agriculture news in marathi, Agriculture pump does not have uninterrupted power supply | Agrowon

शेती पंपाला अखंडित वीजपुरवठा नाही
टीम अॅग्रोवन
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

सांगली ः जिल्ह्यातील शेतीच्या पंपासाठीच्या विजेच्या रात्रीच्या वेळेतील भारनियमात दोन तासांनी वाढ केली आहे. वास्तविक पाहता शेती पंपाला अखंडित वीजपुरवठा होत नाही. यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होते आहे.

सांगली ः जिल्ह्यातील शेतीच्या पंपासाठीच्या विजेच्या रात्रीच्या वेळेतील भारनियमात दोन तासांनी वाढ केली आहे. वास्तविक पाहता शेती पंपाला अखंडित वीजपुरवठा होत नाही. यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होते आहे.

जिल्ह्यात वाळवा, पलूस, कडेगाव, शिराळा तालुक्‍यांत विहीरी आणि बोअरवेलला पाणी मुबलक आहे, हे पाणी शेती पुरते आहे. मात्र, सातत्याने विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने पाणी असूनदेखील शेतीला पाणी देणे शक्‍य होत नाही. तर दुष्काळी पट्ट्यातील भागातील पाण्याची पातळी खालावली आहे. उलपब्ध पाण्यावर शेती पिकवण्यासाठी या भागातील शेतकरी धडपड करत आहे. मात्र, वीजपुरवठा होत नसल्याने पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठाच्या कालावधी हळूहळू कमी करण्याचा घाट शासनाने घातला आहे. शेतीच्या पंपासाठी लागणारा दिवसा आठ तासांचा वीजपुरवठा तर रात्रीच्या वेळी दहा तास याप्रमाणे वीजपुरवठा करत असल्याचा दावा महावितरण कंपनी करत आहे. मात्र, वास्तवात शेतकऱ्यांना महावितरण कंपनीने दिलेल्या वेळेप्रमाणे वीजपुरवठाच होत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

सध्या जिल्ह्यात द्राक्षाची फळ छाटणी सुरू केली आहे. सुरवातीच्या काळात द्राक्ष पिकाला पाणी कमी लागते. मात्र, पुढील महिन्यापासून द्राक्ष पिकाला
योग्य पाणी द्यावे लागते. मात्र, विद्युत पुरवठा सातत्याने खंडित होत राहिला तर, द्राक्ष उत्पादकामध्ये अडचणी निर्माण होतील. त्यामुळे शेतीच्या पंपासाठी वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे.

शेतीच्या पंपांचा वीजपुरवठा दोन तासांनी कमी केला आहे. सातत्याने वीजपुरवठा होत नाही. त्यामध्ये खंडित होत आहे. यामुळे द्राक्ष बागेला पाणी देण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत.
- सुभाष आर्वे, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ

इतर बातम्या
महारेशीम नोंदणीला अकोला, वाशीममध्ये...अकोला :  रेशीम शेती आणि उद्योगास प्रोत्साहन...
मुख्यमंत्री फडणवीस साधणार ‘लोक संवाद’ पुणे ः शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत...
मराठवाड्यात महारेशीम अभियानाला सुरवात औरंगाबाद ः रेशीम उद्योगातून शेतकऱ्यांचे जीवनमान...
जळगावमधील सर्वच तालुके दुष्काळीजळगाव : जिल्ह्यातील सर्व गावांची अंतिम पैसेवारी...
‘पिंपळगाव खांड’तून पिण्यासाठी आवर्तनलिंगदेव, जि. नगर : मुळा नदीवरील पिंपळगाव खांड (ता...
पुणे विभागात रब्बीची अवघी ३४ टक्के पेरणीपुणे ः पावसाळ्यात कमी झालेल्या पावसामुळे गेल्या...
परभणीची खरिपाची अंतिम पैसेवारी ४४.६९...परभणी ः परभणी जिल्ह्याची खरीप हंगामाची अंतिम...
धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत ९० विहिरींचे...धुळे : पाणीटंचाईची तीव्रता धुळे, नंदुरबार...
कोल्हापूर जिल्ह्यात वाढती थंडी रब्बी...कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
कॅनॉल दुरुस्तीची कामे आता जलयुक्‍त...वर्धा : जलसंधारण आणि जलसंपदा विभागाच्या...
सोलापूर कृषी समितीच्या बैठकीत...सोलापूर : गुजरातमध्ये राबविण्यात येणाऱ्या कृषी...
कांदा, भाजीपाला वाटला मोफतचांदवड, जि. नाशिक : कांद्यासह भाजीपाला व इतर...
पालखेडच्या आवर्तनास जिल्हाधिकाऱ्यांचा...येवला, जि. नाशिक : पालखेड डाव्या कालव्यावरील...
एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांचे होणार...सोलापूर : यंदाच्या गाळप हंगामात संबंधित...
औरंगाबादमध्ये २७ डिसेंबरपासून ‘ॲग्रोवन’...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञान व...
पावसातही शेतकऱ्यांचा आम नदीपात्रात...वेलतूर, नागपूर : टेकेपार येथील शेतकऱ्यांनी...
स्वाभिमानीचे डफडे बजाओ आंदोलनबुलडाणा ः दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत, सोयाबीन...
विदर्भातील तीन जिल्हा बँकांचे विलीनीकरण...मुंबई: राज्यातल्या सामान्य शेतकऱ्यांच्या...
किमान तापमानात वाढ पुणे  : ‘पेथाई’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे...
मराठवाड्यातील दुष्काळाची पैसेवारीने...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ८५३३...