरडवाहू कापूस उत्पादकास  ३०,८००
  बागायती कापूस उत्पादक   ३७,५००
  ‘ओखी’ वादळामुळे फळबाग नुकसानग्रस्तांना  ४३,०००
  भाजीपाला उत्पादक   १३,०००

 

इतर अॅग्रो विशेष
कोरडवाहू शेतजमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची...सोलापूर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत...
बीजी - ३ चे घोडे अडले कुठे?आगामी हंगाम धोक्‍याचा सन २०१७ च्या खरीप हंगामात...
आव्हान पाणी मुरविण्याचेठिबक सिंचन अनुदानासाठी यावर्षी विक्रमी निधी...
भारतातील १ टक्का श्रीमंतांकडे ७३ टक्के...दावोस  ः गेल्या वर्षभरात देशात निर्माण...
किमान तापमानात घट; नगर ९.४ अंशांवरपुणे ः विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात...
नागपुरात तुरीच्या दरात घसरणनागपूर : येथील कळमणा बाजारात आठवड्याच्या...
देशात खालावत आहे जमिनीचे आरोग्यनागपूर : खोल मशागत, नियंत्रित खत व्यवस्थापनाला...
बोंड अळी भरपाईसाठी सुनावणी आजपासूनपुणे : राज्यात शेंदरी बोंड अळीमुळे...
तूर खरेदी अडकली नोंदणीतचलातूर ः तेलंगणा, कर्नाटक राज्याने हमीभावाप्रमाणे...
कष्ट, अभ्यासातून जोपासलेली देवरेंची...नाशिक जिल्ह्यातील नाशिक सटाणा तालुक्याचा परिसर...
लसीकरणाअभावी दाेन काेटी पशुधनाचे...पुणे ः सुमारे ३० काेटींची निविदा मिळविण्यासाठी...
सिद्धेश्‍वर यात्रेतील बाजारात खिलार बैल...सोलापूरचे ग्रामदैवत श्री. सिद्धेश्‍वर...
जिरायती शेती विकासातून थांबेल स्थलांतरमराठवाडा आणि विदर्भ विभागातील जिरायती शेतकरी...
संभ्रम दूर करामागील खरीप हंगामात चांगल्या पाऊसमानाच्या...
मुद्रा योजनेच्या १० लाखांपर्यंतच्या...कोल्हापूर : तरुणांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर...
रब्बीचा ६१.८ दशलक्ष हेक्टरवर पेरानवी दिल्ली ः भारतातील रब्बी क्षेत्रात यंदा गेल्या...
प्रशिक्षणांना दांड्या मारणाऱ्या...अकोला : अधिकारी, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता...
ठिबक अनुदानासाठी ७६४ कोटींचा निधीपुणे: राज्यात ठिबक संच बसविलेल्या शेतकऱ्यांना...
मराठवाड्यात ४३ टक्‍के जमीन चुनखडऔरंगाबाद : मराठवाड्यातील जमिनीचा पोत दिवसेंदिवस...
दशकातील सर्वांत मोठ्या कापूस आयातीचे...जळगाव ः महाराष्ट्रासह काही प्रमुख कापूस उत्पादक...