agriculture news in Marathi, Agriculture subsidy process will be implement online, Maharashtra | Agrowon

कृषी यांत्रिकीकरणातील अवजार अनुदान प्रक्रिया ऑनलाइन होणार
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

पुणे : देशातील शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणातून अनुदान देण्याची सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यामुळे पुढील वर्षीपासून राज्यात ठिबकप्रमाणेच अवजारांसाठीदेखील ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध होणार आहे. 

पुणे : देशातील शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणातून अनुदान देण्याची सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यामुळे पुढील वर्षीपासून राज्यात ठिबकप्रमाणेच अवजारांसाठीदेखील ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध होणार आहे. 

शेतकऱ्याला अनुदान मिळवण्यासाठी कृषी खात्याच्या कर्मचाऱ्याशी संबंध येऊ नये उलट कृषी कर्मचाऱ्याने त्याच्या बांधावर जाऊन तपासणी करावी. शेतकऱ्याला त्याचे अनुदान ‘डीबीटी’ने थेट बॅंक खात्यात मिळावे, असा हेतू केंद्र शासनाचा आहे. कृषी यांत्रिकीकरणाचा वेग सध्या देशभर वाढत आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रातील ऊर्जेचा वापरदेखील सध्या प्रतिहेक्टर २.०२ किलोवॉट आहे. पुढील दोन वर्षांत हेच प्रमाण चार किलोवॉट प्रतिहेक्टर करण्याचा केंद्राचा उद्देश आहे. त्यासाठी ऑनलाइन कामकाज उपयुक्त, पारदर्शक व शेतकऱ्यांना जादा सुविधा देणारे ठरेल, असे केंद्राला वाटते. 

‘‘राज्यातील शेतकरी पुढील हंगामापासून अवजार अनुदानासाठी ऑनलाइन अर्ज भरतील. त्यासाठी ओटीपी (वन टाइम पासवर्ड) मिळेल. शेतकऱ्याला अनुदानप्राप्त अवजारे, डीलर, डिस्ट्रिब्यूटर्स ऑनलाइन दिसतील. शेतकऱ्यांची नावेदेखील सर्व डीलर, डिस्ट्रिब्यूटर्स दिसतील. त्यामुळे डीलर वर्गात स्पर्धा होईल. शेतकऱ्याने स्वतः डीलर निवडला की सार्वजनिक यादीत या शेतकऱ्याचे नाव दिसणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

शेतकऱ्याने डीलरकडून स्वतः अवजारांची खरेदी केल्यानंतर खरेदी पावती ऑनलाइन अपलोड होईल. ही बिले तालुका कृषी अधिकाऱ्याला ऑनलाइन दिसतील. त्यानंतर बिलांच्या आधारे कृषी पर्यवेक्षक, सहायकांकडून शेतकऱ्याकडे जाऊन मोका तपासणी करतील. त्यानंतर तपासणी झालेली बिले ऑनलाइन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याला (एसएओ) दिसतील. ‘एसएओने’ या बिलांना मंजुरी देताच शेतकऱ्याच्या खात्यात अनुदान जमा होणार आहे. 

या पद्धतीमुळे सध्याच्या अवजार अनुदानवाटपातील मानवी हस्तक्षेप थांबेल, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. ‘‘राज्यात सध्या फक्त पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियानामधील कृषी क्षेत्रातील ऊर्जेचा वापर प्रतिहेक्टर २.०२ किलोवॉटपेक्षा जादा आहे. मात्र, ट्रॅक्टर व इतर अवजारांच्या वापरामुळे महाराष्ट्रानेदेखील आघाडी घेतली आहे. त्यात पुन्हा राज्याने स्वतःची कृषी यांत्रिकीकरणाची १०० टक्के अनुदानाची योजना सुरू केली आहे,’’ असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

योजना ऑनलाइन करण्याची उद्दिष्टे  

  •    राज्यातील मजूरटंचाईवर प्रभावी उपाय लागू करणे 
  •    कस्टम हायरिंग सेंटर (अवजार बॅंक) वाढविणे 
  •    छोट्या शेतकऱ्यांना अल्पदरात यंत्रिक सुविधा देणे 
  •    कृषी अवजारांची प्रात्यक्षिके, तपासणी, प्रशिक्षण सुविधा वाढविणे

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...