कर्नाटकप्रमाणे शेतीसाठी सुविधा महाराष्ट्रात कधी ?

कर्नाटकप्रमाणे शेतीसाठी सुविधा महाराष्ट्रात कधी ?
कर्नाटकप्रमाणे शेतीसाठी सुविधा महाराष्ट्रात कधी ?

संकेश्वर, जि. बेळगाव ः शेजारील कर्नाटक राज्याप्रमाणे शेती व शेतकऱ्यांसाठी अनुदान आणि इतर सोयीसुविधा महाराष्ट्र शासनानेही द्याव्यात, ते जर महाराष्ट्र शासनाला जमत नसेल तर कोल्हापूर जिल्ह्यातील निलजी (ता. गडहिंग्लज) गावचा समावेश कर्नाटक राज्यात करावा, अशी मागणी त्या गावच्या ग्रामसभेत अलीकडेच करण्यात आली होती. एकीकडे महाराष्ट्रात समावेश होण्यासठी बेळगाव शहर व सीमाभागात सातत्याने आंदोलने छेडली जात आहेत. याऊलट कर्नाटक हद्दीला लागून असलेल्या निलजी ग्रामसभेत कर्नाटक राज्यात जाण्याची इच्छा व्यक्त होणे, ही बाब लक्षवेधी आणि महाराष्ट्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर संतप्त प्रतिक्रिया आहे.  या संदर्भात कर्नाटक व महाराष्ट्र राज्यांतील शेती व शेतकरीविषयक कल्याणकारी योजना व धोरणांचे अवलोकन करणे गरजेचे आहे. याबाबतीत महाराष्ट्र सरकारचे शेतीवषयक धोरण व दृष्टिकोन हे नाव मोठे व लक्षण खोटे या पंक्तीत बसणारे आहे. 

  • कर्नाटक राज्यात अनेक वर्षांपासून दहा अश्वशक्तींपर्यंत मोफत वीजपुरवठा केला जातो. तर महाराष्ट्रात मात्र शेतीसाठी वीजदारात प्रचंड वाढ केली आहे. 
  • कर्नाटक राज्यात ठिबक सिंचनासाठी ७० ते ९० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. हेच अनुदान महाराष्ट्रात मात्र ४५ ते ५५ टक्क्यापर्यंत आहे.
  • महत्त्वाचे म्हणजे कर्नाटकातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेमार्फत ट्रॅक्टर, यंत्रे-उपकरणे, दुग्ध व्यवसाय, ठिबक सिंचन आदी योजनांसाठी केवळ ३ टक्के व्याजदारने कर्जपुरवठा केला जातो. तर महाराष्ट्रात मात्र या योजनेसाठी १२ ते १५ टक्के व्याज आकारले जाते.
  • शेतकऱ्यांना कर्नाटकात शून्य टक्के दराने पीकर्जपुरवठा केला जातो. त्यानुसार केवळ मुद्दल कर्ज रक्कम वसूल करून नव्याने कर्जपुरवठ्याची सोय आहे. महाराष्ट्रात मात्र शून्य टक्के व्याजदराने पीककर्जाची सोय तर नाहीच; उलट याच कर्जावर सहा टक्के दराने व्याज वसूल केले जाते. 
  • शासनाकडून यथवकाश व्याज अनुदानाची रक्कम २ ते ३ वर्षांनी शेतकऱ्यांना परत करण्याची पद्धत आहे. याशिवाय कर्नाटकात प्रत्येक तालुक्यातील रयत संपर्क केंद्रामार्फत खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामांच्या पिकांसाठी सुधारित बी-बियाणे, कीडनाशके, जैविक-सेंद्रिय खते, बीजोपचार साहित्य, पीकवर्धक यंत्रोपकरणे, अवजारे यांचा पुरवठा अनुदानासह आणि मागेल त्याला केला जातो. 
  • कर्नाटकात धर्मस्थळांच्या श्री. मंजुनाथ संस्थेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक तालुक्यात दोन ते तीन केंद्रांच्या माध्यमातून शेतीकामासाठी ट्रॅक्टर, रोटर, नांगर, मळणी यंत्र, पाचट कुट्टी यंत्र, स्प्रे पंप आदी भाडोत्री तत्त्वावर देण्याची सोय करण्यात आली आहे. 
  • शेतातील उसाच्या पाचटाची कुट्टी करून घेणाऱ्या शेतकऱ्यांना यंदापासून प्रतिहेक्टरी १५०० रुपये अनुदान थेट खात्यात जमा करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
  • काही वर्षांपूर्वी सरकारच्या सदोष धोरणामुळे ऊसदरात कमालीची घट झाली असताना कर्नाटक सरकारने खास बाब म्हणून प्रतिटन १५० रुपये अर्थसाह्य दिले होते. 
  • या सर्व बाबींचे मूल्यमापन करता महाराष्ट्र माझा कोठे दडून बसला आहे याचा शोध घ्यावा लागेल. उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर आहे, मात्र शेती आणि शेतकरी विकास कामांमध्ये पिछाडीवर आहे. किंबहुना कर्नाटक राज्याच्या सीमेला असलेल्या खेड्यातील शेतकऱ्यांमध्ये कर्नाक राज्यातील शेतीविषयक सोयीसुविधांची चर्चा होत असते. त्या वेळी महाराष्ट्र मागे का, याचे उत्तर मिळत नाही. आगामी अर्थसंकल्पातून शेती व शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com