पुणे विभागात ४७२ कृषी कर्मचाऱ्यांच्या बदल्या

कृषी विभाग
कृषी विभाग

पुणे : कृषी विभागाच्या पुणे विभागातील नगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या वर्ग तीन या पदावरील ४७२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. खरीप हंगामाच्या सुरवातीलाच बदल्या झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी तत्काळ बदलीच्या ठिकाणी रूजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पुणे विभागात वर्ग तीनमध्ये कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, सहायक अधीक्षक, अनुरेखक, लिपीक आणि वाहनचालक अशी पदे आहेत. गेल्या वर्षी या पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या नव्हत्या. परंतु, यंदा बदल्यांसाठी हे कर्मचारी प्रतीक्षेत होते. शासनाने एक महिन्यापूर्वी वर्ग दोन, तीन आणि चार या वर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या समुपदेशन पद्धतीने नागरी सेवा मंडळाच्या शिफारशीनुसार करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित केला होता.

त्यानुसार कृषी आयुक्तलयाने वर्ग दोन या पदावरील अधिकाऱ्यांसाठी समुपदेशन प्रक्रिया राबविली होती. त्याच धर्तीवर पुणे विभागातील विभागीय कृषी सहसंचालक दादाराम सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासन अधिकारी दयानंद जाधव, सदस्य सचिव बी. जे. पलघडमल, सहायक प्रशासन अधिकारी सुरेश खेडकर, कांतीलाल पवार यांनी २७ आणि २८ मे रोजी ही प्रक्रिया राबविली होती. त्यानंतर शासन निर्णयानुसार समुपदेशद्वारे कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

वर्ग तीनमधील बदली पात्र कर्मचाऱ्यांमध्ये ३१ कृषी पर्यवेक्षक कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नगर जिल्ह्यात १२६, पुणे जिल्ह्यात १३५ आणि सोलापूर जिल्ह्यात १२८ कृषी सहायकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच पेसा क्षेत्रातील १३, बीजप्रमाणीकरणचे आठ, कृषी आयुक्तलयातील चार, वसुंधरा पाणलोट विभागातील दोन, कारागृह विभागातील एक कर्मचाऱ्याची बदली करण्यात आली आहे.

याशिवाय १४ अनुरेखक, चार सहायक अधीक्षक, पाच लिपीक आणि दोन वाहन चालकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. वेळेत बदल्या झाल्यामुळे खरीप हंगामात राबविण्यात येत असलेल्या उन्नत शेती समृद्ध शेतकरी यांसह विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी मदत होणार आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com