agriculture news in Marathi, Agriculture university devide on budget seasion, Maharashtra | Agrowon

कृषी विद्यापीठ विभाजनाला मिळाला बजेटचा मुहूर्त
विनोद इंगोले
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

कृषी विद्यापीठ विभाजन आमच्या अजेंड्यावर आहे. राज्यपाल कार्यालयाकडून या संदर्भाने काही हरकती उपस्थित करण्यात आल्या आहेत. त्या हरकतींचे समाधान झाल्यानंतर हा विषय मार्गी लागेल.
- सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री, महाराष्ट्र राज्य

नागपूर : होणार होणार अशी गेली अनेक वर्षं चर्चा असलेल्या अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विभाजनाचा मुद्दा राज्याच्या अर्थसंकल्पात निकाली निघणार असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. नव्या विद्यापीठाकरीता सुमारे ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचेही सांगितले जाते. 

अकोला मुख्यालय असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात पूर्व व पश्चिम विदर्भातील ११ जिल्ह्यांचा समावेश होतो. पश्चिम विदर्भात कपाशी, सोयाबीन, तूर, मूग, उडीद यासारखी पीकपद्धती आहे. पश्चिम विदर्भात असलेल्या विद्यापीठाकडून त्याच भागातील शेतकऱ्यांना अद्याप संशोधनात्मक उपलब्धीच्या नावावर काही ठोस मिळाले नाही. पश्चिम विदर्भातील शेतकरीच अशा प्रकारे उपेक्षित असताना पूर्व विदर्भाचा तर विषयच होत नाही, अशी अवस्था आहे. 

पूर्व विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यांत भात लागवड होते. या शेतकऱ्यांना तर कृषी विद्यापीठ म्हणजे दुरुन डोंगर साजरे या पठडीतील ठरले आहे. त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठाचा मुद्दा एेरणीवर आला. खुद्द अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार त्यासाठी आग्रही होते. मुख्यमंत्र्यांचे आजोळ, तर अर्थमंत्र्यांचे गाव असलेल्या मुल येथे हे विद्यापीठ प्रस्तावीत करण्यात आले. कृषी तंत्रज्ञान आणि वानिकी विद्यापीठ (ॲग्री टेक्‍नॉलॉजी व फॉरेस्ट्री) असे हे विद्यापीठ राहणार असल्याचे सूतोवाच आहेत. 

डॉ. व्यंकटेश्‍वरलू कमिटीने दिला अहवाल
कृषी विद्यापीठाच्या विभाजनाकरीता परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्यंकटेश्‍वरलू यांच्या अध्यक्षतेत दीड वर्षापूर्वी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने आपला मराठी, इंग्रजी भाषेतील अहवाल सरकारला दिला. या अहवालात कृषी विद्यापीठ स्थापनेनंतर होणारा महिन्याचा खर्च दिला गेला आहे. त्यासोबतच पदाबाबतचा आढावाही घेण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना देखील जागेच्या हस्तांतरणाबाबत समितीने सूचना केल्या होत्या.

इतर अॅग्रो विशेष
अकोला जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना देणार...अकोला ः देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८०...सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश...
सीताफळाच्या योग्य जातींची करा लागवडमहाराष्ट्रात सीताफळाच्या झाडांचे काही नैसर्गिक...
उत्पादकांसाठी बेदाणा गोडसांगली ः यंदाच्या बेदाणा हंगामात बेदाण्याच्या...
केळी दरात किंचित सुधारणाजळगाव ः रावेर, यावलमध्ये केळीची आवक वाढलेली...
मका चार वर्षांतील नीचांकी पातळीवरनवी दिल्ली ः बजारात मका आवक वाढल्यांतर मागणी कमी...
कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पणन संचालक...पुणे ः पणन संचालकपदी पूर्णवेळ नियुक्ती असताना...
​​राज्य सरकार राबविणार मधुमक्षिका मित्र...पुणे : शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते...
ग्रामस्वच्छता अभियानात प्रभाग, गटातून...नगर ः ग्रामीण भागात स्वच्छतेची व्यापी...
केसर आंबा पाडाला आलाय...औरंगाबाद : आपली चव, गंध आणि रूपाने ग्राहकांना...
बदल्या समुपदेशनानेच...पुणे : राज्याच्या कृषी विभागात समुपदेशनाने बदल्या...
अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेतपुणे : ‘सागर’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात...
पाणलोट, मृदसंधारण घोटाळ्याचा पर्दाफाशपुणे : कृषी खात्यातील पाणलोट व मृदसंधारण...
ब्राझील, थायलंडचा यंदा इथेनॉलकडे वाढता...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वत्रच...
बारमाही भाजीपाला शेतीला नर्सरी...ब्राह्मणगाव (जि. नाशिक) येथील केवळ वाघ पूर्वी...
सुधारित तंत्राची मिळाली गुरुकिल्लीअकोला जिल्ह्याचे मुख्य उन्हाळी पीक कांद्याची...
भाराभर चिंध्या राज्यात १२७ वा पशुसंवर्धन दिन नुकताच साजरा...
मथुरेचं दूध का नासलं?राज्यात मे महिन्याचे तापमान यंदा नैसर्गिक आणि...
चिमुरड्याच्या कॅमेऱ्यात कैद आनंदी शेतकरीआपल्याकडील शेतकरी आनंदी असू शकतो का? उत्तर...
‘अ’तंत्र निकेतनपुरेसा अभ्यास आणि तयारीअभावी, यंत्रणेचा विरोध...