सीताफळ विकासाकडे कृषी सचिवांचे वेधले लक्ष

सीताफळ विकासाकडे कृषी सचिवांचे वेधले लक्ष
सीताफळ विकासाकडे कृषी सचिवांचे वेधले लक्ष

औरंगाबाद : झपाट्याने विस्तारत असलेल्या सीताफळाच्या विकासासाठी काही महत्त्वाच्या मागण्या पुढे करण्यात सीताफळ महासंघाने पुढाकार घेतला आहे. महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांची नुकतीच भेट घेतली. याविषयी सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा महासंघाने व्यक्‍त केली आहे.

या भेटीत जवळपास नऊ प्रमुख मुद्द्याकडे सिताफळ महासंघाने कृषी सचिवांचे लक्ष वेधले. त्यामध्ये बालानगर जातीमध्ये सुधारणा/विकास करणे, लागवडीचे अंतर जमिनीच्या प्रतवारीनुसार निश्चित करणे, स्व. भाऊसाहेब फुंडकर फलोत्पादन योजनेतील सीताफळबाबतच्या निकषात सुधारणा करणे, सीताफळ रोपवाटिकांचे नियम व अटी बाबतचे धोरण व कृषी आराखडा तयार करणे, माजी कृषिमंत्र्यांचे सीताफळ हब स्वप्नपूर्तीसाठी मंत्रालयात झालेल्या बैठकीतील निर्णयाची अंमलबजावणी करणे, सीताफळ विक्री व्यवस्थापनात सुधारणासाठी योजना कार्यान्वित करणे, सीताफळ प्रक्रिया उद्योगाच्या वाढीसाठी प्रोत्साहन योजना तयार करणे, सीताफळ लागवड क्षेत्र व उत्पादन यांचे सर्वेक्षणातील त्रुटी दूर करून अद्यावत माहिती संकलित करणे, सीताफळ महासंघ पुणे या पंजीकृत संस्थेस सीताफळ विकासासाठी प्रचार व प्रसार कार्यासाठी नोडल एजन्सी म्हणून मान्यता देण्याचे मुद्दे स्पष्टीकरणासह मांडण्यात आल्याची माहिती महासंघाच्या वतीने देण्यात आली.

शिवाय वाढती लागवड लक्षात घेऊन मागण्यांच्या संदर्भ व पुढील नियोजनासाठी कृषी विभाग व कृषी विभागाचे अधिकारी यांच्या संयुक्‍त बैठकीचे तत्काळ आयोजन करण्याची मागणीही सीताफळ महासंघाच्या वतीने करण्यात आली.

सीताफळाच्या सर्वांगीण विकासासाठी मांडलेल्या मागण्यांपैकी सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी कृषी सचिवांनी दाखविली. काही मागण्या तातडीने मान्य करण्याचीही पावले उचलली, सीताफळ विकासाच्या नियोजनासाठी कृषी विभाग व कृषी विद्यापीठांची संयुक्‍त बैठक लवकरच घेण्याचे मान्य केले. त्यामुळे सीताफळ उत्पादकांना दिलासादायक निर्णय होतील, अशी आशा आहे.  - श्‍याम गट्टाणी, अध्यक्ष, सीताफळ महासंघ, महाराष्ट्र

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com