agriculture news in marathi, The agriculture sector budget is Rs 65,000 crore says cm | Agrowon

कृषी क्षेत्राचे १४ हजार कोटींचे बजेट ६५ हजार कोटींवर
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

बीड : मागच्या पंधरा वर्षांत झाला नाही तेवढा विकास या तीन वर्षांत झाला. कृषी क्षेत्राचे १४ हजार कोटी रुपयांचे बजेट आता ६५ हजार कोटी रुपयांवर नेले. मागच्या सरकारच्या कर्जमाफीत मराठवाड्याला १४०० कोटी रुपयांची माफी मिळाली. मात्र, या सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून मराठवाड्याला ४००० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांत वर्ग झल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

बीड : मागच्या पंधरा वर्षांत झाला नाही तेवढा विकास या तीन वर्षांत झाला. कृषी क्षेत्राचे १४ हजार कोटी रुपयांचे बजेट आता ६५ हजार कोटी रुपयांवर नेले. मागच्या सरकारच्या कर्जमाफीत मराठवाड्याला १४०० कोटी रुपयांची माफी मिळाली. मात्र, या सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून मराठवाड्याला ४००० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांत वर्ग झल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

महाराष्ट्राची धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र नारायणगड येथील २५ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्‍घाटन व ११०० रोपट्यांची लागवड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी (ता. १५) दुपारी झाले.

शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, मठाधिपती शिवाजी महाराज, आमदार भीमराव धोंडे, आर. टी. देशमुख, लक्ष्मण पवार, माजी मंत्री सुरेश धस, बदमराव पंडित, जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोलहार, उपाध्यक्षा जयश्री मस्के, माजी आमदार राजेंद्र जगताप उपस्थित होते.  

श्री. फडणवीस म्हणाले, आगामी काळात पोलिसांची मोठी भरती होईल, २०१९ पर्यंत महाराष्ट्र बेघरमुक्त होईल. आतापर्यंत पाच लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला असून शेवटच्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळेपर्यंत योजना सुरू राहिल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.तसेच  जिल्ह्यात मराठा समाजाच्या विद्यार्थी वसतिगृहासाठी पाच कोटी रुपये निधीची घोषणा या वेळी त्यांनी केली.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...