agriculture news in marathi, agriinputs distribution program start again,jalgaon, maharashtra | Agrowon

केळीवरील ‘करपा’ निर्मूलनासाठी निविष्ठा वितरण होणार
टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017
केळी उत्पादकांसाठी फारशा योजना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे नाहीत. अशात करपा निर्मूलनासंबंधीच्या निविष्ठांचे वितरणही बंद होते. ती बाब लक्षात आल्यानंतर आम्ही या निविष्ठांचे वितरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 
- नंदकिशोर महाजन, 
कृषी सभापती, जिल्हा परिषद, जळगाव
जळगाव : जिल्हा परिषदेने मागील दोन वर्षांपासून बंद केलेला ‘करपा’ निर्मूलनासंबंधीचा निविष्ठा वितरण कार्यक्रम यंदापासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वनिधीतून देय एक लाख रुपये निधीतून पात्र शेतकऱ्यांना या निविष्ठांचे वितरण केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी एक लाख रुपये रक्कम मात्र तोकडी आहे. ती वाढविण्यात यावी अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या आहेत. 
 
जिल्ह्यात दरवर्षी किमान ४२ हजार हेक्‍टरवर केळी पीक असते. ही बाब लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे पीक सुरक्षेसंबंधी केळी उत्पादकांना दरवर्षी करपा निर्मूलनाच्या निविष्ठांचे वितरण केले जायचे. त्यात बुरशीनाशके व इतर बाबींचा समावेश असायचा. पण फारसे लाभार्थी घेतले जात नव्हते. अशातच निधी तोकडा असतो म्हणून कृषी विभागाने हा कार्यक्रम बंद केला.
 
मागील दोन वर्षे हा कार्यक्रम बंद होता. तो का बंद पडला, अशी विचारणा मागील महिन्यातील स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी केली होती. त्यावर निधी असतो. पण लाभार्थींचा प्रतिसाद नव्हता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. निधी कमी असला तरी जेवढ्या गरजू लाभार्थींना किंवा केळी उत्पादकांना निविष्ठा देता येतील तेवढ्या द्या, हा कार्यक्रम पुन्हा सुरू करा, अशी सूचना कृषी समितीचे सभापती नंदकिशोर महाजन व इतर सदस्यांनी केली होती.
 
याबाबतची दखल घेऊन हा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने घेतला आहे. 
या निधीतून थेट अनुदान (डीबीटी) पद्धतीने लाभार्थींना लाभ दिला जाईल. निविष्ठांची खरेदी केळी उत्पादकांना करायची आहे. ५० टक्के अनुदान दिले जाणार आहे, अशी माहिती मिळाली. 

इतर ताज्या घडामोडी
मत्स्यपालनामध्ये योग्य तांत्रिक बदलांची...सध्याच्या मत्स्यपालन पद्धतीमध्ये कोणतेही बदल न...
जळगाव बुरशीयुक्त शेवयांच्या प्रकरणात...जळगाव ः शालेय पोषण आहार वाटपानंतर अंगणवाडीमधील...
सातगाव पठार परिसरात बटाटा लागवडीस सुरवातसातगाव पठार, जि. पुणे : काही गावांमध्ये पावसाने...
सोलापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह...सांगोला/करमाळा : जिल्ह्याच्या काही भागांत...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात...पुणे : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी...
मातीचा प्रत्येक कण सोन्यासारखा; तो वाया...नाशिक : शेतातील माती म्हणजे कोट्यवधी सूक्ष्म...
नांदेड जिल्ह्यात १ लाख ६५ हेक्टरवर पेरणीनांदेड ः नांदेड जिल्ह्यामध्ये यंदाच्या खरीप...
शेतकऱ्यांना पीककर्ज देणे टाळले तर ठेवी...नगर  ः शेतकऱ्यांना सध्या खरीप हंगामासाठी...
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायमसातारा  ः जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, माण,...
नांदेड जिल्ह्यात फक्त ८.२९ टक्के...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील यंदा खरीप पीककर्ज...
तापीच्या पाण्यास गुजरातचा नकारमुंबई  ः पार-तापी नर्मदा नद्याजोड...
कापूस पीक नियोजनातून हमखास उत्पादन वाढसोनगीर, जि. धुळे ः कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी...
औरंगाबाद जिल्ह्यात अखेर पाऊस बरसलाऔरंगाबाद  : पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या...
`दमणगंगा नदीजोड योजनेचे फेरसर्व्हेक्षण...नाशिक : दमणगंगा (एकदरे) नदीजोड योजनेचे...
मराठवाड्यात साडेतीन लाख हेक्‍टरवर पेरणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ३ लाख ६७...
पीककर्जासाठी बँक अधिकाऱ्याने केली...दाताळा, जि. बुलडाणा : पीककर्ज मंजूर करून...
माॅन्सून सक्रिय, सर्वत्र चांगल्या...महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी झालेले असून १००४...
‘एसआरआय’पद्धतीने भात लागवडीचे तंत्रएसआरआय पद्धतीने भात लागवड केल्यामुळे रोपे, माती,...
भूमिगत निचरा प्रणालीद्वारे जमिनींची...पाणी व रासायनिक खते यांच्या अनियंत्रित वापरामुळे...
लागवड सावा पिकाची...जून महिन्यात सावा पिकाची पेरणी करावी. दोन ओळीतील...