agriculture news in marathi, agriculutre, farmers issues to be raised in assembly session | Agrowon

शेती, शेतकऱ्यांसह विविध मुद्दे गाजणार
टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (ता. २६) सुरू होत आहे. एक महिन्याहून अधिक काळ चालणाऱ्या या अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी, वाढलेल्या शेतकरी आत्महत्या, शेतकरी धर्मा पाटील यांचा मृत्यू यांसह मंत्रालयातील आत्महत्येचे प्रयत्न, बोंडअळी, अवकाळी पाऊस नुकसान भरपाई, मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप त्यासोबतच समाजातील विविध घटकांमधील आक्रोश हे मुद्दे विशेष गाजण्याची शक्यता आहे. 

मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (ता. २६) सुरू होत आहे. एक महिन्याहून अधिक काळ चालणाऱ्या या अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी, वाढलेल्या शेतकरी आत्महत्या, शेतकरी धर्मा पाटील यांचा मृत्यू यांसह मंत्रालयातील आत्महत्येचे प्रयत्न, बोंडअळी, अवकाळी पाऊस नुकसान भरपाई, मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप त्यासोबतच समाजातील विविध घटकांमधील आक्रोश हे मुद्दे विशेष गाजण्याची शक्यता आहे. 

विविध कारणांवरून सध्या राज्यातील शेतकऱ्यांसह सर्वच घटकांमध्ये सरकारविरोधी असंतोष आहे. भूसंपादनाचा योग्य मोबदला न मिळाल्याने धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या वृद्ध शेतकऱ्याने मंत्रालयात विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. त्यानंतर एका तरुणानेही मंत्रालयात सहाव्या मजल्यावरून उडी घेत आयुष्य संपविले. पाठोपाठ मंत्रालय आणि परिसरात आत्महत्येच्या प्रयत्नाच्या अनेक घटना घडल्या. स्थानिक पातळीवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी करीत राज्यभरातील नागरिकांचा ओढा मंत्रालयात वाढतो आहे. सरकारच्या दरबारात येऊनही संबंधितांची दखल घेतली जात नाही, ही सार्वत्रिक तक्रार आहे. यावरून विरोधक राज्य सरकारविरोधात आक्रमक होणार, हे स्पष्टच आहे.  

राज्य सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी फसवी ठरल्याचा आरोप विरोधक करीत आहेत. नऊ महिने झाले, तरी ३४ हजार कोटींच्या कर्जमाफीपैकी फक्त बारा हजार कोटींचेच वाटप झाले आहे. कर्जमाफीचा लाभ अद्यापही चाळीस टक्के शेतकऱ्यांनाच झाला आहे. राज्य सरकारची कर्जमाफी फसवी ठरल्यानेच राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे, अशीही टीका होत आहे. कापसावरील बोंडअळीवरून नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी रान पेटविले होते. राज्य सरकारने मदतीचे आश्वासन देऊनही शेतकऱ्यांच्या हाती अजून मदत पोहोचलेली नाही. गेल्या काही दिवसांत मराठवाडा, विदर्भात अवकाळी पाऊस, गारपिटीने थैमान घातले. या मदतीचा विषयही सरकारपुढे आवासून उभा आहे. 

सरकार फक्त घोषणा करते, जाहिरातीवर कोट्यवधींचा खर्च होतो, प्रत्यक्षात काहीच होत नाही, अशीही नाराजीची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत. जाहिरातबाज अशीच सरकारची प्रतिमा झाली आहे. सत्ताधाऱ्यांना सरकारचा कारभार कसा चालवायचा, हेच कळलेले नाही, त्यामुळे समाजातील सर्व घटकांमध्ये नाराजीची भावना पसरली आहे, याचाही लाभ विरोधक सरकारला खिंडीत गाठण्यासाठी करणार, हे स्पष्ट आहे. सरकारवरील या सार्वत्रिक नाराजीचा फायदा घेण्यासाठी विरोधक विशेषतः काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अधिवेशनात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळणार आहे.

 

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...