agriculture news in marathi, agriculture practices become in last phase, pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यात मशागतीची कामे अंतिम टप्प्यात
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 8 जून 2018

सध्या मशागतीची कामे सुरू आहेत. खरिपात डाळिंब व उसाची लागवड करणार आहे. बाजरीची काही प्रमाणात पेरणी करणार असून कांदा रोपवाटिका टाकण्याची तयारी सुरू आहे. 
- विराज निगडे, शेतकरी, गोळुंजे, ता. पुरंदर, जि. पुणे.

पुणे  ः जिल्ह्यातील अनेक भागांत सध्या पूर्वमोसमी पाऊस होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे. सध्या मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली असून, पश्‍चिम पट्ट्यातील तालुक्‍यांत भात रोपवाटिकेची कामे सुरू झाली आहेत. 

पुणे जिल्ह्यात खरिपाची दोन लाख ३० हजार हेक्‍टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. पश्‍चिमेकडील भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, उत्तरेकडील खेड, जुन्नर, आंबेगाव या तालुक्‍यात प्रामुख्याने भात पिकाची लागवड केली जाते. पूर्वेकडील शिरूर, दौंड, पुरंदर, बारामती, इंदापूर तालुक्‍यात सोयाबीन, तूर, मूग, उडीद ही पिके शेतकरी घेतात. यंदा चांगल्या पावसाची शक्‍यता असल्याने शेतकऱ्यांनी सुरवातीपासून खरिपाचे नियोजन करण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी लागणाऱ्या निविष्ठांचा पुरवठा कृषी विभागामार्फत कृषी सेवा केंद्रांना सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच कृषी निविष्ठा उपलब्ध होतील. 

पश्‍चिम पट्ट्यात भात लागवडीसाठी मजुरांची टंचाई भासत असल्याने यांत्रिकीकरणाचा अवलंब करण्यावर शेतकऱ्यांचा सर्वाधिक भर राहणार आहे. त्यासाठी आत्मा व कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड व त्यासाठीची रोपवाटिका याबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेत शेतकऱ्यांनी रोपवाटिकेची कामे सुरू केली आहे. काही ठिकाणी रोपवाटिकेत भात बियाणे टाकण्याची कामे सुरु आहेत.

पूर्वेकडील भागातही मशागतीची कामे सुरू आहेत. पाणी उपलब्ध असलेल्या काही ठिकाणी ऊस लागवडीची पूर्वतयारी शेतकरी करत आहेत. याविषयी वेल्हा तालुक्‍यातील वाजेघर येथील समीर शिळीमकर म्हणाले की माझी एकूण वीस एकर शेती आहे. ऊस साडेचार एकरावर आहे. भाताची पावणेदोन एकरावर लागवड करणार आहे. मशागतीची कामे पूर्ण झाली आहे. दोन ते तीन दिवसांपासून पाऊस होत आहे. पुन्हा एकदा मशागत करून भात लागवडीसाठी शेत तयार करणार आहे. त्यासाठी दोन ते तीन गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका तयार केली आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...